आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni hints of test retirement by 2013 for next world cup

कर्णधार धोनी घेणार कसोटी क्रिकेटचा संन्‍यास?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर आल्‍यापासून सतत चर्चेत असलेल्‍या टीम इंडियाने माध्‍यमांना चघळायला आता नवा विषय दिला आहे. पर्थ कसोटीच्‍या एक दिवस आधी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून संन्‍यास घेण्‍याचे संकेत देऊन खळबळ माजवली आहे.
कसोटी मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असलेल्‍या टीम इंडियावर चोहोबाजूंनी टीका करण्‍यात येत असतानाच धोनीचे हे नवे विधान आश्‍चर्यकारक मानले जाते. गुरूवारी झालेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्‍हणाला की, 2015 च्‍या विश्‍वचषकात खेळण्‍यासाठी मी 2013 पर्यंत कसोटी क्रिकेटमधून सन्‍यास घेऊ इच्छितो. त्‍यामुळे मला पुरेशी तयारी करण्‍यास वेळ मिळेल.
यावेळेस धोनीने पुन्‍हा एकदा 2015 च्‍या विश्‍वचषकात खेळण्‍याबाबतचा निर्णय 2013 साली घेणार असल्‍याचे म्‍हटले. जर मी 2015 चा विश्‍वचषक खेळण्‍याचा निर्णय घेतला तर मला कसोटी क्रिकेट सोडावे लागेल. 2013 मध्‍ये मी किती फिट आहे हे पाहीन. त्‍यावेळेस जर माझ्या शरीराने साथ दिली नाही तर क्रिकेटच्‍या या प्रकारातून माघार घेईन. त्‍यामुळे संघाला विश्‍वचषकापर्यंत नवा यष्टिरक्षक तयार करता येईल. विश्‍वचषकापर्यंत त्‍याच्‍याकडे 30 ते 40 सामन्‍यांचा अनुभव आलेला असेल, असे धोनीने म्‍हटले.
‘तिस-या कसोटीत पुनरागमन करू’ - धोनी
धोनी म्हणतो, येत्या विश्‍वचषक स्‍पर्धेत खेळण्‍याची शक्‍यता कमीच
संघातील निम्‍म्‍या खेळाडूंना कर्णधारपदी हवाय सेहवाग