आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राइट टू रिजेक्ट’वरच मतदान घ्या

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अण्णांच्या उपोषणापासून सारा देश नवनिर्मितीसाठी, चांगल्या भविष्यासाठी लढा देत आहे. त्यात प्रामुख्याने निवडणूक सुधारणांचे काही मुद्देही पुढे येत आहेत. त्यात राइट टू रिजेक्ट म्हणजे उमेदवार नापसंत असल्यास ते बटन दाबून आपले मत द्यायचे आणि नापसंती व्यक्त करायची. उमेदवारापेक्षाही जास्त मते त्या नापसंतीला पडले तर परत निवडणूक घ्यायची. या अण्णांच्या मुद्द्यांवर सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे. त्यासाठी मला वाटते की आपण लोकशाही मार्गाने जाऊन राइट टू रिजेक्ट हा पर्याय बॅलेट पेपरवर हवा की नको यासाठीच संपूर्ण देशात मतदान घ्यावे म्हणजे पर्यायाने प्रत्येक पक्ष आपला उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा देण्याचा प्रयत्न करील.
- सुहास महाजन, औरंगाबाद