आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Paes sania Enters Quarter finals Of The Mixed Doubles Event

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OLYMPIC : पेस-सानिया मिर्झा जोडी उपांत्यपूर्व फेरीत, विजयानंतर रडला पेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - लंडन ऑलिपिंकमध्ये भारताच्या लिअँडर पेस व सानिया मिर्झा या जोडीने टेनिसमध्ये मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत पेस- सानिया जोडीने सर्बियाच्या ऍना इव्हानोविच- नेनाद झिमॉनजिच या जोडीवर सहज मात केली. भारताच्या या जोडीने हा सामना 6-2, 6-4 असा अगदी सरळ सेट्समध्ये जिंकला. आता त्यांचा उपांत्य फेरीतील लढत अव्वल मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्का-मॅक्स मिर्नी या बेलारूसच्या जोडीबरोबर होईल
या विजयानंतर लिअँडर पेस रडताना दिसला. याबाबत त्याला विचारले असता तो म्हणाला, गेल्या दोन महिन्यापासून माझ्यासोबत जे काही होत आहे त्यामुळे मला अश्रू आवरता आले नाहीत.
याआधी टेनिस टीमच्या निवडीवरून बरेच वाद झाले होते. पेसने ऑलिंपिकच्या टेनिसच्या दुहेरी स्पर्धेत जोडी बनविताना महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांच्याबरोबर खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याने विष्णूवर्धन यांच्याबरोबर जोडी बनविली होती. त्याच दरम्यान पेसच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सानिया नाराज झाली होती. आता मात्र या जोडीने मिश्र दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
OLYMPIC: विजेंद्र सिंगचा विजय, सुपर सायनाची उपांत्‍यफेरीत धडक