आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र प्रेमासाठी त्याने दिला आपला जीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका रुग्णालयात दोन रुग्ण दाखल झाले. एका रुग्णाच्या अंथरुणाच्या शेजारी असलेल्या खिडकीतून एक झाड दिसत होते. एकेदिवशी तो रुग्ण दुसर्‍या रुग्णाला म्हणाला, ‘त्या झाडाच्या खालच्या फांदीवरील पान जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत मी जिवंत राहील.’ त्या रात्री खूप वादळ आले होते. सकाळी जेव्हा रुग्णाने खिडकीतून डोकावले तर ते पान झडले नव्हते. त्या दिवशी त्याला काहीच झाले नव्हते, पण दुसर्‍या रुग्णाचा मृत्यू झाला होता. असे कळाले की तो रुग्ण संपूर्ण रात्र त्या पानाचे रक्षण करत होता, जेणेकरून त्याचा मित्र जिवंत राहावा. त्याने आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या मित्राचा विश्वास आणि जीव, दोन्ही वाचवले होते.