आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्थः ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिस-या कसोटीसामन्यात लाजीरवाण्या पराभवासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जबाबदारी स्वीकारली आहे. सामना झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याने पराभवामुळे अतिशय निराश झाल्याचेही सांगीतले. फलंदाजीतील अपयशामुळे पराभव झाला, असे धोनी म्हणाला.
भारताचा परदेशातील हा सातवा सलग पराभव होता. भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका 4-0 अशी गमाविली होती. तर या दौ-यातील लागोपाठ 3 कसोटी सामने भारताने गमाविले आहेत. ऑस्ट्रेलियामध्येही भारतावर व्हाईटवॉशचे संकट आहे.
पराभवासाठी स्वतःला मुख्य दोषी ठरवुन धोनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला, मी कर्णधार आहे. त्यामुळे मी स्वतःला दोषी मानतो. फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले, हे पराभवाचे प्रमुख कारण आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही हेच घडले आहे. एक-दोन सामन्यांमध्ये हे होऊ शकते. परंतु, लागोपाठच्या 7 सामन्यांमध्ये असे होणे चिंताजनक आहे.
संघातील वरिष्ठ खेळाडुंना बाहेर काढण्याबाबत बोलतांना धोनीने त्यांना पाठिंबा दिला. तो म्हणाला, हा एक फार मोठा निर्णय आहे. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक यासंदर्भात ठरविले पाहिजे. वरिष्ठ खेळाडू फक्त दोन मालिकांमध्ये अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. परंतु, यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करायला हवी. त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजे. पर्थ कसोटीपुर्वी विराट कोहलीला बसविण्यासाठी ओरड सुरु होती. पंरतु, या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे वरिष्ठांना एकदम काढण्याऐवजी टप्प्याटप्प्याने त्यांना निर्णय घेऊ दिला पाहिजे. यासाठी बीसीसीआयसह सर्वांनीच एकत्रपणे चर्चा केली पाहिजे, असे मत धोनीने व्यक्त केले.
कर्णधार धोनी घेणार कसोटी क्रिकेटचा संन्यास?
पुढचा विश्वचषक खेळण्याची खात्री नाही : धोनी, 2013 पर्यंत निर्णय घेणार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.