आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅन्‍सरवर मात केलेला युवराज करतोय आणखी एका आव्‍हानाचा सामना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज युवराज सिंग आता तंदुरूस्‍तीकडे लक्ष देत आहे. कॅन्‍सरमुळे पाच महिने क्रिकेटपासून दूर राहिलेल्‍या युवराजने ट्विटरवर जिममध्‍ये व्‍यायाम करतानाचा फोटो पोस्‍ट केला आहे.
'मी आता परतत आहे. मी आणि ईशांत जिममध्‍ये भरपूर घाम गाळत आहोत. क्रिकेटमध्‍ये परतणे हे माझ्यासाठी आव्‍हान नसून, तो माझा शब्‍द आहे', असे युवराजने ट्विटरवर फोटोबरोबर लिहिले आहे. सध्‍या युवराज आपला सहकारी ईशांत शर्माबरोबर मैदानात यशस्‍वी पुनरागमन करण्‍यासाठी अपार मेहनत घेत आहे.
भारताला विश्‍वचषक जिंकून देण्‍यात महत्‍वाची भूमिका बजावणा-या युवराज सिंगने आतापर्यंत 274 एकदिवसीय सामने, 37 कसोटी आणि 23 टी-20 आंतरराष्‍ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्‍यात युवीने 37.62 च्‍या सरासरीने 8051 धावा बनवल्‍या आहेत. तर कसोटीमध्‍ये सुमारे 35 च्‍या सरासरीने 1775 धावा बनवल्‍या आहेत. एकदिवसीय सामन्‍यात 13 आणि कसोटीत 3 शतके लगावले आहेत.