आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्थांची वाणी : मनुष्याने नेहमी नम्रतेनेच वागावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक माणूस आपल्या विचारशक्तीने ब-यावाईट विचारप्रतिमा निर्माण करतो. माणूस ज्या प्रकारची भाषा वापरतो त्या त-हेचा आकार प्रतिमांना येतो.चांगल्या विचारप्रतिमांना गोड व नम्र भाषा वापरली तर त्या प्रतिमा अतिशय सुंदर आकार घेतात. अशा सुंदर सुविचारप्रतिमा माणसांच्या मनास मोठे समाधान देतात.शिवाय त्या प्रतिमा बर्याच काळ टिकतात. या कारणांमुळे संतांच्या विचारांचा प्रभाव शतकानुशतके जशास तसाच टिकून राहतो. भक्त होण्याची आकांक्षा बाळगणा-याने श्रेष्ठ धारिष्ट (धीर) जोपासून आपल्या भोवती अध्यात्मविचारांचे एक सुंदर प्रतिमावालय निर्माण करावे व जनमानसास संतुष्ट करावे असे श्रीसमर्थ त्यांच्या श्लोकात सांगतात.
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें |
मना बोलणें नीच सोशीत जावे |
स्वयें सर्वदा नम्र वाचें वदावें |
मना सर्व लोकांसि रे नीववावें ||
हे मना, अंतर्यामी उत्तम व सात्विक धैर्य धारण करावे. कोणी आपल्याला हलकी दुरुत्तरे केली तरी शांतपणे सोसावीत. पण स्वतः मात्र सर्वदा विनयशील वाणीने भाषण करावे. अशा रीतीने आपल्या सभोवारच्या सर्व लोकांचा अंतरात्मा अगदी शांत करावा, संतुष्ट, तृप्त करावा.
समर्थांची वाणी : स्वतःच्या स्वार्थासाठी दुस-याचा घातपात करू नका
समर्थांची वाणी : भक्तिमार्गाने गेल्यासच ईश्वराचे दर्शन होईल...
(साभार : सार्थ मनाचे श्लोक या पुस्तकातून)