आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venus Will Be In 2012 Due To The Success Of Aamir Kahn

हॅपी बर्थ डे आमिर : शुक्र ग्रहामुळे २०१२ वर्षात आमिरला मिळेल भरभरून यश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खानला चित्रपट क्षेत्रात मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. ग्रह-ता-यांच्या स्थितीनुसार २०१२ हे वर्ष आमिर खानला यश देणार ठरेल, आणि तो सर्वांच्या चर्चेत राहील.
आमिर खानची जन्म तारीख १४ मार्च १९६५ आहे. आमिरचा जन्म पुष्य नक्षत्रात झाला आहे. लग्न कुंडलीत शुक्र ग्रहाच्या स्थितीमुळे आमिर अभिनय खेत्रात आहे. आमिरचा जन्म कुंभ लग्नात झाला आहे. कुंडलीतील शनी ग्रह शशयोग नामक महापुरुष योग तयार करत आहे. आमिरच्या कुंडलीत चंद्र स्वगृही आहे, त्यामुळे आमिर रचनात्मक आहे.
आमिरसाठी कसे असेल 2012 वर्ष
या काळात आमिरला शुक्राची महादशा सुरु आहे. शुक्र मित्र राशीत कुंभ स्थानात असल्यामुळे आमिरने मोठे यश संपादन केले आहे. २०१२ शुक्र ग्रहाच्या महादशेचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे या वर्षातही आमिरला भरभरून यश मिळणार आहे. त्यानंतर सूर्याची महादशा सुरु होणार आहे. या काळात आमिरला संघर्ष करावा लागेल. शनी स्वतःच्या राशीत तसेच गुरु आणि मंगळ मित्र राशीत असल्यामुळे जास्त त्रास होणार नाही, परंतु पूर्वीसारखे यश या काळात प्राप्त होणार नाही.