Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली: कामगार-व्यवस्थापनातील मतभेदाचा फटका मारुती-सुझुकी कंपनीला बसला असून, कार निर्मितीत देशातील सर्वात मोठी असणा-या या कंपनीच्या ऑगस्टमधील विक्रीत १३ टक्के घट झाली आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये ९१,४४२ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १,०४,७९१ वाहनांची विक्री केली होती. मानेसर येथील कारखान्यातील उत्पादनात आलेल्या व्यत्ययामुळे विक्री घटल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुझुकीच्या मोटारसायकल विक्रीत ३९ टक्के वाढ नवी दिल्ली: दुचाकी निर्मिती क्षेत्रातील सुझुकी...
  September 2, 03:50 AM
 • नवी दिल्ली: जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंझ त्यांचे लक्झरी सी क्लास कार नव्या स्वरूपात सादर करणार आहे. ही कार सप्टेंबर महिन्यातच बाजारात आणली जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.कंपनीने सध्या बाजारात असलेल्या सीडान सी क्लास कारच्या मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत. कारचे बम्पर, हेडलाईट पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक करण्यात आले आहेत. त्याच बरोबर इतर काही तांत्रिक बदल केले गेल्याने ही कार आता पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक दिसू लागली आहे. सी क्लास या श्रेणीत कंपनी तीन नवीन मॉडेल बाजारात...
  September 2, 03:33 AM
 • नवी दिल्ली: मारुती सुझुकीच्या मानेसर येथील कारख्यान्यातील कामगार-व्यवस्थापनातील पेच कायम असून कंपनीने मंगळवारी १६ कामगारांना निलंबित, तर १२ प्रशिक्षणार्थींना कामावरून कमी केले आहे. कारखान्यातील उत्पादन ठप्पच असून कंत्राटी कामगारांच्या मदतीने पर्यायी उत्पादन व्यवस्था करण्यात येत असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. गुणवत्तेला बाधा पोहोचवण्याच्या आरोपावरून कंपनीने सोमवारी १० कामगारांना कामावरून काढून टाकले होते, ५ जणांना निलंबित केले तर ६ प्रशिक्षणार्थींना कामावरून...
  August 31, 03:46 AM
 • पारदर्शक कार तुम्ही आतापर्यंत पाहिलीय का..? नाही ना.. परंतु ही कार ट्रान्सपरंट आहे. 1939 मध्ये ही कार जनरल मोटार्सने बनवली होती. या कारचे नाव होते पॉटिएफ डिलक्स सिक्स. या कारचे नाव घोस्ट कार असेही होते.जुलै महिन्यात या कारचा लिलाव झाला आणि ही कार तब्बल 3 लाख 8 हजार डॉलरला म्हणजे भारतीय चलनात 1 कोटी 36 लाख रुपयांमध्ये विकली गेली. तुमच्या माहितीस्तव सांगतो, ही कार जेव्हा तयार झाली तेव्हा तिची किंमत अवघी 25 हजार डॉलर इतकी होती. म्हणजे 11 लाख रुपये! ही अमेरिकी बनावटीची पहिली कार आहे, जी पारदर्शी आहे. या कारची...
  August 28, 12:24 PM
 • नवी दिल्ली - मागणीत घट आल्याने तात्पुरते बंद करण्यात आलेले पुणे व सानंद येथील कारखान्यांतील उत्पादन पुन्हा सुरू केल्याचे टाटा मोटर्सने शनिवारी स्पष्ट केले. १५ दिवसांच्या खंडानंतर आम्ही सानंद येथील कारखान्यातील उत्पादन सुरू केले असून, किरकोळ दुरुस्तीसाठी ते बंद ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे पुणे येथील कारखान्यातील उत्पादन ७ दिवसांच्या खंडानंतर सुरू करण्यात आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. उत्पादनात किती कपात केली हे सांगण्यास मात्र त्याने नकार दिला. सोसायटी ऑफ इंडियन...
  August 28, 12:51 AM
 • चंदिगड - 7.50 लाखांची होंडा जॅझ 5.50 लाखांच्या आसपास मिळत आहे. 17 लाखांची जेट्टा सध्या 14 लाखांत मिळत आहे. मर्सिडीझने शून्य टक्के व्याजाने ईएमआय सादर केली आहे. पण या सर्वांना मागे टाकत व्होक्सवॅगनच्या फिटॉन या लक्झरी कारवर मात्र थेट 25 लाखांची सूट सुरू करण्यात आलेली आहे.सादर करताना फिटॉनची किंमत 76 लाख रुपये ठेवण्यात आली होती. मर्सिडीझ बेंझ एस क्लास, बीएमडब्ल्यू 7, ऑडी ए 8 वर्गातील कारची भारतात ब्रॅण्ड व्हॅल्यू जास्त नसल्याने ग्राहकांची संख्याही कमीच राहिली. कार सादर झाल्यानंतरच्या 18 महिन्यांत फक्त 13...
  August 27, 05:47 AM
 • मुंबई - रेनो निस्सान अलायन्स इंडिया प्रा.लि. या कंपनीने केवळ १५ महिन्यांच्या विक्रमी वेळेमध्ये एक लाख इंजिनांचे उत्पादन करून एक नवीन मैलाचा दगड पार केला आहे. कंपनीने १.२ आणि १.५ लिटर क्षमतेच्या एचआर १२ डीई या पेट्रोल इंजिनांचे उत्पादन केले आहे. या अगोदर तेरा महिन्यांच्या विक्रमी वेळेत एक लाख मायक्रा मोटारींचे उत्पादनही कंपनीने केले आहे. रेनो निस्सानच्या प्रकल्पामध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्यात इंजिनांच्या उत्पादनाला प्रारंभ झाला आणि गेल्याच महिन्यात एक लाख इंजिनांचा टप्पा पूर्ण...
  August 27, 05:39 AM
 • जपानी कंपनी होंडा सीएल भारतात आपले वर्चस्व पुन्हा स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीने त्यांची छोटी कार होंडा जजची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे. या कारची किंमत आणि मायलेज पाहूनच ग्राहक या कारकडे आकृष्ट होईल. ऑटोमोबाइल क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता होंडा जजची किंमत साडेपाच लाख रुपयांपासून 6 लाख 6 हजार रुपयांपर्यंत (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे. या प्रकारातील इतर चारचाकी वाहनांना चांगली टक्कर देईल, असा कंपनीचा दावा आहे. जजच्या 2009 च्या मॉडेलची किंमत 7 लाख 12 हजार रुपये होती. कंपनीचे...
  August 26, 12:35 PM
 • मुंबई - इंधन आणि व्याज दरवाढीच्या झटक्यामुळे जुलै महिन्यात नॅनोच्या विक्रीला ब्रेक लागला. त्यामुळे आता विविध प्रकारच्या आकर्षक वित्त योजना आणि डिस्काउंटचा गिअर लावून नॅनोच्या विक्रीचा वेग वाढवण्याचा विचार टाटा मोटर्सने केला आहे. पेट्रोलच्या किमतीत झालेली वाढ आणि दुस-या बाजूला रिझर्व्ह बँकेकडून वारंवार झालेल्या व्याज दरवाढीमुळे जुलै महिन्यात नॅनोची विक्री दोनतृतीयांशने कमी होऊन ३ हजार २६० मोटारींवर आली. याच सुमारास बाजारात आलेल्या नवीन मोटारींचा परिणामही नॅनोच्या विक्रीवर झाला....
  August 26, 01:27 AM
 • मुंबई: बाजाराची सद्य:स्थिती पाहता रिझर्व्ह बँक आपले कडक धोरण सुरूच ठेवण्याची शक्यता तसेच जागतिक स्तरावर डळमळणारी आर्थिक स्थिती याचा विपरीत परिणाम ऑटो क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. येणारी दिवाळी वाहन क्षेत्रासाठी खडतर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.   वाढते व्याजदर तसेच इंधनाच्या भडकत्या किमतींमुळे सणासुदीच्या काळातही वाहन क्षेत्रात फारशा वाढीची शक्यता नाही. आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ झाल्यास विक्रीवर त्याचा अनिष्ट परिणाम होईल, असे मत इक्राचे वरिष्ठ विश्लेषक (ऑटो...
  August 25, 06:03 AM
 • मुंबई - चढे व्याजदर आणि इंधनांच्या वाढलेल्या किमतींमुळे अनेकांचे मोटार खरेदीचे स्वप्न पुरते भंगले आहे; परंतु तरीही जर तुम्हाला मोटार खरेदी करायची असेल तरी काही हरकत नाही. कारण मोटार खरेदी घटल्याने कंपन्याही चिंताग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांनी नव्या मोटारी स्वस्त तर देऊ केल्या आहेतच, पण डिस्काऊंटचा वर्षावही सुरू केला आहे. वाहन बाजारात आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने मागच्याच आठवड्यात आणलेली नवीन स्विफ्ट केवळ ४.२२ लाख रुपयांत...
  August 23, 12:44 AM
 • औरंगाबाद. ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रा. लि. आणि पगारिया ऑटोच्या शोरूमध्ये २० ऑगस्टपासून सुझुकीची नवीन स्विफ्ट कार बाजारपेठेत दाखल झाली आहे. या कारचे उद्घाटन भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवचरण फोकमारे आणि मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप चौधरी यांच्या हस्ते झाले. तब्बल १४० नवीन वैशिष्ट्ये, लांबी, रुंदी आणि अत्याधुनिक पद्धतीने बांधणी केलेले पॉवरपॅक, स्पोर्टी लूकसोबत ६ टक्के डिझेल आणि ४ टक्के पेट्रोल इंधनात बचत या कारचे...
  August 21, 01:36 AM
 • मंदीचा अनेक देशांना आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये काही देशांची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे तर काही देश त्या मार्गावर आहेत. यामंदीचा भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो असे म्हटले जाते. पण अशा परिस्थितीतही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीला या वर्षी १ लाख ४० हजार गाडयांची विक्री करण्याचा विश्वास आहे.युरोपमध्ये प्रीमियम कारच्या मागणीमध्ये घट झाली असून त्याचा परिणाम मारूती कंपनीवर झाला असल्याचे कंपनीचे विपणन विभाग प्रमूख मयंक पारिख यांनी म्हटले आहे....
  August 20, 07:23 PM
 • मुंबई. भारतीय वाहन बाजारावर मंदीचे मळभ असतानाच युरोपमधील आघाडीच्या व्होक्सवॅगन कंपनीने पूर्णपणे नवीन डिझाइन आणि शक्तिशाली इंजिन असलेली जेट्टा मोटार आकर्षक रूपात बाजारात आणली आहे. या मोटारीची विक्री सप्टेंबरपासून सुरू होणार असून तिची दिल्लीतील एक्सशोरूम किंमत १४ लाख १० हजार रुपयांपासून असल्याचे कंपनीच्या प्रवासी मोटार विभागाचे संचालक नीरज गर्ग यांनी सांगितले. नवी जेट्टा मोटार २७ टक्के अधिक शक्तिशाली असून आकाराने ९० मिलिमीटर मोठी आहे. कँडी व्हाइट,...
  August 18, 03:27 AM
 • मुंबई - पश्चिम युरोपातील आर्थिक पेचप्रसंगाचा प्रवासी मोटारींच्या मागणीवर विपरीत परिणाम होण्याची भीती टाटा मोटर्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी कंपनीच्या ६६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केली. युरोपमध्ये पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवासी मोटारींची मागणी कमी होण्याची शक्यता असल्याने येणारे वर्ष भारतीय मोटार कंपन्यांसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याचे टाटा यांनी या वेळी सांगितले. टाटा मोटर्सची स्थानिक बाजारपेठेतील प्रवासी मोटारींची विक्री १०.७ टक्क्यांनी घसरून...
  August 14, 12:40 AM
 • नवी दिल्ली- भारतातील लोकप्रिय आणि सर्वात स्वस्त असलेली नॅनो कार आता सगळया जगावर राज्य करण्यासाठी तयार आहे. ही कार आता जगातील वेगवेगळया देशात तयार करून विकली जाणार आहे.टाटा मोटर्सने यासाठी अनेक देशांची निवड केली आहे. त्यामध्ये इंडोनेशिया, ब्राझील, पूर्व युरोपमधील काही देश असतील. येथे कारची निर्मिती करून त्याची विक्री केली जाणार आहे. यामुळे कार स्वस्तात तर तयार होईल त्याचबरोबर त्याचे मार्केटिंग करणेही सोपे होईल. त्याठिकाणी टाटा आपले नवे छोटे वाहन ऐस ची पण विक्री केली जाणार आहे.टाटाने...
  August 13, 02:13 PM
 • मुंबई - टाटा मोटर्स लिमिटेड आपल्या जॅग्वार लँड रोव्हर या उपकंपनीसाठी चीनमधील कंपनीशी संयुक्त सहकार्य करार करून जुळवणी प्रकल्प (असेंब्ली युनिट) उभारण्याचा विचार करीत असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष रतन टाटा यांनी टाटा मोटर्सच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. या संयुक्त सहकार्य करारामुळे चीनकडून वाहन उत्पादनावर आकारण्यात येणाया सर्वाधिक आयात शुल्काचा भार कमी करणे शक्य होऊ शकेल, असे टाटा यांनी सांगितले. सर्वाधिक आयात शुल्कावर मात करण्यासाठी काही उत्पादनांची निर्मिती...
  August 13, 12:41 AM
 • नवी दिल्ली - इंधनाच्या भडकलेल्या किमती, वाढते व्याजदर आणि मारुतीचे कमी झालेले उत्पादन यामुळे जुलै महिन्यातील कारविक्रीवर विपरीत परिणाम झाला असून ३० महिन्यांत प्रथमच अशी घट आली आहे. जुलै महिन्यात कारच्या विक्रीत १५.७६ टक्के घसरण दिसून आली. दुचाकीच्या विक्रीत मात्र १२.६१ टक्के वाढ झाली आहे. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै २०११ मध्ये देशातील कारची विक्री १,३३,७४७ झाली. गेल्यावर्षीच्या जुलैमध्ये ही विक्री १,५८,७६७ होती....
  August 10, 11:16 PM
 • नवी दिल्ली - मारुतीच्या अजून बाजारात दाखल न झालेल्या स्विफ्टची मात्र जोरदार हवा आहे. ही स्विफ्ट बाजारात येण्यापूर्वीच ४० हजार जणांनी या कारची आगाऊ नोंदणी केली आहे. मारुतीने या महिन्याच्या अखेरीस नव्या स्वरूपातील स्विफ्ट बाजारात आणण्याची जोरदार तयारी केली आहे. सध्या बाजारात असलेल्या स्विफ्टला अगदी नवे रूप देऊन ती बाजारात आणण्याची मारुतीची योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या स्विफ्टला १.२ लिटर पेट्रोल आणि १.३ लिटर डिझेल इंजिन असणार आहे. नवी स्विफ्ट जुन्या स्विफ्टपेक्षा...
  August 6, 12:21 AM
 • प्रतिस्पर्धी कंपन्यांशी टक्कर देण्यासाठी मारुती सुजुकी इंडिया आता डिझेल इंजिनच्या निर्यातीत कपात करणार आहे. भारतीय बाजारावर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.कंपनीला फोर्ड फिगो, टोयाटा लिवा आणि वोल्क्सवैगन पोलो यासारख्या नव्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. होंडाच्या येऊ घातलेल्या ब्रियो कारमुळेही स्पर्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मारुतीने म्हटले आहे की वेटिंग पिरीयड कमी करण्यासाठी स्विफ्टचे उत्पादन वाढवून दरमहा 18 हजार युनीटपर्यंत...
  August 5, 02:22 PM
 
जाहिरात

RECOMMENDED