आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक छोटासा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एके दिवशी नरेंद्र सकाळी सकाळी समुद्रकिनारी रपेट मारत होता. तेव्हा किनार्‍यावर अचानक त्याला अनेक स्टारफिश दिसले. शेकडो स्टारफिश वेगवान लाटांसोबत पाण्यातून बाहेर येत होते, मात्र ते जिवंत होते. दुपारी कडक उन्हात ते मरून जातील, असा विचार करून नरेंद्र एकेक करून स्टारफिश उचलून समुद्रात टाकू लागला. ते पाहून तेथून जाणार्‍या दुसर्‍या एका माणसाला नवल वाटले. नरेंद्र असे का करत आहे? असा विचार त्याच्या मनात आला. तो नरेंद्रला म्हणाला, ‘या ठिकाणी शेकडो स्टारफिश पडलेले आहेत, तू किती माशांना मदत करू शकशील.’ त्यावर नरेंद्रने त्याच्याकडे न पाहताच आणखी मासा उचलला आणि समुद्रात टाकत म्हणाला, ‘माझा हा छोटासा प्रयत्न त्या माशासाठी खूप महत्त्वाचा आहे.’