आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थांची वाणी : स्वतःच्या स्वार्थासाठी दुस-याचा घातपात करू नका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण एकमेकाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्न करत आहे. पण असे करताना तो आपला धर्म , नीती यांचे पालन करत नाही. स्वतःचा स्वार्थ साधावा म्हणून किंवा विनाकारण दुस-याचा घातपात करणे किंवा दुस-यास दुःख देणे किंवा दुस-याचे नुकसान करणे किंवा सज्जनास छळणे यावरून माणसाची दुष्ट वासना किंवा पापबुद्धी ओळखता येते. त्यामुळे श्रीसमर्थ सांगतात मनामधून त्यांची हकालपट्टी झाल्याशिवाय भगवंताचे दर्शन होत नाही.
मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुद्धि नको रे |
मना धर्मात नीति सोडूं नको हो |
मना अंतरी सार विचार राहो ||
या श्लोकात समर्थ म्हणतात - हे मना, दुस-याचा दुष्टावा करण्याची दुष्ट वासना कामाची नाही. पापाचरणाला प्रवृत्त करणारी पापबुद्धीहि धरू नको. नीतिधर्माचे आचरण सोडू नकोस. जीवनात जे खरोखर चांगले व श्रेष्ठ आहे त्याचा विचार अंतर्यामी करीत जा.
समर्थांची वाणी : भक्तिमार्गाने गेल्यासच ईश्वराचे दर्शन होईल...
(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)