Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली - मारुती सुझुकीच्या डिझेल इंजिन कारखान्यातील कर्मचा-यांचा संप मिटल्याने कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. मानेसर येथील कार कारखान्यात कर्मचा-यांची धुसफूस कायम असली तरी कंपनी येथील उत्पादन येत्या रविवारपासून सुरळीत करणार आहे. संपाचा तिढा मिटविण्यासाठी मारुती उद्योग कामगार युनियन आणि हरयाणा सरकारचा कामगार विभाग आणि कंपनीच्या व्यवस्थापनात चर्चा सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
  September 17, 11:00 PM
 • फ्रँकफर्ट - बीएमडब्ल्यू कंपनीच्या कार रस्त्यांवर धावतात हे आपल्याला इतके दिवस माहीत होते. परंतु आता कंपनी लवकरच ई-स्कूटर बाजारात आणणार आहे. येथे भरलेल्या आॅटो शोमध्ये बीएमडब्ल्यू कंपनीने ई-स्कूटर प्रदर्शित केली आहे. प्रथमदर्शनी बघण्यास ही स्कूटर अगदी बाइकसारखी वाटते. ही स्कूटर 100 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकते. केवळ तीन तासांत ही स्कूटर चार्ज होईल. अर्थात ही बाइक बाजारात येण्यास आणखी थोडासा वेळ लागणार कंपनीने स्पष्ट केले आहे.
  September 17, 01:24 AM
 • नवी दिल्ली - सततच्या इंधन दरवाढीमुळे आधीच घायकुतीला आलेल्या वाहन उद्योगाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरवाढीमुळे चांगलाच हादरा बसला आहे. मंदावलेल्या वाहन उद्योगाला ऐन सणासुदीच्या दिवसांत व्याजदरवाढीमुळे करकचून ब्रेक लागणार असल्याची प्रतिक्रिया वाहन उद्योगातून व्यक्त होत आहे. आधीच बाजार मंदावलेला आहे, त्यातच दरवाढीमुळे सणासुदीच्या दिवसांतही वाहनांना ग्राहकी राहणार नाही, असे जनरल मोटर्स इंडियाचे उपाध्यक्ष पी. बालेंद्रन यांनी म्हटले आहे. आरबीआयकडून दरवाढीची अपेक्षा नव्हती,...
  September 16, 11:10 PM
 • या कार इतक्या सुंदर आहेत की तुम्ही एकदा पाहाल तर नजर खिळून राहील. तुमची उत्सुकता जास्त न ताणता या चार कारबाबत माहिती देतोच..
  September 16, 09:07 PM
 • गुरगाव - मारुती-सुझुकीच्या मानेसर येथील कारखान्यात सुरू असलेल्या कामगारांच्या संपाला गुरुवारी हिंसक वळण लागले. कामावर जाणा-या सुपरवायझरच्या एका गटावर झालेल्या हल्ल्यात 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी धीरज सोनी नावाच्या एका कामगाराला ताब्यात घेतले आहे. भीती निर्माण करण्यासाठी संपकरी कामगारांकडून उचलण्यात आलेले हे हिंसक पाऊल आहे. संपकरी कामगार येथील वातावरण बिघडवत असून, त्यांचे करिअर तसेच क्षेत्रातील प्रगतीला बाधा पोहोचू शकते. यामुळे मानेसर परिसरातील औद्योगिक...
  September 16, 01:00 AM
 • गुरगाव- मारुती-सुझुकीच्या मानेसर येथील कारखान्यात 29 आॅगस्टपासून संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी सुझुकीच्या आणखी दोन कंपन्यांतील कामगारही संपावर गेले आहेत. गुरगाव येथील औद्योगिक वसाहतीतील सुझुकी पॉवरट्रेन आणि सुझुकी मोटारसायकल प्रा. लि. या दोन कंपन्यांतील कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे.सुमारे 2000 कामगार असलेल्या सुझुकी पॉवरट्रेन कंपनीतील कामगार संघटनेचे अध्यक्ष सुबेसिंग यादव यांनी सांगितले की, मानेसर येथील कामगारांच्या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी या कंपन्यातील...
  September 15, 01:27 AM
 • मुंबई - महिंद्रा अँड महिंद्रा या आघाडीच्या कंपनीने महिंद्रा जेनियो या श्रेणीतील पिकअप वाहन जागतिक पातळीवरील बाजारात दाखल केले आहे. लहान आणि मध्यम, उद्योजक आणि अन्य लहान व्यावसायिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेला हा नवीन पिकअप ट्रक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच हा पिकअप ट्रक ऑस्ट्रेलिया बाजारपेठेकडे प्रवास सरू करणार आहे. आफ्रिका आणि आशिया बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण केल्यानंतर आता लॅटिन अमेरिकेतील देशांमध्येही विस्तार करण्याचा कंपनीचा...
  September 14, 12:23 AM
 • नवी दिल्ली - वाढते व्याजदर, भडकलेल्या इंधनाच्या किमती तसेच देशातील सर्वात मोठ्या कार निर्मिती कंपनी मारुतीच्या उत्पादनात झालेली घट यामुळे ऑगस्टमध्ये सलग दुस-या महिन्यात कार विक्रीत 10.08 टक्के घट झाली आहे. या महिन्यात अनेक दिग्गज कंपन्यांच्या वाहन विक्रीत घसरण झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सने (सियाम) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मोटारसायकलींच्या विक्रीत मात्र 15.43 टक्के वाढ होऊन विक्री 839,772 वर पोहोचली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 727,542 मोटारसायकलींची विक्री झाली होती....
  September 10, 11:50 PM
 • मुंबई - सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी भारतीय वाहन बाजारपेठेत आणखी दोन नवीन मोटारी आणण्याचा मर्सिडीझ बेंझची योजना असून बाजारपेठेतील स्थान बळकट करण्यासाठी पुढील तीन वर्षांमध्ये 10 नवीन मोटारींचे ब्रँड बाजारात आणण्याचा विचार असल्याचे कंपनीचे विक्री आणि विपणन विभागाचे संचालक देबाशिष मित्रा यांनी सांगितले. मर्सिडीज बेंझ इंडियाने गेल्या वर्षातील 80 टक्क्यांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये 40 टक्के विक्रीवृद्धीची नोंद केली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या...
  September 9, 11:36 PM
 • लक्झरी कार उत्पादन करणारी कंपनी बीएमडब्ल्यूने भारतात नवी डिझेल कार आणली आहे. भारतात एक्स-१ आणल्यानंतर एक्स-३ सुद्धा तयार केली आहे. भारतात हीच कार एक्स ड्राइव्ह २० डी आणि एक्स ड्राइव्ह ३० अशा दोन मॉडेल्समध्ये येत आहे. यापैकी एक्स ड्राइव्ह २० डी ची एक्स शोरूम किंमत भारतात ४१ लाख २० हजार तर एक्स ड्राइव्ह ३० ची किंमत ४७ लाख ९० हजार इतकी आहे. ही कंपनी भारतात लागोपाठ नवे मॉडेल्स बाजारात उतरवत आहे. या कारची जुळणी चेन्नईतील प्लँटमध्ये होणार आहे. एक्स ड्राइव्ह २० डीचे वितरण सप्टेंबर महिन्यात तर...
  September 9, 01:51 AM
 • नवी दिल्ली - कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने 1 ऑक्टोबरपासून सर्व वाहनांच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय टोयोटा-किर्लोस्कर कंपनीने जाहीर केला आहे. कच्चा माल तसेच येनच्या दरातील वाढ यामुळे आमच्या सर्व वाहनांच्या किमतीत 1 ऑक्टोबरपासून 1.5 ते 2 टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीचे डेप्युटी एम. डी. (मार्केटिंग) संदीप सिंग यांनी सांगितले. या वर्षात कंपनीने यापूर्वीही दोन वेळा किंमतवाढ केली आहे. एप्रिल आणि जुलैमध्ये कंपनीने एकूण 3 टक्क्यांनी किमती वाढवल्या होत्या.
  September 8, 02:16 AM
 • नवी दिल्ली - देशातील प्रवासी वाहनांची विक्री 2017 पर्यंत सध्याच्या 2.2 दशलक्षांवरून 5.6 दशलक्षांचा टप्पा गाठेल, असे मत सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सिअॅम) व्यक्त केले आहे. सिअॅमच्या संचालक मंडळाची वार्षिक सभा मंगळवारी झाली. त्या वेळी सिअॅमचे अध्यक्ष पवन गोयंका म्हणाले की, 12 व्या पंचवार्षिक योजनेतील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सध्याच्या विक्रीत वाढ करून ती 5.6 दशलक्ष वाहनांवर, तर निर्यात 1.3 दशलक्ष वाहनांवर न्यावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या क्षेत्रातील विक्री...
  September 8, 02:13 AM
 • नवी दिल्ली । सार्वजनिक मालकीच्या स्कूटर इंडिया कंपनीच्या विक्रीबाबतच्या हालचालींनी वेग घेतला असून याबाबतच्या निर्गुतवणुकीच्या प्रस्तावासाठी सकारात्मक हालचाली करण्यात येतील, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात प्रक्रिया सुरू असून काही बाबींवर विचार सुरू आहे. येत्या काही महिन्यांत यातून काही सकारात्मक घडेल, अशी अपेक्षा अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे. ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट उत्पादक संस्थेच्या मेळाव्याच्या वेळी...
  September 7, 12:34 AM
 • देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीच्या मानेसर प्लांटमध्ये सुरू असलेल्या संपाचा कंपनीला मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपनीला अलीकडेच लॉंच केलेल्या स्विफ्ट कारची बुकिंग थांबवावी लागली आहे. स्विफ्टचे प्रोडक्शन कंपनीच्या मानेसर प्लांटमधून केले जायचे. संपामुळे स्विफ्टचे प्रोडक्शन थांबले आहे.एकीकडे स्विफ्ट कारची मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू होती तर दुसरीकडे संपामुळे स्विफ्टचे प्रोडक्शन जवळपास थांबले होते. त्यामुळे बुकिंग थांबविण्याशिवाय कंपनीपुढे दुसरा पर्यायच नव्हता. नवीन...
  September 6, 07:53 PM
 • औरंगाबाद: बजाज कंपनीने बॉक्सरची १५० सीसी क्षमता असलेली भारत ही मोटारसायकल बाजारात आणली आहे. सानिया बजाज या शोरूममध्ये ती विक्रीसाठी उपलब्ध आहे. येथे ग्राहकांसाठी खास ऑफर्सही आहेत. बजाज कंपनी दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान एक नवीन मोटारसायकल बाजारात आणत असते. यंदा त्यांनी बॉक्सरला १५० सीसी क्षमतेचे इंजिन बसवून खडतर रस्त्यांवर चालू शकेल अशा पद्धतीने हे वाहन डिझाइन केले आहे. सर्वसाधारपणे १०० सीसी क्षमता असलेल्या मोटारसायकलच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये या बाइक उपलब्ध आहेत.शहरापासून...
  September 4, 04:01 AM
 • मुंबई: सणासुदीचा हंगाम कॅश करण्यासाठी वाहन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी येत्या डिसेंबरपर्यंत एक्सयूव्ही 500 हे नवीन एसयूव्ही वाहन बाजारात आणणार आहे. या नवीन एसयूव्हीची किंमत 12 ते 20 लाख रुपयांच्या दरम्यान असेल, अशी माहिती कंपनीच्या वाहन आणि कृषी व्यवसाय विभागाचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितले. जागतिक वाहन बाजारपेठेत स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल अर्थात एसयूव्हीला मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी भारतीय बाजारपेठेत मात्र लहान मोटारींचा वरचष्मा आहे....
  September 3, 03:27 AM
 • नवी दिल्ली: कामगार-व्यवस्थापनातील मतभेदाचा फटका मारुती-सुझुकी कंपनीला बसला असून, कार निर्मितीत देशातील सर्वात मोठी असणा-या या कंपनीच्या ऑगस्टमधील विक्रीत १३ टक्के घट झाली आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये ९१,४४२ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १,०४,७९१ वाहनांची विक्री केली होती. मानेसर येथील कारखान्यातील उत्पादनात आलेल्या व्यत्ययामुळे विक्री घटल्याचे कंपनीने म्हटले आहे. सुझुकीच्या मोटारसायकल विक्रीत ३९ टक्के वाढ नवी दिल्ली: दुचाकी निर्मिती क्षेत्रातील सुझुकी...
  September 2, 03:50 AM
 • नवी दिल्ली: जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंझ त्यांचे लक्झरी सी क्लास कार नव्या स्वरूपात सादर करणार आहे. ही कार सप्टेंबर महिन्यातच बाजारात आणली जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.कंपनीने सध्या बाजारात असलेल्या सीडान सी क्लास कारच्या मॉडेलमध्ये काही बदल केले आहेत. कारचे बम्पर, हेडलाईट पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक करण्यात आले आहेत. त्याच बरोबर इतर काही तांत्रिक बदल केले गेल्याने ही कार आता पहिल्यापेक्षा अधिक आकर्षक दिसू लागली आहे. सी क्लास या श्रेणीत कंपनी तीन नवीन मॉडेल बाजारात...
  September 2, 03:33 AM
 • नवी दिल्ली: मारुती सुझुकीच्या मानेसर येथील कारख्यान्यातील कामगार-व्यवस्थापनातील पेच कायम असून कंपनीने मंगळवारी १६ कामगारांना निलंबित, तर १२ प्रशिक्षणार्थींना कामावरून कमी केले आहे. कारखान्यातील उत्पादन ठप्पच असून कंत्राटी कामगारांच्या मदतीने पर्यायी उत्पादन व्यवस्था करण्यात येत असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. गुणवत्तेला बाधा पोहोचवण्याच्या आरोपावरून कंपनीने सोमवारी १० कामगारांना कामावरून काढून टाकले होते, ५ जणांना निलंबित केले तर ६ प्रशिक्षणार्थींना कामावरून...
  August 31, 03:46 AM
 • पारदर्शक कार तुम्ही आतापर्यंत पाहिलीय का..? नाही ना.. परंतु ही कार ट्रान्सपरंट आहे. 1939 मध्ये ही कार जनरल मोटार्सने बनवली होती. या कारचे नाव होते पॉटिएफ डिलक्स सिक्स. या कारचे नाव घोस्ट कार असेही होते.जुलै महिन्यात या कारचा लिलाव झाला आणि ही कार तब्बल 3 लाख 8 हजार डॉलरला म्हणजे भारतीय चलनात 1 कोटी 36 लाख रुपयांमध्ये विकली गेली. तुमच्या माहितीस्तव सांगतो, ही कार जेव्हा तयार झाली तेव्हा तिची किंमत अवघी 25 हजार डॉलर इतकी होती. म्हणजे 11 लाख रुपये! ही अमेरिकी बनावटीची पहिली कार आहे, जी पारदर्शी आहे. या कारची...
  August 28, 12:24 PM
 
जाहिरात

RECOMMENDED