आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिगरबाज युवराजचे पुनरागमन, टी-20 विश्‍वचषकासाठी संघ जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कर्करोगाशी दोन हात करून पुन्हा नव्या ताकदीने उभा राहिलेला टीम इंडियाचा 'हीरो' युवराज सिंगने भारतीय क्रिकेट संघात 'कमबॅक' केले आहे. न्यूझीलंडमध्ये पुढील महिन्‍यात होणा-या टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी युवराज सिंगचा टीम इंडियात समावेश करण्‍यात आला आहे. युवराज सिंग फिट असल्‍याचे प्रमाणपत्र राष्‍ट्रीय क्रिकेट अकादमीने दिले आहे . तर न्यूझीलंडविरुद्ध होणा-या कसोटी मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर खेळणार आहे.
संघात समावेश झाल्‍यानंतर युवराज सिंगने अतिशय आनंद व्‍यक्त केला आहे. ट्विटरवरुन भावना व्‍यक्त करताना त्‍याने लिहीले आहे की, मला काय वाटत आहे, हे मी सांगू शकत नाही. जणू काही मी भारतासाठी पहिल्‍यांदाच खेळणार आहे. खुप जणांचे मी आभार मानू इच्छितो. विशेषतः माझ्यावर विश्‍वास ठेवणारे बीसीसीआय, निवड समितीचे सदस्‍य, माझे मित्र आणि कुटुंबिय, चाहते तसेच प्रसार माध्‍यमांचे... हा माझ्यासाठी खास दिवस आहे.
..तो क्रिकेट सोडणार होता - शबनमसिंग
कॅन्सरविरुद्ध लढाई जिंकून क्रिकेटमध्ये परतलेला युवी बंगळुरूत सरावादरम्यान अनेकदा निराश व्हायचा. या निराशेपोटी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची मानसिक तयारी केली होती, असे युवीची आई शबनमसिंग यांनी सांगितले. पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले. दिवसभर 6-7 तास तो सराव करायचा. या काळात अनेकदा त्याच्या मनात नकारात्मक विचार येत होते. कधी मैदानात उतरेल, असे त्याला वाटायचे. नंतर इच्छाशक्तीच्या बळावर तो पुन्हा संघात येऊ शकला. दरम्यान, युवीचे वडील योगराजसिंग यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. युवीशी बोलणे होऊ शकले नाही, असे ते म्हणाले. आपण धैर्यवान असल्याचेच युवीने सिद्ध केले असल्याचे योगराज यांनी सांगितले.
युवराजच्‍या आनंदाला उधाण
युवराजने त्‍यानंतर आणखी एक ट्विट केले. तो म्हणाला, 'कर्करोगाचा उपचार सुरु होता त्‍यावेळी मी हाच विचार करीत होतो की एक दिवस मी निश्चित पुनरागमन करणार आणि भारतासाठी खेळेन. इश्‍वर मला असे करण्‍याची एक सधी देईल. ...तर मग मी पुन्‍हा एकदा देशासाठी खेळण्‍यास तयार आहे. हा एक मोठा सन्‍मान आहे. माझे निकटवर्तीय आणि चाहत्‍याच्‍या प्रार्थनेशिवाय हे शक्‍य नव्‍हते. मी आता मैदानावर उतरुन तिरंगा फडकविण्‍याची प्रतिक्षा करु शकत नाही. खुप परिश्रम घेतले आहेत. या महिन्‍यात टी-20 विश्‍वचषकाची तयारी करणार आहे. जय हिंद.
युवराजची निवड झाल्‍यानंतर क्रिडामंत्री अजय माकन यांनी युवराजला शुभेच्‍छा दिल्‍या. ट्विटरवरुन त्‍यांनी लिहीले आहे की, युवराज एक योद्धा आहे. त्‍याचे पुनरागमन भारतीय संघाचा आत्‍मविश्‍वास वाढवेलच, शिवाय कठीण परिस्थितीतून जात असलेल्‍या खेळाडुंना प्रेरणाही देईल.
युवराजसोबतच हरभजन सिंग यालाही संधी देण्‍यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाज लक्ष्‍मीपती बालाजी याचाही समावेश करण्‍यात आला आहे.
भारतीय संघ असाः महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, गौतम गंभीर, झहीर खान, रोहित शर्मा, पियुष चावला, आ. अश्विन, हरभजन सिंग, लक्ष्‍मीपती बालाजी, सुरेश रैना, इरफान पठाण, मनोज तिवारी, अशोक डिंडा
मॉडेलसोबत छापला युवीचा फोटो... भडकला युवराज
जांबाज युवराज, एवढी घाई का?
फक्‍त 15 मिनिटांचा सराव... आणि थकला युवराज
कॅन्‍सरवर मात केलेला युवराज करतोय आणखी एका आव्‍हानाचा सामना