आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचा विश्वचषक खेळण्याची खात्री नाही : धोनी, 2013 पर्यंत निर्णय घेणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारताचे विश्वविजेतेपद राखण्याकरिता 2015 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीची आपली उपस्थिती निश्चित नाही. 2013 पर्यंत आपला फॉर्म, फिटनेस आणि अन्य गोष्टी पाहून आपण निर्णय घेऊ, असे भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनीने एका टेलिव्हिजन वाहिनीशी बोलताना सांगितले. विश्वविजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार का? या प्रश्नावर धोनी उत्तरला, ‘2015 साल यायला आणखी साडेतीन वर्षे शिल्लक आहेत. त्या वेळी मी नेमका कोठे असेन याचा अंदाज आज बांधता येणार नाही. 2013 पर्यंत सारे काही सुरळीत असेल तरच 2015 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मी उपलब्ध होऊ शकेन.’
भारतीय क्रिकेट संघाचा भरगच्च कार्यक्रम आणि दरम्यानच्या काळात होणारी आयपीएल स्पर्धा यामुळे धोनीला अत्यावश्यक गोष्टी कोणत्या आहेत याचे निर्णय घेणे आणि महत्त्वाच्या दौºयाआधी पुरेशी विश्रांती घेणे भाग पडले आहे. धोनी भावनाविवश होत नाही. मात्र, त्याच्या सहकाºयांचे आनंदाश्रू टिपण्याची संधी काही टेलिव्हिजन वाहिन्यांनी साधली होती. धोनी त्याबाबत म्हणाला, विश्वचषक जिंकल्यानंतर मीदेखील रडलो होतो. कदाचित त्याची फिल्म टेलिव्हिजन वाहिन्यांकडे नसेल. खरे तर भावनांवर नियंत्रण राखणे कठीण आहे. मात्र, मी त्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवले होते. ड्रेसिंग रूममध्ये जेव्हा मी शिरलो तेव्हा मी पाहिले होते, माझे दोन सहकारी रडत होते. धावतच ते माझ्याकडे झेपावले आणि अचानक मीही रडायला लागलो. मी वर पाहिले तेव्हा सर्वांच्या घोळक्यात होतो. 28 वर्षांनंतरचा तो ऐतिहासिक विजय भारतीय क्रिकेटसाठी मोठी घटना होती. आम्हा सर्वांना विश्वचषक जिंकायचा होता. ते सर्वांचे स्वप्न होते आणि जेव्हा विश्वचषक ड्रेसिंग रूममध्ये आला तेव्हा भावना आवरणे कठीण होते.
आपला सुप्रसिद्ध ‘हॅलिकॉप्टर शॉट’ झारखंडमधील टेनिस क्रिकेट खेळत असताना विकसित झाल्याचा गौप्यस्फोटही धोनीने केला. आम्ही 16 ते 18 यार्ड अंतराच्या विकेटवर टेनिस बॉल क्रिकेट खेळलो. गोलंदाज नेहमी यॉर्कर टाकायचाच प्रयत्न करतो. ‘हॉलिकॉप्टर शॉट’ हा फटका टेनिसबॉल क्रिकेटमध्ये षटकार मारण्यासाठी असतो. चेंडू बॅटच्या मधोमध लागला नाही, बॉटम हँडचा वापर होत असल्याने
जोरात लागतो आणि सीमारेषेपलीकडे जातो, असे धोनी म्हणत होता. ‘मी तो फटका घोटून, सरावाने केला नाही. मी सामन्यातच तो खेळतो. बºयाच वेळा तो फटका खेळताना चेंडू डाव्या हाताच्या कोपरावर आघात करतो.