आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुढच्या वर्षी रंगणार हॉकी इंडिया लीगचा थरार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सलग पाच सत्रांत यशस्वी ठरलेल्या आयपीएल ट्वेंटी-20 स्पर्धेच्या आयोजनाची भुरळ हॉकी इंडियालाही पडली आहे. याच धर्तीवर आता हॉकी इंडिया लीग सुरू करण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला आहे. ही स्पर्धा सुरू करण्यासाठी 1 जानेवारीचा मुहूर्तदेखील काढण्यात आला आहे. 30 जानेवारीला या स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे. प्रथमच होत असलेली ही स्पर्धा वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यावर हॉकी इंडिया लक्ष केंद्रित करणार आहे. भारतीय हॉकी फेडरेशनच्या नाकावर टिच्चून अशा प्रकारची लीग स्पर्धा आयोजित करण्यावर भर देत आहे.
या स्पर्धेत सहा फ्रँचायझी सहभागी होणार आहेत. त्यांचा प्रत्येकी एक संघ या स्पर्धेत खेळणार आहे. आयपीएलप्रमाणेच या स्पर्धेसाठी हॉकीपटूंवर बोली लावण्यात येणार आहे. 60 पेक्षा अधिक विदेशी हॉकीपटूंनादेखील या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. 24 जणांचा एक संघ असणार आहे. यामध्ये 14 भारतीय व 10 विदेशी खेळाडू असणार आहेत. एका सामन्यात पाच भारतीय आयकॉन खेळाडू व केवळ पाच विदेशी खेळाडूंना खेळवण्याचा नियम आहे. प्रत्येक फ्रँचायझीला आपल्या संघावरच्या खर्चावर मर्यादा घालण्यात आली आहे. फ्रँचायझीला संघावर 3 कोटींचा खर्च करता येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विदेशी खेळाडूला मिळालेल्या मानधनातील 10 टक्के रक्कम संबंधित देशातील हॉकी फेडरेशनला व 5 टक्के क्लबला मिळणार आहे.
‘वर्ल्ड हॉकी फेडरेशनने या स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला आहे. देशभरातील स्टार हॉकीपटंूना एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विदेशी खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव या भारतातील खेळाडूंना मिळणार आहे. याचा फायदा राष्टÑीय संघासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकेल,’ असा विश्वास हॉकी इंडियाचे सचिव एन.बन्ना यांनी व्यक्त केला.