आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍पॉट फिक्सिंग: एक नोबॉल टाकण्‍याची किंमत 10 लाख रूपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंडीगड- पैशाच्‍या लालसेपाटी खेळाडू कोणत्‍या स्‍तरावर जातील हे सांगता येत नाही. इंडिया टीव्‍हीच्‍या स्टिंग ऑपरेशनमध्‍ये असेच एक उदाहरण समोर आले आहे. किंग्‍ज इलेव्‍हनचा मध्‍यमगती गोलंदाज शलभ श्रीवास्‍तव, ऑफस्पिनर अमित यादव, डेक्‍कन चार्जर्सचा मध्‍यमगती गोलंदाज टी.पी सुधेंद्रा आणि पुणे वॉरियर्सच्‍या मोहनीश मिश्रा सारखे खेळाडू पैशासाठी ज्‍या क्रिकेटमुळे एवढे मोठे झाले, त्‍यालाच ते विकायला निघाले होते.
भारतीय क्रिकेटचा एक घृणास्‍पद चेहरा सोमवारी उघड झाला. या नवा खुलाश्‍यामुळे क्रिकेट जगतात भूकंपच झाला. स्टिंग ऑपरेशन केलेल्‍या पत्रकरांनी कोलकाताच्‍या रजत भाटिया आणि रॉयल्‍सच्‍या सिद्धार्थ त्रिवेदीशीही चर्चा केली होती. परंतु, दोघांनीही असे करण्‍यास स्‍पष्‍ट नकार दिला होता.
शलभने तर एक नोबॉल टाकण्‍यासाठी 10 लाख रूपये मागितले होते. तसेच तो किंग्‍ज इलेव्‍हन संघातून केकेआरमध्‍ये जाण्‍यासदेखील तयार झाला होता. वास्‍तविक खेळाडू आपल्‍याच स्‍तरावरून संघात बदल शकत नाही. दैनिक भास्‍करकडे या स्टिंग ऑपरेशनमध्‍ये झालेल्‍या संवादाची विस्‍तृत माहिती उपल्‍बध झाली आहे. यामध्‍ये शलभ श्रीवास्‍तव कशा पद्धतीने सौदेबाजी करत होता हे निष्‍पन्‍न होईल.
स्टिंग ऑपरेशनदरम्‍यान शलभ श्रीवास्‍तवशी झालेली चर्चा पुढीलप्रमाणे
शलभ- काय-काय आहे?
पत्रकार- एक तर नोबॉल असेल
शलभ- हं
पत्रकार- 1-1 षटकामध्‍ये 16 धावा द्यावा लागतील.
शलभ- अच्‍छा, कोणत्‍या षटकामध्‍ये करायचे हे तर सांगा
पत्रकार- यापैकी तु काय करणे पसंत करशील, नोबॉल टाकशील?
शलभ- हं
पत्रकार- रेट सांग
शलभ- तुम्‍ही सांगा, एजंट तर तुम्‍ही आहात.
पत्रकार- 5 लाख
शलभ- खूप कमी आहेत यार.
पत्रकार- एका नोबॉलचे 5 लाख आहेत.
शलभ- दहा लाख बरोबर आहेत.
पत्रकार- एका नोबॉलचे 10 लाख रूपये. फ्रँचायजी बदल, पैसे ब्‍लॅकमध्‍ये मिळतील.
मॅच फिक्सिंगसाठी तयार असलेला शलभने पैशासाठी कोलकाता संघातही जाण्‍याविषयी चर्चा सुरू केली. त्‍याचबरोबर खेळाडूंना जर पैसे ब्‍लॅकमध्‍ये देण्‍यात येत असेल तर मीही घेईन, असेही त्‍याने म्‍हटले.
शलभ- आयपीएलमध्‍ये चांगले जो खेळतो त्‍याच्‍यासाठी 30 लाख रूपये तर मिळतात. शिवाय ब्‍लॅकमनीही दिला जातो.
पत्रकार- फ्रँचायजी बदलण्‍यासाठी तुझा होकार पाहिजे.
शलभ- विचार करू नका, तुमची इच्‍छा असेल त्‍या संघाशी चर्चा करा. एका मोठया कलाकाराच्‍या संघात खेळणा-या खेळाडूंना 45 लाख रूपये ब्‍लॅकमध्‍ये मिळतात.
पत्रकार- मनविंदर बिस्‍लाला किती मिळाले आहे. (बिस्‍ला कोलकातातर्फे खेळतो)
शलभ- बिस्‍लाने मला 75 रूपये सांगितले होते.
पत्रकार- तो तर 30 लाख रूपयांच्‍या कॅटेगरीमधला आहे.
शलभ- ते फ्रँचायजीवर अवलंबून असते कोणाला किता पैसे द्यायचे. प्रत्‍येकाच्‍या आपल्‍या पद्धती आहेत.
पत्रकार- ब्‍लॅकमनी वाटण्‍यावरून बीसीसीआयला काही माहित नाही काय?
शलभ- मंडळाचे लोकही यामध्‍ये सहभागी असतात. तो श्रीनिवास (अपशब्‍द वापरतो) देत नाही का आपल्‍या खेळाडूंना. मला सांगा धोनी आणि रैनाला श्रीनिवासनने संघातच ठेवताना 7-8 कोटी रूपये दिले. तर गौतम 11 कोटीमध्‍ये कोलकाताकडे गेला. एकतर श्रीनिवासन मुर्ख आहे किंवा धोनी वा रैना. एवढेच नाही तर पुण्‍याच्‍या मनिष पांडेस सहाराने पन्‍नास लाखांची कार भेट दिली. त्‍याची 30 रूपयांची कॅटेगरी आहे.
आयपीएलमध्‍ये चांगला करार मिळावा म्‍हणून खोटे बोललो
आयपीएलमध्‍ये स्‍पॉट फिक्सिंग? अनेक खेळाडू स्टिंग ऑपरेशनमध्‍ये कैद
या हसमुखराय गोलंदाजाने आयपीएलमध्‍ये केला होता इतिहास, पाहा व्हिडिओ...