आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्याला आत्मपरीक्षण करायला शिकवतात रामदासांचे 'मनाचे श्लोक'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री समर्थ रामदास स्वामी यांचे वाड.मय एखाद्या विशाल महासागराप्रमाणे आहे.या महासागराची एक जबरदस्त लाट म्हणजे त्यांचे मनाचे श्लोक. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाड.मय निर्मिति केली. दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत.
समर्थांचे मनाचे श्लोक अर्थासहित जाणून घ्या आणि आपले आत्मपरीक्षण व आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न करा...
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥
श्रीसमर्थांनी केलेले हे मंगलाचरण आहे. सर्व गुणांचे अधिष्टान तसेच निर्गुणाचा आरंभ असणारा मूळपुरुष असा जो गणेश त्यास आणि चारही वाणींचे मूळ असणारी शारदा या दोघांना मी नमस्कार करतो. अनंत ईश्वराच्या दर्शनाचा मार्ग मी समजावून देतो.
मानवीजीवनामधील प्रवास व त्यांचे पंथ पुष्कळ आहेत. परंतु इंद्रीयांपासून सुरु होणारा आणि ह्र्दयस्थ आत्म्यापाशी संपणारा आतील प्रवास सर्वात अधिक लांबचा आहे. स्वसंवेद्य व आनंदमय अंतरात्म्यापर्यंत हमखास पोचवणारा मार्ग श्रीसमर्थ येते स्वानुभवाच्या आधाराने सांगत आहेत.
रात्रंदिवस पाहावा अर्थ, अर्थ पाहेल तो समर्थ
( संधर्भ - सार्थ मनाचे श्लोक )