आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हसमुखराय गोलंदाजाने आयपीएलमध्‍ये केला होता इतिहास, पाहा व्हिडिओ...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता नाईट रायर्डसचा जलदगती गोलंदाज लक्ष्‍मीपती बालाजीने मंगळवारी रॉयल चँलेजर्स बेंगळुरूच्‍या फलंदाजांना अक्षरश: पळता भुई थोडी केली. फक्‍त 18 धावा देऊन त्‍याने चार गडी टिपले. विस्‍मरणात गेलेला बालाजी अचानक आपल्‍या कामगिरीने प्रकाशझोतात आला. त्‍याच्‍या या कामगिरीमुळे कोलकाताला या हंगामातील पहिला विजयही नोंदवता आला.
याच बालाजीने आयपीएलच्‍या पहिल्‍या सत्रात म्‍हणजे 2008 साली चेन्‍नई सुपर किंग्‍सकडून खेळताना हॅटट्रीक केली होती. किंग्‍ज इलेव्‍हन पंजाबविरूद्ध त्‍याने आयपीएलमधील पहिली हॅटट्रीक नोंदवली होती.
बालाजी गोलंदाजीबरोबर आपल्‍या हास्‍यासाठीदेखील ति‍तकाच प्रसिद्ध आहे. मैदानावर असताना तो सतत हसतमुख असतो. त्‍यामुळे सहका-यांना देखील तो हवाहवासा वाटतो. त्‍याच्‍या हास्‍याचे पाकिस्‍तानचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष परवेझ मुशर्रफदेखील चाहते आहेत. पण गोड हास्‍यापेक्षा त्‍याच्‍या गोलंदाजीच्‍या तिखट मा-याचा धसका अनेक प्रतिस्‍पर्धी फलंदाज घेत असतात.
व्हिडिओमध्‍ये पाहा बालाजीची किंग्‍ज इलेव्‍हनविरूद्धची हॅट्रटीक...