आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्‍ये चांगला करार मिळावा म्‍हणून खोटे बोललो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- आयपीएलमध्‍ये आपल्‍या फ्रँचायजीकडून ब्‍लॅकमध्‍ये पैसे मिळाल्‍याचा आरोप असणा-या मोहनीश मिश्राने 'दैनिक भास्‍कर'शी खुलेपणाने चर्चा केली. तो सध्‍या पुण्‍यामध्‍ये आहे. मोहनीश मिश्राशी पुढीलप्रमाणे चर्चा झाली.
प्रश्‍न- सहाराने तुला 1.45 कोटी रूपये दिले आहेत काय?
मोहनीश- पुढच्‍या वर्षी मला चांगला करार मिळावा म्‍हणून मी असे बोललो. गेल्‍या चार महिन्‍यांपासून दोन एजंट मला सातत्‍याने फोन करीत होते. पुढच्‍यावर्षी दोन कोटीचा करार मिळवून देण्‍याचे ते मला सांगायचे. फक्‍त त्‍यासाठी सध्‍याच्‍या संघाकडून दीड कोटी रूपये मिळतात असे सांगण्‍यासाठी त्‍यांनी मला म्‍हटले होते.
प्रश्‍न- ते एजंट कोण होते? कोणत्‍या संघाकडून दोन कोटीचा करार करणार असल्‍याचे म्‍हटले होते?
मोहनीश- मी त्‍यातील एकाला ओळखतो. त्‍याचे नाव रियाज हक आहे. दुस-याला मी ओळखत नाही. ते मुंबई इंडियन्‍सबरोबर करार करण्‍याचे सांगत होते.
प्रश्‍न- सहारा बरोबर कितीचा करार झाला आहे?
मोहनीश- वार्षिक 30 लाख रूपये. पुढच्‍यावर्षी करार संपणार आहे.
आम्‍ही दिले नाहीत जास्‍तीचे पैसे
'आम्‍ही कोणत्‍याही खेळाडूला स्‍लॅबपेक्षा जास्‍त पैसे दिलेले नाही. आम्‍ही असे का करू? जर एखादा खेळाडू 20-30 लाखात आम्‍हाला मिळत असेल तर आम्‍ही त्‍याच्‍यासाठी एक कोटी का देऊ? हा प्रश्‍नच निर्माण होत नाही,' असे सहारा पुणे वॉरियर्सचे संचालक अभिजित सरकार यांनी पाठवलेल्‍या ई-मेलमध्‍ये म्‍हटले आहे.
...तर सौरव का नाही? सचिनच्‍या खासदारकीवरुन राजकारण
विजडन इंडिया संपादकीय बोर्डाच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली