आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OLYMPIC पाचवा दिवस: देवेंद्रो सिंगचा दम तर भूपती-बोपण्‍णाची हार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिट...
देवेंद्रो सिंगचा दम...
मंगळवारचा दिवस उदयोन्‍मुख भारतीय बॉक्‍सर देवेंद्रो सिंग याने गाजवला. 49 किलोग्रॅम गटात त्‍याने होंडुरासच्‍या फिग्‍वेरावर फक्‍त दोन मिनिटे आणि 24 सेकंदातच विजय मिळवला. देवेंद्रो रिंगणात इतका आक्रमक होता की फिग्‍वेरा त्‍याच्‍या पहिल्‍या ठोशासमोरच निष्‍प्रभ ठरला. शेवटी रेफ्रीला सामना थांबवावा लागला.
बघण्‍यासारखा खेळ...
ऑलिम्पिकपूर्वी भारतीय बॅडमिंटनपटू पारूपल्‍ली कश्‍यपकडून कदाचित कोणीही अपेक्षा केली नसेल. मात्र कश्‍यपने आपल्‍या प्रदर्शनाने सर्वांचे मन जिंकले आहे. कालच्‍या सामन्‍यातही त्‍याने आपली चमक दाखवली.
ऑलिम्पिक विक्रम...
चीनच्‍या शिवेनने 400 मीटर मेडलेमध्‍ये जागतिक विक्रम करून गोल्‍ड मेडल मिळवले होते. 200 मीटर वैयक्तिक मेडलेमध्‍येही शिवेनने 7.57 सेकंदाचा नवा ऑलिम्पिक विक्रम आपल्‍या नावे केला.
शिवेनच्‍या पोहण्‍याच्‍या शैलीवरूनही मोठा वाद झाला. मात्र तिच्‍यावर करण्‍यात आलेल्‍या सर्व आरोपातून तिला क्‍लीन चिट मिळाली.
ब्राझीलवर मात
आजच्‍या दिवसाचे वैशिष्‍ट म्‍हणजे ब्रिटनच्‍या महिला संघाने ब्राझीलला हरवले. ब्रिटनने जरी हा सामना 1-0 असा जिंकला असला तरी त्‍यांनी मैदानावर जबरदस्‍त प्रदर्शन केले. त्‍यांनी आपल्‍या गटात अग्रस्‍थान पटकाविले.
ऑलिम्पिकमधील सर्वात जास्‍त वेळ चाललेला सामना
फ्रान्‍सच्‍या विल्‍फ्रेड त्‍सोंगाने ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात जास्‍त वेळ चालणारा सामना खेळला आणि त्‍यात विजयही मिळवला. मिलोस राओनिचविरूद्ध झालेला हा सामना 48 व्‍या गेमपर्यंत रंगला. त्‍सोंगाने पहिलासेट 6-3 ने जिंकला होता. मात्र दुस-या सेटमध्‍ये त्‍याला 3-6 ने गमवावा लागला होता. तिसरा आणि निर्णायक सेट त्‍सोंगाने 25-23 ने जिंकला.
मिस...
याचसाठी केला होता अट्टहास !
ऑलिम्पिकमध्‍ये एकत्र खेळण्‍यासाठी महेश भूपथी आणि रोहन बोपण्‍णा यांनी भरपूर गोंधळ घातला. महिनाभर आपल्‍या वादाने त्‍यांनी माध्‍यमांचे तसेच देशातील क्रीडाशौकिनांचे लक्ष वेधून घेतले होते.
ऑलिम्पिकमध्‍ये खेळण्‍यासाठी टेनिस असोसिएशनसमोर अटी ठेवण्‍यात आल्‍या. मात्र आता दुस-या फेरीतच त्‍यांना बाहेर पडावे लागले. आता भूपथी काय म्‍हणणार, त्‍याने तर विजयासाठी ही जोडी जमवली होती.
गमावलेला सामना जिंकला...
हार कर जीतनेवाले को बाजीगर कहते है, मात्र विजय मिळवूनही पराभूत होण्‍याला काय म्‍हणतात हे माहित नाही. पण काहीही असू द्यात ज्‍वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्‍पासाठी दुहेरीतील स्‍पर्धा त्रासदायकच ठरली.
महिलांच्‍या दुहेरी बॅडमिंटन स्‍पर्धेच्‍या आपल्‍या शेवटच्‍या सामन्‍यात ही भारतीय जोडी विजयी तर झाली. पण स्‍पर्धा इतकी तगडी होती की समीकरणात ते मागे पडले आणि ऑलिम्पिकच्‍या बाहेरच गेले.
ये तीर क्‍यू नही लग रहा है !
लंडन ऑलिम्पिकमध्‍ये आतापर्यंत भारतीय तिरंदाजी संघ कमालीचा अयशस्‍वी ठरला आहे. दीपिका वगळता सर्व स्‍पर्धक आ‍ता बाहेर पडले आहेत. त्‍यामुळे दीपिकाही काही कमाल करते का ? तेच पाहायचे आहे.
लंडनमध्‍ये आतापर्यंत दीपिकाचे प्रदर्शन साधारणच राहिले आहे. तिने सोडलेला तीर गोल्‍ड मेडलचा वेध घेईन असे वाटत नाही.
यजमान बाहेर...
बॅडमिंटनमधून ब्रिटनचा संघ बाहेर पडला आहे. कोणत्‍याही इव्‍हेंटमध्‍ये ब्रिटनचा खेळाडू बाद फेरीपर्यंत पोहचू शकलेला नाही. एकेरी आणि मिश्र दुहेरीमध्‍येही त्‍यांना पुढे जाता आले नाही. विशेष म्‍हणजे ब्रिटनमध्‍ये आजही बॅडमिंटनची भरपूर क्रेझ आहे.
OLYMPIC चौथा दिवस: सायनाची घौडदौड सुरूच तर सांगवान ठरला दुर्दैवी
OLYMPIC तिसरा दिवस: ज्‍वालाचा राग आणि सायनाचा विजय
OLYMPIC दुसरा दिवस: हे ठरले हिट, हे झाले फ्लॉप