आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झहीर खानने गिरवला धोनी-भज्जीचा कित्ता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकनवी दिल्ली- भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज झहीर खानने तीच चूक केली जी २००९ मध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंगने केली होती. झहीर खानला अर्जून पुरस्कार मिळाला आहे. त्यानेही या दोघांप्रमाणे पुरस्कार सोहळयास उपस्थिती लावली नाही.
२००९ मध्ये कर्णधार धोनी आणि हरभजन सिंग यांनीही सोहळयास दांडी मारली होती. त्यांच्या अनुपस्थितीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. झहीर खान यावेळेस भारतात उपस्थित असताना देखील तो पुरस्कार स्वीकारण्यास गेला नाही.
झहीर खान जायबंदी आहे आणि नुकताच तो लंडन मध्ये शस्त्रक्रिया करून परतला आहे. कदाचित तो पुरस्कार वितरण कार्यक्रमात येऊ शकला नसेल. परंतु अर्जुन पुरस्कार ही महत्वाचा आहे. एखाद्या खेळाडूला अर्जुन पुरस्कार मिळणे ही गर्वाची बाब असते.