आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pinki Pramanik Gender Test Video Leaked On Internet

पिंकी प्रामाणिकच्‍या लिंगचाचणीचा व्हिडिओ इंटरनेटवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकता - आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्‍या पिंकी प्रामाणिकचा एक व्हिडिओ एमएमएस इंटरनेटवर टाकण्‍यात आला आहे. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. पिंकीच्‍या लिंगचाचणीदरम्‍यान मोबाईलवरुन घेतलेला हा व्हिडीओ आहे.
महिला धावपटू असलेल्‍या पिंकीवर पुरुष असल्‍याचा आरोप आहे. तसेच सहकारी धावपटूवर बलात्‍कार केल्‍याचाही आरोप आहे. पिंकी ही पुरुष आहे की महिला, याचा तपास करण्यासाठी चाचणी घेण्यात आली होती. त्‍यासाठी नॉर्थ 24 परगणा येथील एका खासगी नर्सिंग होममध्‍ये देण्‍यात आले होते. त्‍यावेळी चाचणी दरम्यान पिंकीला विवस्त्र करण्यात आले होते. याची व्हिडिओ क्लिप कोणीतरी इंटरनेटवर टाकली आहे. ही क्लिप 29 सेकंदाची आहे. त्‍यात पिंकी पूर्णपणे नग्‍नवस्‍थेत दिसत आहे.
पिंकीचे वकील तुहीन रॉय यांनी यासंदर्भात सांगितले की, या व्हिडिओ क्‍लिपबद्दल मी ऐकले आहे. परंतु, मी तो प्रत्‍यक्ष पाहिला नाही. ज्‍याने हा व्हिडिओ टाकला आहे, त्‍याला तत्‍काळ अटक केली पाहिजे. पिंकी सध्या तुरुंगात असून, तिची तक्रार दाखल करण्यासाठी पालक उपलब्ध नाहीत. पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे. त्‍यावेळी न्यायालयात हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असे रॉय यांनी सांगितले.
IN DEPTH: काय आहे पिंकी नावाच्‍या \'पुरूषा\'ची कथा
सुवर्ण पदक जिंकणारी अ‍ॅथलिट पिंकी महिला नसून पुरुष असल्याचे उघड
महिला खेळाडूंच्या लिंग तपासणीचे त्रांगडे