आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या शुक्राच्या संक्रमणाचा राशींवर पडणारा प्रभाव...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नवीन पिढीसह सर्वांना शुक्राचे संक्रमण बघण्याची आजची शेवटची संधी आहे. पुढील संक्रमण 105 वर्षानंतर बघायला मिळेल. शुक्र हा आंतरग्रह असून, तो सूर्य व पृथ्वीच्या मधून 67724908 मैल अंतरावरून 225 दिवसांत सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. पृथ्वी आणि शुक्र सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करताना 19 वेळा एकमेकांसमोरून जातात; परंतु ते एका प्रतलात येत नाहीत. आठ वर्षांनंतर पृथ्वी आणि शुक्र एकाच प्रतलात येत आहेत.

शुक्राच्या संक्रमणाचा राशींवर पडणारा प्रभाव...
मेष - लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात बदल करण्याचे विचार मनात येतील.
वृषभ - हा काळ तुमच्यासाठी ठीक नाही. मौन धारण करणे योग्य राहील. गुंतवणूक करू नका.
मिथुन - व्यवसायात फायदा होईल. नवीन वाहन विकत घेण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचा योग आहे.
कर्क - अचानक एखादे मोठे कार्य तुमच्या हातून पार पडेल. अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील.
सिंह - मोठा फायदा होण्याचे संकेत आहेत. सर्व कार्य पूर्ण होतील.
कन्या - छोट्या गोष्टीमुळे वाद होण्याची शक्यता आहे. वाहन चालवतांना काळजी घ्या
तूळ - जागा बदलण्याचे योग आहेत. सतर्क राहा, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - उन्नतीचा काळ आहे. कार्यक्षेत्रात लाभ होईल. व्यापारात वृद्धी होईल, नवीन ओळखी होतील.मन प्रसन्न राहील.
धनु - ठरवलेल्या कामात अडचणी येतील. अडकलेली कामे पूर्ण करण्यात जास्त वेळ जाईल.
मकर - जुने मित्र भेटतील. व्यवसायात गती येईल. अर्थी लाभ होण्याचे योग आहेत.
कुंभ - शुभ वार्ता समजतील. अडकलेली कामे पूर्ण करण्यास समर्थ व्हाल. झोप न आल्यामुळे अस्वस्थ राहाल.
मीन - सरकारी कामात अडचण निर्माण होईल. वाद-विवाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
संपूर्ण भारतात शुक्र दिसेल : देशात सूर्याेदयाच्या वेळी सूर्य बिंबावरून शुक्र ग्रह जाताना दिसेल. संक्रमणाची सुरुवात मध्य रात्री 3 वाजून 39 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे सुरुवात भारतात दिसणार नसून, शेवट आपणास पाहण्याची संधी मिळेल.
सूर्यबिंबावरून शुक्राचा प्रवास
1) सूर्याच्या बाहेरील बाजूस शुक्र 3 वाजून 39 मि. 57 सेकंदाने होणार आहे.
2) सूर्याच्या आतील बाजूस 3 वाजून 27 मि. 39 सेकंदाने प्रवेश होईल.
3) सकाळी 7 वाजून 02 मिनिट 53 सेकंदाने सूर्याच्या पटलावर प्रवेश होताना दिसेल.
4) सूर्याच्या आतील कडेस स्पर्श 10 वाजून 05 मिनिट 9 सेकंदात होईल
5) सूर्याच्या बाहेरील बाजूस शुक्राचा स्पर्श 10 वाजून 22 मिनिट 29 सेकंदाने होईल.
शुक्राचे दिवसा दर्शन घेण्याची अपूर्व संधी