आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात तरुण नेतृत्वाची अग्निपरीक्षा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुका तरुण नेतृत्वासाठी परीक्षेची ठरणार आहे. यामध्ये कॉँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी आणि भाजपचे खासदार वरुण गांधी यांचा समावेश आहे.
गांधी बंधूंव्यतिरिक्त समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे पूत्र अखिलेश यादव आणि अजित सिंह यांचे पूत्र जयंत चौधरी यांच्या नेतृवाचीही विधानसभा निवडणूक कसोटी ठरणार आहे. बिहार निवडणूकीमध्ये सपाटून मार खाल्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. मुख्यमंत्री मायावती यांच्या सत्ता उलथावून टाकण्यासाठी अखिलेश यादव यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता मिळवण्यासाठी दोन युवा नेत्यांमध्ये मोठी लढत होणे अपेक्षीत मानले जात आहे. युवकांना आकर्षित करण्यासाठी वरूण गांधी यांना प्रचारात उतरविले जाईल असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अजित सिंह यांनी कॉँग्रेससोबत यूती केल्यामुळे पक्षाचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जनाधार वाढविण्याचे जयंत चौधरी यांच्यापुढे मुख्य आव्हान आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील 12 कोटी मतदारांपैकी 25 टक्के मतदार 18 ते 30 वयोगटातील आहेत. यातील 18 वर्षांच्या 53 लाख मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे नवमतदारांना आकर्षित करण्याचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येक राजकीय पक्षाला ठेवावे लागणार आहे. राहुल गांधी यांनी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील भट्टा परसोलमध्ये प्रचार मोहिमेला सरुवात केली. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. राहुल गांधी यांनी राज्याच्या प्रचार मोहिमेमध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भर दिला आहे. अशा स्थितीत सपाचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमोर निवडणुकीचे मोठे आव्हान आहे. कार्यकर्त्यांना चालना देण्यासाठी तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी अखिलेश यादव यांनी क्रांती रथ यात्रा
काढली आहे. सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेच्या आठ फेºया पूर्ण झाल्या आहेत. समाजवादी पार्टी उमेदवाराची काळजीपूर्वक निवड करत असून पहिल्या यादीमध्ये ही बाब उघड झाली आहे.
सत्ता हस्तगत करण्यासाठी तरूण नेतृत्वामध्ये रस्सीखेच सुरू असली तरी या सर्वांसमोरचे एकत्रित आव्हान मुख्यमंत्री मायावती यांच्या जागा कमी करणे हे असेल. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मायावती सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी 20 वर मंत्र्यांना बडतर्फ करून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न चालविला आहे.