आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिट
विष्णुवर्धनबरोबर लियांडर पेस
महिनाभर चालेल्या वादानंतर भारताचा टेनिस स्टार लियांडर पेस जेव्हा विष्णुवर्धनबरोबर मैदानात उतरला, तेव्हा वाटलेही नसेल की इतक्या सहज त्यांना विजय मिळवता येईल. हा सामना जरी तीन सेटपर्यंत रंगला असला तरी त्यांनी मिळवलेला विजय खूपच महत्वाचा आहे.
विष्णुवर्धनची पेसबरोबर जोडी करण्याच्या निर्णयावर मोठया प्रमाणात टीका करण्यात आली होती. अशातच कमी अनुभव असलेल्या विष्णुवर्धनच्या साथीने सामना जिंकणे ही पेसच्या खेळाप्रती असलेली उत्कठ भावनाच दर्शवते. विष्णुवर्धनला जास्तीत जास्त मदत करता येईल तितकी मी करेन असे, पेसने पूर्वीच म्हटले होते. दुसरीकडे महेश भूपती आणि रोहन बोपन्ना जोडीनेही आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.
आणि मिलुटीटीला अश्रू अनावर झाले...
ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला मेडल मिळवून देणे, तेही गोल्ड आणि त्यातच देशाचेही पहिलेच गोल्ड मेडल, अशाप्रसंगी त्या खेळाडूच्या आनंदाचा तुम्ही अंदाजच लावू शकता.
लिथुआनियाची 15 वर्षीय रूटा मिलुटीटीला जेव्हा याची जाणीव झाली, तेव्हा तिला आपले आनंद्राश्रू रोखता आले नाही. 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये तिने अमेरिकेच्या रेबेका सोनीचा पराभव करून गोल्ड मेडल प्राप्त केले. आपण सुवर्ण पदक मिळवले आहे याचा मिलुटीटीला विश्वासच बसत नव्हता.
साईनाने उडवली झोप
लंडन ऑलिम्पिकमध्ये ज्यापद्धतीने साईना नेहवालची वाटचाल सुरू आहे, त्यावरून तिला पदकाची दावेदार का म्हणतात याची अनुभूती येते. आपल्या दुस-या सामन्यात तिने ज्या पद्धतीने खेळ केला त्यावरून अनेकांची झोप निश्चितच उडालेली असणार.
साईना यावेळी भरपूर तयारीत आल्याचे दिसत आहे. आपल्या विजयक्रम तिला कायम ठेवायचा आहे. तिची बॉडी लँग्वेज आणि खेळण्याची पद्धत पाहता, यावेळी ती निश्चितपणे नवा इतिहास निर्माण करेल असे वाटते.
भारतीय बॅडमिंटनसाठी चांगला दिवस
सोमवारचा दिवस भारतीय बॅडमिंटनसाठी लकी ठरला. साईनानंतर ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाने दुहेरीमध्ये विजय मिळवला. चांगल्या सुरूवातीनंतरही एकवेळ दोघे मागे पडतील की काय असे वाटत होते. दुसरा गेम त्यांच्या हातातून गेला. परंतु, तिस-या आणि निर्णायक गेममध्ये दोघांनी योग्य ताळमेळीने खेळ केला. खरंतर तिसरी गेमही अवघड होती. मात्र योग्यवेळी ज्वाला आणि पोनप्पाने चांगले शॉट मारले.
किम उन गुकचा जागतिक विक्रम
पुरूषांच्या 62 किलोग्रॅम वेटलिफ्टींगमध्ये उत्तर कोरियाच्या किम उन गुकने जागतिक विक्रमासहित सुवर्ण पदक जिंकले. 23 वर्षीय किमने स्नॅचमध्ये 153 किलोग्रॅम वजन उचलून जागतिक विक्रमाची बरोबर करून ऑलिम्पिक विक्रम मोडला.
त्याने क्लिन आणि जर्कमध्ये 327 किलोग्रॅम वजन उचलून नवा विक्रम बनवला. लंडन ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाने आतापर्यंत तीन सुवर्ण पदके जिंकली आहेत.
मिस
बिंद्राचा निशाण चुकला
बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्ण पदक विजेत्या अभिनव बिंद्राला 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीसाठी पात्र ही ठरता आले नाही. दिवसभर भारतीय दलात याचीच चर्चा मोठयाप्रमाणात होती. सुवर्ण पदक विजेत्या बिंद्राला अंतिम फेरीत खेळण्याची संधीही मिळणार नाही यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.
पात्रता फेरीत त्याचे प्रदर्शनही चांगले नव्हते. विशेषत: शेवटच्या फेरीत त्याने तीन चुकीचे शॉट मारले. त्यामुळे त्याचा पराभव निश्चितच झाला होता.
हॉलंडने टीम इंडियाला हरवले...
चांगला खेळ करूनही भारतीय हॉकी टीमला हॉलंडविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला. हॉलंडने हॉकी टीमला 3-2 ने पराभव करून ऑलिम्पिक अभियानाची विजयी सुरूवात केली.
विशेष म्हणजे भारतीय हॉकी टीम या ऑलिम्पिकध्ये विशेष काही करणार नाही, असे पालपूद सर्वांनीच पहिल्यापासून सुरू ठेवले आहे. मात्र हॉलंडला पराभूत करेल असा कुणीच विचार केला नसेल. आता उर्वरित सामन्यात टीमला जीव ओतून खेळावे लागेल.
भारतीय बॉक्सरकडून अपेक्षा...
भारतीय बॉक्सरांकडून लंडन ऑलिम्पिकध्ये मोठया अपेक्षा होत्या. मात्र आता परिस्थिती अशी आहे की दोन महत्वाचे बॉक्सर स्पर्धेतून बाहेर झालेत. शिव थापानंतर सुमित सांगवान देखील आता बाहेर पडला आहे. सुमित तसा दुर्दैवी ठरला आहे. तरीसुद्धा उर्वरीत बॉक्सरकडून अजूनही अपेक्षा आहेत.
आनंद हिरावला...
ग्रेट ब्रिटनच्या जिम्नॅस्टिक संघाला अंतिम फेरीतनंतर रौप्य पदकाची घोषणा करण्यात आली होती. मात्र जपानने अपील केल्यामुळे ब्रिटनला ब्रॉन्झ पदक देण्याचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे आनंद साजरा करणा-या संघाला अचानक धक्का बसला.
युक्रेनच्या संघाला तर पदकाच्या स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागले. जपानचा संघ चौथ्या स्थानावर होता. मात्र अपील केल्यानंतर त्यांना दुसरे स्थान मिळाले.
महिला तिरंदाजी संघाची निराशा
लंडन ऑलिम्पिकला भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी महिला तिरंदाजांकडून मोठया प्रमाणात अपेक्षा करण्यात आली होती. मात्र त्यांनी सगळयांच्या अपेक्षेवर पाणी फेरले. सांघिक स्पर्धेत महिला संघाला बाहेर पडावे लागले. त्यापूर्वी पुरूष संघालाही सांघिक स्पर्धेत चमक दाखवता आली नव्हती. एकेरीमध्ये बॉम्बायला देवीचेही आव्हान संपुष्टात आले आहे. आतातर पुरूष नेमबांजाकडूनही जास्त अपेक्षा केल्या जात नाहीत. आता थोडीफार ज्या अपेक्षा आहेत त्या दीपिका कुमार कडूनच.
OLYMPIC : चीनी जलतरणपटूविरोधात डोपिंगची शंका
OLYMPIC: गोंधळामुळे बाहेर पडला अभिनव बिंद्रा
LONDON OLYMPIC : गगन नारंगवर सेलिब्रेटींचा शुभेच्छांचा वर्षाव
OLYMPIC : खेळांदरम्यान प्रेग्नंट राहू इच्छिते व्हिक्टोरिया
OLYMPIC: अजब... सात समुद्र पार करुन दोन वर्षांनी गाठले लंडन
OLYMPIC तिसरा दिवस: ज्वालाचा राग आणि सायनाचा विजय
OLYMPIC दिवस दुसराः सायना, विजेंद्र, जयभगवान जिंकले !
OLYMPIC पहिला दिवस- हिट आणि मिस
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.