आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effects Of Shukra In Vrish Lagna Kundlis 8 9 10 House

धनु, मकर आणि कुंभ राशीत शुक्र ग्रह असेल तर आयुष्य कसे राहते?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृषभ लग्न कुंडलीच्या अष्टम स्थानात शुक्र ग्रह असेल तर....
एखाद्या व्यक्तीची वृषभ लग्न कुंडली असेल आणि अष्टम स्थानात शुक्र ग्रह असेल तर त्या व्यक्तीला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. कुंडलीतील अष्टम स्थान मृत्यू तसेच पुरातत्वशी संबंधित आहे. अष्टम स्थान धनु राशीचे आहे आणि त्याचा स्वामी गुरु आहे. गुरु आणि शुक्र शत्रू ग्रह मानले जातात. त्यामुळे शत्रूच्या राशीत शुक्र ग्रह असल्यामुळे शुक्र ग्रह त्या व्यक्तीला कठीण परिश्रम करण्यास भाग पाडतो.
वृषभ लग्न कुंडलीच्या नवम स्थानात शुक्र ग्रह असेल तर....
एखाद्या व्यक्तीची वृषभ लग्न कुंडली असेल आणि नवम स्थानात शुक्र ग्रह असेल तर त्या व्यक्तीला भाग्य आणि धर्म क्षेत्रात भरपूर शक्ती प्राप्त होते. कुंडलीतील नवम स्थान मकर राशीचे आहे आणि स्वामी शनी आहे. शनीच्या राशीत शुक्र ग्रह असल्यामुळे त्या व्यक्तीला भाग्याची मदत मिळते. हे लोक दिसायला सुंदर असतात. परंतु हे लोकांना अनेक आजारांनी ग्रासलेले सुद्धा असतात.
वृषभ लग्न कुंडलीच्या दशम स्थानात शुक्र ग्रह असेल तर....
या लग्न कुंडलीचे दशम स्थान कुंभ राशीचे आहे आणि स्वामी शनी आहे. शनीच्या राशीत शुक्र ग्रह असल्यास या लोकांना शासकीय कामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कठोर परिश्रम केल्यानंतर या लोकांना यश प्राप्त होते. हे लोक अहंकारी आणि चतुर असतात.