आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Vs Australia Third Test Match In Perth India Loss M S Dhoni Accept To Responsibility

होय, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो- धोनी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ: ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसर्‍या कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. पर्थ येथे भारताचा डावाने पराभव झाला. सलग दुसर्‍यांदा डावाने पराभव झाल्याने कर्णधाराला जबाबदारी स्वीकारण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले.
‘भारतीय संघ अडचणीच्या काळातून जात आहे. कर्णधार म्हणून मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. मी संघाचा नेता आहे, आणि सर्वांत आधी मी जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. फलंदाजांचे अपयश पराभवाचे मोठे कारण आहे,’ असे धोनीने पत्रकार परिषदेत म्हटले. 2011 चा वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर कामगिरीत सातत्याने घसरण झाली आहे. यापूर्वी इंग्लंडकडून 4-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. यासह भारताचा विदेशी भूमीवर सलग सात सामन्यांत पराभव झाला आहे.
गोलंदाजी चिंतेचा विषय नाही : ज्या सामन्यांत पराभूत झालो, त्या सामन्यांत फलंदाजांचे अपयश भोवले. या सामन्यांत आम्हाला केवळ एका वेळी 350 पेक्षा अधिक धावा काढता आल्या. इंग्लंडमध्ये आणि आता येथे आम्ही धावा काढण्यात अपयशी ठरत आहोत. इंग्लंडमध्ये आमचे गोलंदाज फिट नव्हते. आम्ही वाईट गोलंदाजी केलेली नाही. गोलंदाजी चिंतेचा विषय नाही, असेही त्याने नमूद केले.