आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Olympic Silver Medallist Vijay Kumar Gets Promotion In Army

रौप्य पदक विजेता विजय कुमार बनला सुभेदार मेजर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लंडन ऑलिंपिकमध्ये देशाला रौप्य पदक मिळवून देणारा शूटर विजय कुमार याला भारतीय लष्करात बढती मिळाली आहे. विजय कुमारची सुभेदार पदावरून बढती करून त्याला सुभेदार मेजर बनविण्यात आले आहे. लष्करप्रमुख विक्रमसिंह यांनीही विजयच्या शानदार कामगिरीचे कौतुक केले आहे. विजय कुमारने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक पटकावले होते.
या बढतीसह विजयला 15 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. यापूर्वी विजयने दिल्ली राष्ट्रकुल आणि ग्वांग्झू आशियाई स्पर्धेतही शानदार कामगिरी केली होती. हिमाचल सरकारतर्फे दिला जाणारा 'हिमाचल गौरव पुरस्कार' देऊन विजय कुमारला स्वातंत्र्यदिनी सन्मानीत करण्यात आले. एक कोटी रूपये रोख, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
अनेक वर्षापासून बढती मिळत नसल्याने नाराज असलेल्या विजय कुमारने लष्कराला रामराम ठोकण्याची तयारी केली होती. परंतु आपल्या कामगिरीची लष्कराने दखल घेतल्यानंतर विजयने विचार बदलवला असल्याचे स्पष्‍ट केले.