आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरेंची सून बाबरी प्रकरणावर चित्रपट बनविणार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे अयोध्येत 1992 साली पाडण्यात आलेल्या बाबरी मशिद आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीवर चित्रपट बनविणार आहे.

स्मिता ठाकरे या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी आमिर खानला विचारणा केली आहे. मात्र, आमिर खान आपले वेळापत्रक व्यस्त असल्याचे सांगत चित्रपटात काम करण्यास नकार दर्शविला आहे. त्याने या चित्रपटाची पटकथी लिहिताना मदत करणार असल्याचे सांगितले आहे. आमिरनंतर मुख्य भूमिकेसाठी अजय देवगणच्या नावाचा विचार होत आहे. या प्रकरणी अनेक नेत्यांवर आरोप असून, या विषयाला त्या कितपत न्याय देतील यावर प्रश्न उठविण्यात येत आहेत. याविषयी बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या, मी या विषयावर गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट बनविण्याचा विचार करीत होते. या प्रकरणावर मोठे राजकारण झाले असून, मला त्यावर चित्रपट बनविण्याची उत्सुकता आहे. विचार केल्यानंतर मी हा चित्रपट बनविण्याचे ठरविले आहे. या चित्रपटामुळे वाद निर्माण न होणे याकडे माझे लक्ष असेल.