आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थांची वाणी : रावणाचे साम्राज्य का बुडाले ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्व दृश्य वस्तूंवर काळाची सत्ता चालते. आज आपण श्रीमंतीचा उपभोग घेत असलो तर उद्या ती श्रीमंती तशीच टिकेल असे नाही. काळाच्या मर्जीनेच सर्व घडामोडी घडून येतात. अखेर काळ सर्वांना खाऊन टाकतो.
असे जर आहे तर माणसाच्या हातात काय आहे? काळ कसाही आला तरी आपली वासना चांगली ठेवणे हे माणसाच्या हातात आहे. पूर्वसंचीत जसे असेल तसे मानून वैभव भोगील किंवा विपत्ती भोगील.
ज्या अंतःकरणात भगवंताचे स्मरण स्थिरावते तेच शुध्द होय. भक्त असाच असतो. उलट दुष्ट वसन पोसणारा माणूस वैभवाने उन्मत्त बनतो. आपण फार मोठे आहोत असा त्यास भ्रम होतो. त्याच्या दुष्कार्मांनी समाज हैराण होतो. काळ फिरल्यानंतर त्याचे वैभव नष्ट होते आणि तो कालवश झाल्यावर लोक सुटकेचा निःश्वास सोडतात. यासाठी श्रीसमर्थांनी एक चांगले उदाहरण आपल्या श्लोकातून सांगितले आहे. उन्मत्त झालेल्या रावणाचे काळ फिरल्यानंतर काय झाले....
मना संग पां रावणां काय झालें |
अकस्मात तें राज्य सर्वें बुडालें |
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी |
बळें लागला काळ हा पाठिलागी ||
हे मना ! रावणाच्या जीवनाचा अंत कसा झाला ते पाहा. काही कल्पना नसतांना त्याचे येवढे साम्राज्य पार बुडाले. म्हणून दुष्ट वासना चटकन सोडून दे, काळ हा, नको म्हटलें तरी प्रत्येकाच्या मागे येत आहे.
(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)