जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Auto

Automobile News

 • कमी मायलेज मिळत असल्यामुळे हैराण असलेल्या कारचालकांसाठी आता खूशखबर आली आहे. आता एक अशी कार तयार होत आहे जी एका लिटरमध्ये 240 किलोमीटर इतकी धावेल. आता तुम्ही म्हणाल असे कसे होईल? होय, असे झाले आहे. भारतातील 11 अाभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या टीमने अशी कार तयार केली आहे, जी प्रती लिटर 240 किलोमीटर इतका अॅव्हरेज देते. त्यांनी या कारचे नाव द्रोण असे ठेवले आहे. अडीच लाख रूपये खर्चून तयार करण्यात आलेली ही कार मलेशियातील क्वालांलपूर येथे सुरू असलेल्या सिपांग इंटरनॅशनल सर्किटमध्ये प्रदर्शित...
  June 12, 04:17 PM
 • मुंबई - महिंद्रा अँड महिंद्राची नवी एक्सयूव्ही 500 ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. दुस-या टप्प्यातील आरक्षणाला सुरुवात होऊन दोन दिवस उलटत नाहीत तोच या एक्सयूव्हीसाठी 7 हजारांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे. एक्सयूव्ही 500 साठी 8 जूनपासून देशपातळीवर बुकिंगला सुरुवात झाली आहे. या गाडीची किमत 11.58 लाख ते 14.11 लाख रूपये (दिल्ली एक्स - शोरूम) आहे. दुस-या टप्प्यातील एक्सयूव्ही 500च्या देशपातळीवरील बुकिंगला 8 जूनपासून सुरुवात झाली असून आता ही एक्सयूव्ही देशभरातील 100 पेक्षा जास्त वितरकांकडे उपलब्ध...
  June 11, 11:27 PM
 • नवी दिल्ली - चढे व्याजदर आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किमती देशातील वाहनांच्या विक्रीसाठी मोडे स्पीडब्रेकर ठरले आहेत. परिणामी मे महिन्यात मोटारींच्या विक्रीत केवळ 2.78 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोटार उद्योगाच्या विक्रीचा हा गेल्या सात महिन्यांतील नीचांक आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या मे महिन्यात 1 लाख 63 हजार 229 मोटारींची विक्री झाली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत 1 लाख 58 हजार 809 मोटारींची विक्री झाली होती....
  June 11, 11:25 PM
 • मुंबई - पेट्रोलच्या सातत्याने भडकणा-या किमतींमुळे डिझेल कारची मागणी वाढते आहे. विशेषत: छोट्या शहरांतून ही मागणी अधिक आहे. ही मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्स, फियाट इंडिया या कंपन्यांनी आपले लक्ष आता छोट्या शहरांकडे वळवले आहे. टाटा मोटर्सचे सीएफओ सीव्ही रामचंद्र यांनी सांगितले की, डिझेल कारची मागणी आणि विक्री छोट्या शहरांतून वाढते आहे. डिझेल कारची ही मागणी लक्षात घेता आता आम्ही छोट्या शहरांत वितरण जाळे मजबूत करण्यावर भर देणार आहोत. छोटी शहरे आणि ग्रामीण भागात 300 रिटेल केंद्रे उघडण्याचा...
  June 10, 12:09 AM
 • नवी दिल्ली - डिझेलवर दिले जाणारे अनुदान व कमी दराने आकारले जाणारे उत्पादन शुल्क यामुळे प्रत्येक डिझेल कारमागे सरकारला वार्षिक सुमारे एक लाख रुपये नुकसान सहन करावे लागत आहे. हे लक्षात घेता, डिझेल कारवर उत्पादन शुल्कासह अतिरिक्त शुल्क आकारण्याबाबतच्या प्रस्तावावर गंभीर चर्चा सुरू आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून डिझेल कारवर अतिरिक्त शुल्क आकारण्याची मागणी केली जात आहे. डिझेल कार निर्मात्या कंपन्यांकडून यासंदर्भात मत मागवण्यात आले असून त्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार आहे. अर्थ...
  June 10, 12:03 AM
 • नवी दिल्लीः सध्याच्या तांत्रिक युगात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लोक आता इंटरनेटची मोठी मदत घेताहेत. देशात सध्या 12 कोटींहून अधिक इंटरनेट ग्राहक आहेत. ताज्या अहवालानुसार कार खरेदीपूर्वी 50 टक्के ग्राहक आपल्या पसंतीसाठी इंटरनेटवरील माहितीचा आधार घेत आहेत. एवढेच नव्हे तर यातील निम्म्याहून अधिक ग्राहक इंटरनेटवरील माहितीवरून आपली पसंत पक्की करतात. गुगल इंडियाच्या वतीने नीलसनने देशातील प्रमुख कार कंपन्यांच्या शोरूममध्ये केलेल्या ऑफलाइन संशोधनातून ही बाब समोर आली आहे. या डीलरकडे...
  June 7, 08:58 AM
 • मुंबई- इंधन दरवाढीचा फटका मोटार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडियालाही बसला आहे. विक्री घसरल्यामुळे आता मारुतीने सर्वाधिक विक्री होणार्या अल्टो मोटारीसह पेट्रोलवर चालणार्या अन्य काही मोटारींच्या उत्पादनाला सध्या कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.मोटार बाजारपेठेत मरगळ असल्यामुळे या दिवसांमध्ये पेट्रोलवर चालणार्या मोटारींची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे मोटारींचा अतिरिक्त साठा करण्यात अर्थ नाही त्यामुळे पेट्रोलवर चालणार्या मोटारींच्या उत्पादनात कपात...
  June 7, 08:44 AM
 • ह्योसंग या कोरियन दुचाकी गाड्याची डिलरशिप गरवारे मोटार कंपनीकडून डिएसके उद्योगसमूहाने त्यांच्या ताब्यात घेतली आहे. ह्योसांगच्या दुचाकिंचे उत्पादन करण्यासाठी 300 कोटी रूपये गुंतवले जाणार असल्याची घोषणा कंपनीचे व्यावस्थापकीय संचालक शिरीष कुलकर्णी यांनी आज (गुरूवारी) पत्रकार परिषदेत केली.सध्या वाईत असलेला जुळणी प्रकल्प नाईलाजाने राज्यबाहेर न्यावा लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की , भविष्यात आम्ही ज्या हाय एंड दुचाकी बनवणार आहोत त्यातील 90 टक्के भाग हे भारतात तयार...
  June 6, 04:34 PM
 • मुंबई । ड्युरो डीझेड या दुचाकीला ग्राहकांकडून मिळालेल्या लक्षणीय प्रतिसादानंतर महिंद्रा टू व्हीलर्स कंपनी आता या महिन्यात रोडिओ आरझेड ही आणखी एक स्टायलिश पण तितकीच शक्तिशाली स्कूटर बाजारात आणण्याचा विचार करीत आहे. रोडिओ आरझेड या बाजारात येणा-या स्कूटरमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये असून तरुणाईबरोबरच आजच्या मॉडर्न पती - पत्नींच्या पसंतीसही ती उतरेल, असा विश्वास महिंद्रा टू व्हीलर्सच्या विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष वीरेन पोपली यांनी सांगितले. रोडिओ आणि ड्युरो या दोन स्कूटर्स...
  June 4, 11:28 PM
 • नवी दिल्ली - जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो दाखल झाल्यानंतर आता जगातील सर्वात स्वस्त बाइक देशाच्या रस्त्यांवर लवकरच धावणार आहे. यामाहा इंडियाने ही बाइक आणण्याची जोरदार तयारी चालवली आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील जपानच्या या दिग्गज कंपनीने अद्याप या बाइकचे नाव ठरवलेले नाही. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बाइकची किंमत 27,500 रुपयांपर्यंत राहील. ही स्वस्त बाइक सर्वप्रथम भारत आणि आफ्रिकेच्या बाजारपेठांत उतरवण्याची यामाहाची योजना आहे. सध्या या मोटारसायकल निर्मिती प्रकल्पाचे काम...
  June 4, 11:03 PM
 • नवी दिल्ली - अर्थसंकल्पात अनेक करांत वाढ झाल्यानंतरही महाग झालेल्या कार तसेच इतर वाहनांना ग्राहकांनी बर्यापैकी प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटार, महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटासारख्या ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी मेमध्ये चांगली विक्री नोंदवली आहे. तर मारुती-सुझुकी, जनरल मोटर्स, फोर्ड आणि टीव्हीएस मोटर्स या कंपन्यांना मात्र विक्रीतील घसरणीचा झटका बसला आहे. 2011 हे वर्ष विक्रीच्या पातळीवर अत्यंत खडतर गेल्यानंतर नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाहन विक्रीची...
  June 2, 06:16 AM
 • नवी दिल्ली - पेट्रोलच्या भडकणार्या किमतीच्या झळा आता जुन्या पेट्रोल कारच्या (प्री-ओन्ड) बाजारपेठेला बसत आहेत. जुन्या कारच्या बाजारातील विविध कार कंपन्यांच्या वितरकांकडे चौकशीचे प्रमाण 50 टक्के घटले आहे. त्यातही जुन्या पेट्रोल कारबाबत चौकशी करणार्यांचे प्रमाण नगण्य झाले आहे. यामुळे जुन्या पेट्रोल कारच्या किमतीत 5 ते 10 टक्के घट येण्याची शक्यता आहे. याउलट, जुन्या डिझेल कारबाबत अधिक चौकशी होत आहे. मात्र, या वितरकांकडे जुन्या डिझेल कार पुरेशा प्रमाणात नाहीत.वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार,...
  June 2, 06:07 AM
 • नवी दिल्ली - रुपयाच्या अवमूल्यनाचा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही आमच्या कारच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे टोयोटा-किर्लोस्कर मोटार कंपनीने म्हटले आहे. दरवाढीबाबत येत्या एक-दोन दिवसांत घोषणा करण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक (मार्केटिंग) संदीप सिंग यांनी सांगितले की, रुपयाच्या घसरणीमुळे आमच्यावर प्रचंड दबाव आहे. सध्याच्या किमतीत आता आम्ही आमच्या कारची विक्री करण्यास असमर्थ आहोत. येत्या एक-दोन दिवसांत किमती वाढवण्यात येणार आहेत. दरवाढीचा...
  May 31, 06:36 AM
 • नवी दिल्ली - कार कंपन्यांच्या नफ्याचे मीटर लाल सिग्नल दाखवत आहे. हे मीटर हिरव्या झोनमध्ये आणण्यासाठी कार कंपन्यांची धडपड सुरू आहे. एकीकडे पेट्रोल कारच्या विक्रीचे चाक फसले आहे, तर दुसरीकडे रुपयाचे अवमूल्यन या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. यातून वाचण्यासाठी कंपन्या आता वेगवेगळ्या धोरणांवर विचार करताहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वितरकांच्या मदतीने कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. तसेच निर्यातीला गती देण्यावर या कंपन्यांनी भर दिला आहे.देशातील सर्वात मोठी प्रवासी कार...
  May 30, 07:26 AM
 • मुंबई - महिंद्रा अँड महिंद्राची नवी एक्सयूव्ही 500 हवीहवीशी वाटणा-या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकलप्रेमींची प्रतीक्षा आता संपली आहे. पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बाजारात आल्यानंतर जबरदस्त प्रतिसाद मिळालेल्या या एक्सयूव्हीची दुस-या टप्प्यातील नोंदणी 8 जूनपासून पुन्हा सुरू करण्याचा महिंद्रा अँड महिंद्राचा विचार आहे. एक्सयूव्ही 500 बाजारात आल्यानंतर या एक्सयूव्हीला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 8 हजार ग्राहकांनी या नव्या एक्सयूव्हीसाठी मागणी...
  May 28, 11:49 PM
 • नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात लिटरमागे 7.50 रुपयांचा भडका उडाला. या भडक्यात अनेकांचे खिसे पोळले. यातून पेट्रोल कार मालकांचे हाल, तर विचारायलाच नको. या नव्या दरवाढीमुळे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) किटच्या व्यवसायात प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोल दरवाढ झाल्यापासून आतापर्यंत सीएनजी किटच्या मागणीत 50 टक्के तेजी दिसून आली आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातमधील सीएनजी वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार चार-पाच दिवसांत सीएनजी किटची चौकशी करणा-यांच्या संख्येत 50 टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक मागणी...
  May 28, 11:39 PM
 • नवी दिल्ली - कार बाजारात सध्या मंदीचे सावट आहे. एकीकडे पेट्रोल कारची विक्री ठप्प झाल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे डिझेल कारवरची ग्राहकांची मायाही पातळ होताना दिसते आहे. मारुती स्विफ्ट, डिझायर, आय-20, वेर्ना आदी डिझेल कारसाठी आतापर्यंत 30 ते 32 आठवडे प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता बहुतेक डिझेल कार लगेच उपलब्ध होत आहेत. चढे व्याजदर, सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे ग्राहकांवरील डिझेल कारची मोहिनी कमी झाली आहे. देशातील सर्वात मोठी कतार निर्माती कंपनी मारुती- सुझुकीच्या एका वरिष्ठ...
  May 28, 11:20 PM
 • वेगाचा कोण शौकिन नसतो, भलेही त्याच्याकडे वेगानी धावणारी कार अथवा दुचाकी नसेल किंवा घेण्याची ऐपत नसेल म्हणून काय झाले. पण वेगाने धावणा-या कार्स व भारी दुचाक्या सर्वांनाच आवडतात की राव. तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही कार दाखवणार आहोत की त्यांचा वेग वा-यासारखा आहे. त्यात तुम्हाला सवारी करायची असेल तर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. छायाचित्रातून पाहा जगातील सगळ्यात महाग आणि वेगवान कार्स...
  May 27, 05:10 PM
 • नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात झालेल्या मोठ्या भाववाढीचा भार हलका करण्यासाटी ह्युंदाई इंडिया मोटार लिमिटेडने पेट्रोल प्राइज लॉक योजना सादर केली आहे. या योजनेनुसार ह्युंदाइच्या इऑन, सँट्रो, आय-10, आय-20, असेंट आणि व्हेर्ना या कारच्या खरेदीवर सवलत देण्यात येणार आहे. आगामी सात महिन्यांत होणा-या इंधनवाढीचा फटका यामुळे ग्राहकांना बसणार नाही. ही योजना 31 मे पर्यंतच्या खरेदीवर लागू आहे. सँट्रो आणि आय-10 च्या खरेदीवर सध्या सुरू असलेल्या 5-स्टार अॅश्युरन्स योजनेचाही लाभ ग्राहकांना घेता येणार आहे....
  May 27, 12:45 AM
 • मुंबई - दुचाकी बाजारात सध्या स्वस्त मोटारसायकली बाजारात आणण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. यामाहा मोटर्स या आघाडीच्या कंपनीने जगातील सर्वात स्वस्त मोटारसायकल आणण्याची घोषणा केली आहे. स्वस्तातल्या मोटारसायकलींची वाढती मागणी लक्षात घेऊन यामाहा ही नवीन मोटारसायकल विकसित करणार आहे. ही मोटारसायकल आफ्रिकेतल्या बाजारपेठेसाठी असली तरी भारतीय बाजारपेठेतदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हीरो मोटोकॉर्पची 36 हजार 300 रुपयात उपलब्ध असेली सीडी डॉन ही सध्याची स्वस्त मोटारसायकल आहे; परंतु यामाहा...
  May 27, 12:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात