आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानला वानखे़डे स्टेडियमवर येण्यास ५ वर्षांची बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरूख खानला त्‍याच्‍या गैरवर्तणुकीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्‍टेडियमवर प्रवेशासाठी पाच वर्षांची बंदी घातल्याची माहिती एमसीएचे अध्‍यक्ष आणि केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी रात्री वानखेडे स्‍टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्‍या पदाधिका-यांशी आणि सुरक्षा रक्षकाशी शाहरूखने केलेल्‍या धक्‍काबुक्‍कीबाबत आज एमसीएच्‍या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्‍यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. एमसीएचे पदाधिकारीच घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याने समितीची काहीही आवश्यकता नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सर्वसामन्याप्रमाणेच शाहरुख खानला हा निकष लावला आहे. व्यक्तीपेक्षा संस्था महत्त्वाची असते. त्यामुळे शाहरुखला वेगळा नियम व निकष लावण्याचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी सांगितले.
शाहरुखच्या मदतीला बीसीसीआय- दरम्यान, हे प्रकरणात बीसीसीआयने दखल घेतली असून शाहरुखचा बचाव करण्याची शक्यता आहे. शाहरुख खानवर घाललेल्या बंदीबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष व आयपीएलचे कमीशनर राजीव शुक्ला यांनी सांगितले की, याबाबतचा अंतिम निर्णय बीसीसीआयच घेईल.
शाहरुख प्रकरणाला आता राजकीय वळण - या घटनेने आता राजकीय वळण घेतले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले, शाहरुख खानच्या विरोधातील लोकांनी त्याच्याविरोधात दुश्मनी काढली आहे. सुरक्षा कर्मचारी भाजपचे लोक होते. एमसीएच्या पदाधिका-यांनी शाहरुख खानला जाणून-बुजून यात फसविण्यात आले आहे. बंगळुरुच्या एका विदेशी खेळाडूने महिलेची छेडछाड केली याबाबत विचारले असता ते म्हणाले, आयपीएल एक मायाजालसारखे आहे ते पूर्णपणे बंद केले पाहिजे.
मुंबईच्या खेळाडूंना घातल्या शिव्या?- शाहरुख खानने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांशी घातलेल्या हुज्जतीनंतर या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. बुधवारी रात्री कोलकाता व मुंबई यांच्यातील सामना संपल्यानंतर शाहरुख खानने मुंबईच्या खेळाडूंकडे पाहून अभद्र इशारे केले. त्यामुळे मुंबईचे वरिष्ठ खेळाडू नाराज झाले आहेत. तसेच शाहरुखचे हे प्रकरण मुंबई इंडियन्सला पसंत पडले नाही.
मुंबई इंडियन्सच्या एका वरिष्ठ खेळाडूने सांगितले की, कोलकाताने सामना जिंकल्यानंतर शाहरुख आपले संतुलन गमवून बसला. शाहरुख व त्याचे समर्थक दंगा घालू लागले. त्यांनी शिट्ट्याही मारल्या व आमच्या संघातील खेळाडूकडे पाहून चेष्टा-मस्करी करायला सुरुवात केली.
आपल्या संघाचा पराभव शाहरुख पाहू शकत नसल्याचे याआधी दिसून आले आहे. शाहरुखने काल दावा केला होता की, या वादाला कारणीभूत एमसीए आहे. कारण त्यांच्या सुरक्षारक्षकांनी व पदाधिका-यांनी माझ्याशी गैरवर्तन केले.
एका स्थानिक वर्तमानपत्राच्या छायाचित्रकाराने सांगितले की, पुरस्कार सोहळा संपल्यानंतर मी काही छायाचित्रे घेत होतो. त्यावेळी कोलकात्याच्या काही अधिका-यांनी माझा कॅमेरा हिसकावून घेतला. त्यावेळी मी भांडणाचे फोटो घेत होतो. पण त्याचवेळी माझा कॅमेरा जप्त करण्यात आला. त्यावेळी त्यांनी माझ्याशी गैरव्यवहार केला.
दुस-या एका सूत्राने दावा केला आहे की, एमसीए याबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे. एका अधिका-याने सांगितले की, शाहरुख खानने हा प्रश्न केला आहे की, माझ्या मुलांना मैदानावर जाण्यापासून का रोखले. कारण मेजवान टीमच्या (मुंबई इंडियन्सच्या) मालकांना या सुविधा दिल्या जातात व मग पाहुण्या संघाला तशा सुविधा का दिल्या जात नाहीत.
विजयानंतर शाहरूखचा वानखेडेवर धिंगाणा, पाहा फोटोफिचर...
मी माफी मागणार नाही, त्‍यांनीच माझी माफी मागावी: शाहरूख खान
IPL सामन्यात शाहरुख एकटाच, काय गौरी अजूनही आहे नाराज?