आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थांची वाणी : जीवनात स्वार्थ असावा पण...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वकर्माचा जसा संबंध असेल त्याप्रमाणे प्रत्येक जीव जगात जन्म घेतो. त्याच पूर्वकर्मानुसार तो आयुष्य जगतो आणि अखेर मृत्युच्या मुखात विराम पावतो. या जगात अमर कोणीच नाही. प्रत्येकाला मृत्युच्या मार्गाने जावेच लागते. आजवर अगणित माणसे जन्माला आली आणि अखेर मारून गेली.
जगामधील आपले नित्याचे जीवन जगण्यासाठी किमान स्वार्थाची आवश्यकता आहे, यात वाद नाही. पण त्या स्वार्थाची अमर्याद वाढ झाली तर जीवनाचा विचका होतो. अतिस्वार्थाने समाजात संघर्ष निर्माण होतो. आणि एक माणूस श्रीमंत तर हजार माणसे दरिद्री अशी विचित्र परिस्थिती निर्माण होते. बरे इतकेही करून अंतःकाळ जवळ आला की, सर्व वैभव येथल्या येथे सोडून जावे लागते. त्यामुळे श्रीसमर्थ आपल्या श्लोकातून सांगतात की.....
जिवां कर्मयोगें जनीं जन्म झाला |
परी शेवटीं काळमूखीं निमाला |
महा थोर ते मृत्यूपंथेंचि गेले |
कितीयेक ते जन्मले आणि मेले ||
आपापल्या कर्मानुसार प्रत्येक जीव या मर्त्यलोकी जन्मास आलेला आहे आणि अखेरीस तो काळाच्या दाढेत सापडून लुप्त झाला आहे. मोठेमोठे थोर पुरुषही या मृत्यूपंथानेच गेले आहेत. कित्येकजण तर जन्मास आले आणि ( मागे नाव निशाणीहि न ठेवता ) मारून गेले.
समर्थांची वाणी : रावणाचे साम्राज्य का बुडाले ?
समर्थांची वाणी : मुक्ती प्राप्त करण्यासाठी हे करा...
समर्थांची वाणी : मनुष्याने नेहमी नम्रतेनेच वागावे
समर्थांची वाणी : स्वतःच्या स्वार्थासाठी दुस-याचा घातपात करू नका
समर्थांची वाणी : भक्तिमार्गाने गेल्यासच ईश्वराचे दर्शन होईल...
(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)