आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- मिस...
ज्वाला गुट्टा को गुस्सा क्यों आता है...
बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी आणि दुहेरीमधील पदकाची दावेदार समजल्या जाणा-या ज्वाला गुट्टाने कोर्टवर आणि कोर्ट बाहेर आपल्या विचित्र वर्तनामुळे सगळयांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कोर्टवर तर तिचे प्रदर्शन बेकार होतेच, शिवाय तिची वर्तणूकही चांगली नव्हती. सामन्याच्या दरम्यान पहिला गेम हरलेल्या ज्वालाने एक वेळा अंपायरशी वाद घातला. नंतर खूप वेळ कोर्टवर ती आपला राग व्यक्त करीत होती. या सर्वाचे रूपांतर पराभवत झाले.
सामन्यानंतर सर्व खेळाडू माध्यमांशी चर्चा करतात. खेळाडूंना माध्यम कक्षात घेऊन जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खास कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. मात्र सामना हरल्यानंतर ज्वालाने त्यांना झिडकारले. त्याचप्रमाणे सामन्याच्यावेळी व्ही.दीजू बरोबरचे तिचे वर्तन ही चर्चेत राहिले. ज्वालाची परिस्थिती अशीच राहिली तर तिच्याकडून जास्त अपेक्षा न केलेल्याच ब-या...
भारतीय खेळाडूंचा सुटला संयम
पराभव पचवणे सोपे नसते हे खरे आहे. मात्र पराभवानंतरही जो संयम राखतो आणि आपल्या भावना नियंत्रणात ठेवतो, त्यालाच अनुभवी खेळाडू म्हणता येईल.
शिव थापा पराभूत झाल्यानंतर रागाने माध्यमांपासून दूर पळाला. दीपिकाकुमारी सांघिक स्पर्धेत हरल्यानंतर हात झटकून तशीच गेली. ज्वालाने तर हद्दच केली.
याप्रकरणी भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून शिकण्याची गरज आहे.
अर्धवट राहिले स्वप्न...
ब्रिटनची मॅरेथॉन स्पर्धक पाऊला रेडक्लिफचे ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचे स्वप्न अर्धवटच राहणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये काही तरी करून दाखवण्याच्या इच्छेने आलेल्या रेडक्लिफच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.
उल्लेखनीय म्हणजे मॅरेथॉनमध्ये रेडक्लिफने विश्वविक्रम नोंदवलेला आहे. परंतु, ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यापासून ती आता दूर गेली आहे.
डोपिंगचे सावट
ड्रग टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे उजबेकिस्तानची आर्टिस्टिक जिम्नॅस्ट लुजिया गॅलियोलिनाला ऑलिम्पिकमधून बाहेर व्हावे लागले आहे. अजून तिची बी सॅम्पल टेस्ट व्हायची आहे. त्यानंतर तिच्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मोठया प्रमाणावर डोप टेस्ट करत आहे.
प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद
ऑलिम्पिकमधील अनेक सामन्यांदरम्यान रिकामी आसने सगळयांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही आसने ऑलिम्पिक परिवारासाठी सुरक्षित ठेवण्यात आल्याचा खुलासा संयोजन समितीने केला आहे. खरं देवच जाणो...
हिट...
शाईनिंग सायना
भारताची बॅडमिंटन स्टार सायनाने आपल्या ऑलिम्पिक अभियानाची सुरूवात एकदम शानदार केली. पहिल्या फेरीत तिला फारसा प्रतिकार करावा लागला नाही. तरीसुद्धा तिने आक्रमकपणे सामना खेळला . कोर्टवरची तिची मुव्हमेंटही पाहण्यासारखी होती. आत्ताच स्पर्धेला सुरूवात झाली आहे, याची सायनाला कल्पना आहे. त्यामुळे लगेच जास्त आनंद साजरा करायची गरज नसते. हीच गोष्ट सायनाने सामना संपल्यानंतर बोलताना सांगितले. अनुभवाने सायना मॅच्यूर होत असल्याचे हे संकेत आहेत.
ब्रिटनचे पहिले मेडल
लिजी आर्मिटस्टेडने रोड रेसमध्ये आपल्या देशाला पहिले पदक मिळवून दिले. तिने सिल्वर पदक पटकाविले. हॉलंडच्या मेरियान व्होसला मागे टाकून तिने हे पदक मिळवले. तिच्यामुळे ब्रिटनचे खाते उघडले गेले. येणा-या काळात ब्रिटन पदक तालिकेत कोणत्या क्रमांकावर राहिल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मोठी उलथापालथ
ऑलिम्पिक फुटबॉल सामन्यात सेनेगलाचा संघ उरूग्वेविरूद्ध मैदानात उतरल्यानंतर मोठी उलथापालथ होईल असे कोणाला वाटलेच नसेल. कारण उरूग्वेचा संघ 2010 साली झालेल्या विश्वचषकात सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. परंतु, या सामन्यात त्यांचे प्रदर्शन खास राहिले नाही. सेनेगलचा स्टार खेळाडू मुसा कोनाटेने दोन्ही हाफमध्ये गोल करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे उरूग्वे संघाला मोठा झटका बसला.
जागतिक विक्रम
ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवायचे तेही विश्वविक्रमासहित हे अमेरिकेची जलतरणपटू डाना वूल्मरचे स्वप्न होते.
लंडन ऑलिम्पिकध्ये तिचे हे स्वप्नही पूर्ण झाले. आणि 56 सेकंदापेक्षाही कमी वेळेत तिने बटरफ्लाई स्पर्धा पूर्ण केली. डानाने 100 मीटर बटरफ्लाई स्पर्धेत 55.98 अशी विक्रमी वेळ नोंदवली. पाण्यामध्ये ती अक्षरश: पळत असल्यासारखी दिसत होती. शेवटी तिने आपले स्वप्न पूर्ण करून दाखवलेच.
OLYMPIC दिवस दुसराः सायना, विजेंद्र, जयभगवान जिंकले !
OLYMPIC दुसरा दिवस: हे ठरले हिट, हे झाले फ्लॉप
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.