आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात घोडेबाजार तेजीत

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घोडेबाजार तेजीत आला आहे. पक्षांतराने जोरदार वारे सध्या वाहू लागले आहेत. विरोधक मित्र तर सहकारी विरोधी पक्षाला निष्ठा वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मायावती सरकारमधून बाहेर पडावे लागलेल्या चार मंत्र्यांचे भाजपने स्वागत केले आहे. या माजी मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सपाचे प्रदेशाध्यक्ष अखिल यादव हे नेत्यांची स्वच्छ प्रतिमा व निष्ठा यावर भर देत आहेत. यावरून त्यांचे पक्षातील सहका-यांशी मतभेद झाले आहेत. केंद्रात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य करणा-या भाजपने उत्तर प्रदेशात सर्व पक्षांना हैराण केले आहे. मायावती सरकारने ज्या मंत्र्यांची हकालपट्टी केली त्यांना भाजपने रखवालदार म्हणत पक्षात प्रवेश दिला. पक्षाचे उपाध्यक्ष विनय कटियार यांनी मंगळवारी घोटाळ्यातील संशयित कुशचा यांची गळाभेट घेतली. लोकायुक्त अहवालामुळे मंत्रिमंडळात हाकलण्यात आलेले बादशाह सिंह यांनाही सदस्यत्व देण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणा-या व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अखिल यादव यांनी स्पष्ट करून डी.बी. यादव यांना नाकारले. यादव यांना पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे 31 डिसेंबर रोजी सांगितले होते.