आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्युडो विजेत्याची पुतीननी घेतली गळाभेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ज्युडोच्या सुवर्णपदकाच्या लढतीवेळी प्रेक्षक म्हणून अस्वस्थपणे बसलेला एक कोटधारी माणूस रशियन ज्युडोपटूने सामना जिंकताच उसळून उठला आणि थेट मॅट एरियाकडे धावला. प्रेक्षकांना काही कळायच्या आत सुवर्णविजेत्याला त्यांनी मिठी मारल्यावरच सर्व प्रेक्षकांच्या लक्षात आले की ते आहेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन.
एकेकाळचे ज्युडोतील ब्लॅकबेल्ट असलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची त्या खेळाशी असलेली मानसिक जवळीक आजही कायम असल्याचा प्रत्यय त्यांच्या ऑलिम्पिकमधील उपस्थितीतून निदर्शनास आला. ज्युडोतील 100 किलो गटातील फायनलच्या लढतीवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून पुतीन यांनी ज्युडोतील सुवर्णपदक विजेत्या तागीर खाइबुलाएव्ह याला कडकडून मिठी मारून त्याचे अभिनंदन केले. त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून त्यांनी ‘वेल डन’ म्हणत त्याचे अभिनंदन केले. या अभिनंदनाच्या वर्षावाप्रसंगी त्यांनी ‘तुझा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो’ असे शब्द त्यांनी माझ्या कानात बोलल्याचे खाइबुलाएव्ह याने सांगितले. पुतीन गुरुवारीच लंडनमध्ये दाखल झाले होते. राजकीय दौºयाच्या निमित्ताने लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी थेट 10 डाऊनिंग स्ट्रीट या ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तिथे सुमारे 45 मिनिटे चर्चा केल्यानंतर पुतीन हे कॅमेरून यांच्यासह क्रीडाग्रामकडे रवाना झाले.तिथे त्यांनी प्रथम महिलांच्या 78 किलोग्रॅम वजनी ज्युडो अंतिम फेरीचा सामना पाहिला. त्यानंतर ते पुरुषांच्या 100 किलो वजनी गटातील सामन्याकडे वळले.पुतीन यांचे ज्युडोप्रेम
रशिया हे संघराष्ट्र
(यूएसएसआर) असेपर्यंत तेथील अनेक खेळाडूंनी जगावर अधिराज्य गाजवले आहे. त्याच देशाचे राष्ट्राध्यक्ष असलेले पुतीन हे ज्युडोमधील ब्लॅकबेल्ट आहेत, हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र त्यांनी या विषयावर पुस्तकदेखील लिहिले असल्याचे फारसे कुणाला माहीत नाही. ‘ज्युडो हिस्ट्री :थेअरी अँड प्रॅक्टिकल’ हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे. त्याशिवाय त्यांना कार रेसिंग, फुटबॉल, आइस हॉकी आणि स्किइंग हे खेळही आवडतात.