आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्‍ये स्‍पॉट फिक्सिंग? लोकसभेतही पडसाद, चौकशीची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः आयपीएलमध्ये फिक्सिंग सुरू असल्याचा खळबळजनक दावा एका खासगी वृत्त वाहिनीने केला आहे. सुमारे वर्षभर स्टिंग ऑपरेशन चालविल्‍यानंतर या वाहिनीने हे आरोप पुराव्‍यासह मांडले आहेत. अनियमितपणे पैसे घेण्‍याच्‍या तयारीत काही खेळाडू आढळले. तसेच बीसीसीआयकडून निर्धारीत केलेल्‍या स्‍लॅबव्‍यतिरिक्त अनियमितपणे पैसे घेतल्‍याचेही उघडकीस आले आहे. यात मनिष पांडे, शलभ श्रीवास्‍तव, मोहनीश मिश्रा, मनविंदर बिसला यांनी निर्धारीत स्‍लॅबपेक्षा अनियमितपणे जास्‍त पैसे घेतल्‍याचा ठपका ठेवण्‍यात आला आहे. तर टी. सुधींद्रने स्‍पॉट फिक्सिंग केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. बीसीसीआयने या प्रकराची गंभीर दखल घेतली असून आज आपातकालीन बैठक बोलाविण्‍यात आली आहे. त्‍यात आयपीएलच्‍या कार्यकारी समितीचे सदस्‍यही सहभागी होणार आहेत. या प्रकरणात नाव पुढे आलेल्‍या खेळाडुंवर बंदी घालण्‍यात येण्‍याचीही शक्‍यता आहे.
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे उघडकीस आल्याने याचे पडसाद लोकसभेत उमटले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. समाजवादी पक्षाचे खासदार शैलेंद्र कुमार आणि माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार किर्ती आझाद यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
एका टिव्ही चॅनेलने हा पुरावा देताना स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आयपीएलमधील खेळाडू, आयोजक, मालक आणि भारतातील काही क्रिकेट तज्‍ज्ञांमध्‍ये फिक्सिंगची बोलणी होत आहेत. दरम्यान, याबाबत बीसीसीआयने गंभीर इशारा देताना म्हटले आहे, हे वृत्त खरे ठरले तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
टिव्ही चॅनेलने स्टिंग ऑपरेशन करताना काही खेळाडूंना छुप्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. काही खेळाडूंना पैसे घेताना पकडले गेले आहे. यामध्ये स्पॉट फिक्सिंगचाही समावेश आहे. तर जास्त पैसे कमविण्यासाठी काही प्रथम श्रेणीचे सामने फिक्स होतात, असा दावाही वाहिनीने केला आहे. या फिक्सिंगसाठी महिलांना हाताशी धरले जात आहे. या महिलांची फिक्सिंगमध्ये महत्वाची भूमिका ठरत आहे.
या फिक्सिंगमध्ये भारतीय क्रिकेटमधील एक सुपरस्टार आणि एका टीमच्या कर्णधाराचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय काही खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व मॅच फिंक्सिंग करीत असल्याचा दावा, या टिव्ही चॅनेलने केला आहे. दरम्यान, या टिव्ही चॅनेलने बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी श्रीनिवासन म्हणाले, खेळाच्या अखंडतेबाबत विश्वास आहे. जर हे वृत्त खरे असेल तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. आमच्याकडे स्टिंग ऑपरेशन केलेले टेप दिली तर ती पाहून यात कोण कोण आहे, ते पाहिले जाईल. त्यानुसार संबंधित खेळाडूंवर कारवाई केली जाईल. जर प्रथमदर्शी यात तथ्य आढल्यास दोषी खेळाडूंना निलंबित केले जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे श्रीनिवासन म्हणाले.
मोहनीश मिश्राने 'ब्‍लॅक'मध्‍ये घेतले एक कोटी
मोहनीश मिश्राः पुणे वॉरीयर्स
स्‍लॅबः 30 लाख रुपये
मोहनीश मिश्राने टी बदलण्‍याच्‍या प्रस्‍तावावर दोन कोटी रुपये मागीतले. सहारा पुणे वॉरीयर्सकडून 1 कोटी 45 लाख रुपये घेतले. त्‍यात एक कोटी ब्‍लॅकमध्‍ये घेतले आहेत.

शलभ श्रीवास्‍तवः किंग्‍स एलेव्‍हन पंजाब
टीम बदलण्‍यासाठी तसेच स्‍पॉट फिक्सिंगसाठी शलभ श्रीवास्‍तवने तयारी दर्शविली. नो बॉल करण्‍यासाठी 10 लाख रुपये मागितले. शलभने सांगितले की, मनिष पांडेला पुणे वॉरीयर्सने संघात कायम ठेवण्‍यासाठी 50 लाखांची कार दिली आहे. ही त्‍याच्‍या स्‍लॅबच्‍या व्‍यतिरिक्त आहे. याशिवाय मनविंदर बिसलाने कोलकाताकडून खेळण्‍यासाठी 75 लाख रुपये ब्‍लॅकमध्‍ये घेतल्‍याचेही शलभने सांगितले.

टी. सुधींद्रने नो बॉलसाठी मागितले 50 हजार
मध्‍य प्रदेशचा हा मध्‍यमगती गोलंदाज स्‍पॉट फिक्सिंगसाठी तयार झाला. त्‍यासाठी त्‍याने 50 हजार रुपये मागितले. सुधींद्र या हंगामात डेक्‍कन चार्जर्सकडून खेळत आहे. सुधींद्रने इंदुर येथे झालेल्‍या एका सामन्‍यात स्‍पॉट फिक्सिंग केले होते. त्‍यासाठी त्‍याने 40 हजार रुपये घेतले होते.

जडेजा, पांडेवर घातली होती बंदी
कोणताही खेळाडू टीम बदलण्‍यासाठी स्‍वतःहून प्रयत्न करु शकत नाही. तसे केल्‍यास कारवाई करण्‍यात येते. यापूर्वी रविंद्र जडेजावर एका वर्षाची बंदी घातली होती. तर मनिष पांडेवरही 4 सामन्‍यांचा प्रतिबंध लावण्‍यात आला होता.
स्‍पॉट फिक्सिंग: एक नोबॉल टाकण्‍याची किंमत 10 लाख रूपये
आयपीएलमध्‍ये चांगला करार मिळावा म्‍हणून खोटे बोललो
स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणी सलमान बट, मोहम्‍मद आसिफ दोषी
सेक्‍स, ड्रग्‍स, क्रिकेटर्स आणि मॅच फिक्सिंगचे आणखी एक नवे प्रकरण
भारत-पाकिस्तान मॅच फिक्सिंगमागे होता या अभिनेत्रीचा हात!!