आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC प्रगतिपुस्तक : भारताला आतापर्यंत एकच कांस्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन ऑलिम्पिकचा जवळपास अर्धा प्रवास संपत आला आहे. ऑलिम्पिकचे सात दिवस झाले असून भारताच्या 81 सदस्यीय पथकाकडून आतापर्यंत केवळ एक कांस्यपदक हाती आले आहे. गुरुवारी रंजन सोढीकडून अचूक नेम साधत पदकाची आशा होती. मात्र, तो क्वालिफिकेशन राउंडमध्ये 11 व्या स्थानी आला. याबरोबरच तो स्पर्धेबाहेर झाला.

यशस्वी भारतीय खेळाडू
1. गगन नारंग : नांरगने 30 जुलै रोजी 10 मी. एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकून देशाला गगनावर पोहोचवले. त्याचे दोन इव्हेंट अजून शिल्लक आहेत. 50 मी. प्रोन रायफल आणि 50 मी. रायफल थ्री पोझिशनमध्ये तो खेळणार आहे. त्याच्याकडून आणखी एका पदकाची आशा आहे.
2. सायना आणि पी. कश्यप : बॅडमिंटनमध्ये युवा खेळाडू सायना नेहवाल आणि पी. कश्यप यांनी दमदार प्रदर्शन करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायनाकडून भारताला सुरुवातीपासून पदकाची आशा होती. मात्र, कश्यपने क्वार्टरमध्ये स्थान मिळवून बॅडमिंटनमध्ये आशा वाढवल्या आहेत. या दोघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर इतिहास रचतील.
भारतीय बॉक्सिंगपटूंची जादू
भारतीय बॉक्सिंगपटू विजेंद्रसिंग, मनोजकुमार यांची जादू ऑलिम्पिकमध्ये रंगात आहे. या खेळाडूंनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बीजिंग ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता विजेंद्रकडून सर्वांनाच पदकाच्या आशा आहेत. मात्र, मनोजकुमार आणि जयभगवान यांनीही आशा पल्लवित केल्या. जयभगवानचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. मात्र, विजेंद्र आणि मनोजकुमार पदकापासून दोन पावले दूर आहेत. प्री क्वार्टर आणि क्वार्टरच्या लढती जिंकल्यास त्यांचे पदक निश्चित होईल.
भारताचे सुपरफ्लॉप खेळाडू
1. अभिनव बिंद्रा : 10 मीटर एअर रायफलच्या क्वालिफिकेशन फेरीत बाहेर.
2. रंजन सोढी : रॅपिड फायर पिस्तूलच्या क्वालिफिकेशनमध्ये बाहेर.
3. दीपिकाकुमारी (रिकर्व तिरंदाजी) : राउंड ऑफ 32 मधून बाहेर.
4. पुरुष तिरंदाजी टीम (राहुल बॅनर्जी, जयंत तालुकदार, तरुणदीप) राउंड ऑफ 32 मधून बाहेर.
5. भूपती-बोपन्ना : दुसºया फेरीत ढेपाळले.
6. ज्वाला गुट्टा-व्ही. दीजू : साखळीतच पराभूत.
हे दुर्दैवी ठरले
काही खेळाडूंना नशिबाने साथ दिली नाही. बॅडमिंटनमध्ये ज्वाला-अश्विनी विजयानंतरही एका गुणाच्या अंतराने स्पर्धेबाहेर झाल्या. दुसरीकडे, बॉक्सिंगमध्ये सुमीत सांगवाननुसार (लाइट हेवीवेट 81 किलो) चुकीच्या स्कोअरिंगमुळे त्याचा पराभव झाला. टेनिसमध्ये पेस-विष्णू पहिल्यांदा आंतरराष्टÑीय स्पर्धेत एकत्रित आले. त्यांची कामगिरी चांगली राहिली. मात्र, दुसºया फेरीत पराभव झाला.

यांनी धक्कादायक कामगिरी केली
रोइंगमध्ये स्वर्णसिंगने क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवून सर्वांना चकित केले. तो फायनलमध्ये पोहोचू शकला नाही. मात्र, त्याने अनेकांकडून प्रशंसा मिळवली.
बॉक्सिंगच्या लाइटवेट (49 किलो) मध्ये देवेंद्रोने पहिला सामना अवघ्या 2.19 मिनिटांत जिंकून खळबळ माजवली.