आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttar Pradesh Have Distribution Of Four State Bye Mayavati Sarkar

मायावती मंत्रिमंडळाचा निर्णय: उत्तर प्रदेशचे चार तुकडे पाडण्याचा घाट

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: उत्तर प्रदेशचे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी चार राज्यांत विभाजन करण्याचा मायावती सरकारचा प्रयत्न असून मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 21 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे.
छोट्या राज्यांच्या निर्मितीबाबत केंद्र सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. याचा विचार करता उत्तर प्रदेशचाही विकास साधला जाऊ शकेल, असा दावा मायावती यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मायावती यांनी हेतूपुरस्सर विभाजनाचा मुद्दा उपस्थित करून मूळ विषयांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सुबोध श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनीही भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारने मुद्दाम राज्य विभाजनाचा मुद्दा पुढे केला असल्याचा आरोप केला.
राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्राला योग्य वाटले तर संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा व मतदान होईल. त्यानंतर अशी राज्ये स्थापन करण्याचा सर्वाधिकार केंद्र सरकारकडेच असेल. या प्रस्तावाशी केंद्र सहमत नसेल तर यासंबंधीचे विधेयक संसदेत मांडलेच जाणार नाही.