आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेच्या वेळी विवाहित स्त्रीच्या बांगड्यांना कुंकू का लावतात ?

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा करताना स्त्री असो वा पुरुष, त्यांना कुंकू किंवा चंदन टिळा लावण्याची परंपरा आहे. पूजा करविणारे पंडित पूजा करताना पुरुषांच्या कपाळावर टिळा लावतात मात्र स्त्रियांना टिळा न लावता बांगड्यांना कुंकू लावतात. यामागे विशेष कारण आहे.
वेदपाठी ब्राह्मण स्त्रियांच्या बांगड्यांना कुंकू लावतात, कपाळावर नव्हे. विवाहित स्त्रीला पतीशिवाय अन्य पुरुषाने स्पर्श करू नये असे म्हटले आहे. वेद पुराणांनुसार कोणत्याही विवाहित स्त्रीला स्पर्श करण्याचा अधिकार अन्य महिलांशिवाय केवळ तिच्या पतीलाच आहे. अन्य पुरुषांचा स्पर्श झाल्याने तिच्या पतिव्रता धर्मावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच पूजा करताना वेदपाठी ब्राह्मण हे विवाहित महिलांच्या बांगड्यांना कुंकू लावतात. स्त्री आजारी असताना, संकटात असताना वैद्य किंवा डॉक्टराचा स्पर्श चालू शकतो. यामुळे पतिवर्ता धर्म नष्ट होत नाही.