आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थांची वाणी : भक्तिमार्गाने गेल्यासच ईश्वराचे दर्शन होईल...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समर्थ आपल्या श्लोकात सांगतात की ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी भक्तीमार्गाचा वापर प्रत्येक मनुष्याने करावा. मुळांत जीव हा खरा ईश्वराचाच आहे. पण दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने जीव ईश्वरास विसरला. भक्ती हा दुरावा नाहीसा करते, जीवाला ती भगवंताच्या समीप नेते, त्यांचे दर्शन करून देते. त्या दर्शनातून जीवाला आत्मज्ञान प्राप्त होते.
मना सज्जना भक्तिपंथेची जावें |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें |
जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावें |
जनीं वंद्य ते सर्वभावें करावें ||
हे सज्जन मना;( सत्स्वरूप जो परमात्मा, तेथूनच तुझा उदय होतो म्हणून तू खर्या अर्थाने सत्-जन् आहेस) तू भक्तिमार्गाने म्हणजे भगवत् प्रेमाचे सूत्र धरून जीवन जगावेस; यामुळे अगदी स्वाभाविकपणे श्रीहारीलाच पावशील. त्याकरिता प्रथमतः समाजघातक सारीं कर्मे तू सोडून दे व समाजहिताचीं सारीं कर्मे तू मनापासून कर.
भगवंताचा रस घेण्यास योग्य असे मन तयार करण्यास देहाची कर्मे शुद्ध आणि पवित्र असलीच पाहिजेत असा श्रीसमर्थांचा कटाक्ष आहे.
मनुष्याला आत्मपरीक्षण करायला शिकवतात रामदासांचे 'मनाचे श्लोक'
(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)