आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Reaches Semi Final Of London Olympic

OLYMPIC: सुपर सायना ‘फुल’ फॉर्मात, उपांत्‍यफेरीत धडक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताचा अव्‍वल मुष्‍टीयोद्धा‍ विजेंद्र सिंगने उपांत्‍यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अमेरिकेच्‍या टी. गौशा याचा त्‍याने पराभव केला. हा सामना अतिशय चुरशीचा ठरला. अवघ्‍या एका गुणांच्‍या फरकाने तो विजेता ठरला. पहिला राऊंड त्‍याने 3-4 असा जिंक्ला. हीच आघाडी महत्त्वाची ठरली. पुढचे दोन्‍ही राऊंड बरोबरीत सुटले.
सुपर सायनाची उपांत्‍यफेरीत धडक
सायना नेहवालने गुरुवारी बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक दिली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व लढतीत सायनाने डेन्मार्कच्या टीन बून हिला 21-15, 22-20 ने नमवत बाजी मारली. दुस-या गेममध्ये सायनाने 13-10 अशी आघाडी घेतली. मात्र, टीनने 15-15 अशी बरोबरी केली. दोन्ही खेळाडू एकेक गुण घेत होते. अखेर 20-20 अशी बरोबरी झाली. यानंतर सायनाने सलग दोन गुण मिळवत 22-20 ने सामना जिंकला. चौथी मानांकित सायनाने अत्यंत आक्रमक खेळ करताना डेन्मार्कच्या खेळाडूचे आव्हान अवघ्या 39 मिनिटांत मोडून काढले.
पुढे आव्हान चीनचेच -सायनापुढे अत्यंत कठीण आव्हान आहे. उपांत्य सामन्यातील उर्वरित तिन्ही अव्वल मानांकित यिहान वांग, दुसरी मानांकित झीन वांग व तिसरी मानांकित झिरुइ ली या खेळाडू चीनच्या आहेत.
सेमीफायनल लाइनअप
1. सायना (भारत) वि. यिहान वांग (चीन)
2. झीन वांग (चीन) वि. झिरुई ली (चीन)
पाच चुकीच्या निर्णयांनंतरही अविचल राहिले : सायना
उपांत्यपूर्व लढतीतील विजयानंतर सायना म्हणाली, दुस-या गेममध्ये 20-17 अशी विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या टीन बूनने सलग चुका केल्या. 20-19 अशा गुणसंख्येवर लाइन फॉल्टमुळे ती ‘अपसेट’ झाली आणि मॅच हरली. माझ्याविरुद्ध लाइन फॉल्टचे 5 वेळा असे चुकीचे गुण दिले गेले. मी किती अपसेट व्हायला हवे होते? मी शांत राहिले. प्रशिक्षक मागून सतत सांगत होते, अपसेट होऊ नकोस. खेळावरच लक्ष केंद्रित कर. बीजिंगचे अपयश विसरून भारताचे नाव उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने आले आहे. बीजिंग व आताचे ऑलिम्पिक यात मोठा फरक आहे. त्या वेळी अटीतटीच्या लढतीत किंवा गुण घेताना मी हरायचे. आता मात्र अशा समर प्रसंगातून मी विजयी होऊन बाहेर पडले. 4 वर्षांतील अनुभवाची ती शिकवण आहे.
संघर्षापूर्ण लढतीत कश्यपचा 21-19, 21-11 ने पराभव
अव्वल मानांकित मलेशियाच्या ली चोंगविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी. कश्यपने पहिल्या फेरीत शानदार प्रदर्शन केले. कश्यपने सामना गमावला, मात्र दमदार प्रदर्शनाने त्याने सर्वांची मने जिंकली. ली चोंग वेईने त्याला 21-19, 21-11 ने पराभूत केले. कश्यप पहिल्या गेममध्ये 19-18 ने पुढे होता. मात्र, ली चोंग वेईने सलग तीन गुण जिंकत गेम जिंकला. चोंग वेईने पुन्हा दुस-या गेममध्ये कश्यपला कोणतीच संधी दिली नाही. त्याने हा गेम अवघ्या 17 मिनिटांत 21-11 ने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
हे भगवान ...!- भारताचा युवा बॉक्सिंगपटू जयभगवान लाइटवेट गटाच्या (60 किलो) प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला. चांगल्या सुरुवातीनंतर दुस-या आणि तिस-या फेरीतील सुमार कामगिरीमुळे त्याचा 16-8 ने पराभव झाला. त्याला कझकस्तानच्या गनी झालीओवने नमवले. जागतिक क्रमवारीत जयभगवान 12 व्या क्रमांकावर आहे.
विजयकुमार चमकला- नेमबाजीतील 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताच्या विजयकुमारने पहिल्या स्टेजमध्ये चांगली कामगिरी केली. गुरुवारी झालेल्या इव्हेंटमध्ये विजयकुमारने 30 शॉट मारताना 293 गुणांसह सहावे स्थान मिळवले. शुक्रवारी याच खेळातील दुस-या स्टेजची कामगिरी रंगेल. यातही विजयकुमारने चांगला स्कोअर केल्यास तो फायनलसाठी पात्र ठरू शकतो. रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात खेळाडूंना दोन दिवसांत प्रत्येकी 30 शॉट मारावे लागतात. दोन दिवसांच्या कामगिरीवरून फायनलचे दावेदार ठरतात.
रंजन ढेपाळला!- बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानंतर डबल ट्रॅप नेमबाजीत वर्ल्ड नंबर वन रंजन सोढीसुद्धा क्वालिफिकेशन राउंडमध्ये स्पर्धेबाहेर झाला. अतिशय सुमार कामगिरी करताना तो 11 व्या स्थानी आला. सोढीने तीन सिरीजमध्ये 48, 44 आणि 42 अशा स्कोअरसह एकूण 134 गुण मिळवले. या स्पर्धेतून सहा नेमबाजांनी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. सहावा नेमबाज हंगेरीच्या रिचर्ड बोगनारचा स्कोअर 137 असा होता. इंग्लंडच्या रॉबर्ट रसैलने सर्वाधिक 143 गुण घेऊन क्वालिफिकेशनमध्ये नंबर वन स्थान मिळवले. रशियाचा वेसिली मोसिन (140) दुस-या, तर कुवैतचा फेहद अल्दीहानी (140) तिस-या स्थानावर होते. या स्पर्धेच्या क्वालिफिकेशनमध्ये ऑलिम्पिक रेकॉर्ड 145, तर विश्वविक्रम 148 गुणांचे आहे.
OLYMPIC प्रगतिपुस्तक : भारताला आतापर्यंत एकच कांस्य
OLYMPIC दृष्‍टीक्षेपः फेडरर, सेरेना, शारापोवा उपांत्य फेरीत
OLYMPIC: हैतीच्‍या खेळाडूचे फेसबुकला साकडे !
OLYMPIC: आखाड्यात चक्‍क अश्रूंच्‍या धारा !
OLYMPIC : खेळांदरम्यान प्रेग्नंट राहू इच्छिते व्हिक्टोरिया
OLYMPIC: अजब... सात समुद्र पार करुन दोन वर्षांनी गाठले लंडन