आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थांची वाणी : मुक्ती प्राप्त करण्यासाठी हे करा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण्यांना आणि माणसांना काळाचे भान असते. पण प्राण्यांना फक्त वर्तमानाचे भान असते तर माणसांना भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचे भान असते. भूतकाळाचा विचार केला तर शोक निर्माण करतो. भविष्याचे चिंतन काळजी निर्माण करते. वर्तमानाचे चिंतन दुःख निर्माण करते. जे होऊनच गेले आहे त्याबद्दल शोक करणे व्यर्थ आहे. जे होणारच आहे, पण काय होणार ते निश्चितपणे माहित नाही त्याबद्दल काळजी करणे व्यर्थ आहे. आणि जे प्रत्यक्षात घडत आहे. बहुधा आपल्याला न विचरता घडते त्याबद्दल दुःख करणे व्यर्थ आहे. आपणच आपल्या जीवनाकडे किंचित ति-हाईतपणे पहिले तर आपण शोक आणि चिंता करण्यामध्ये आपल्या मनाची शक्ती विनाकारण वाया घालवतो अशी खात्री होईल. अशा रीतीने अशक्त झालेले मन आनंद भोगण्यास नालायक बनते. त्यामुळे श्रीसमर्थांनी आपल्या श्लोकातून मुक्तीचा मार्ग सांगितला आहे...
मना मानसीं दुःख आणूं नको रे |
मना सर्वथा शोक चिंता नको रे |
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी |
विदेहीपणें मुक्ती भोगीत जावी ||
हे मना, जसे पेरावे तसेच उगवते हा सृष्टीनियम लक्षात ठेवून मनात दुःखाला थारा देऊ नकोस. आणि त्याचा व्यर्थ शोक, हे असे कसे झाले याची काळजीहि करीत बसू नको. विवेकाच्या साहाय्याने देहबुद्धी सोडून देऊन, देहाचे भान लोप्वून स्वतंत्रपणे मुक्तीसुखाचा आस्वाद घेत राहा.
(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)