Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली - झेक रिपब्लिकच्या स्कोडा ऑटो कंपनीच्या स्कोडा ऑटो इंडियाने येती फोर बाय टू ही स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) भारतीय बाजारात सादर केली आहे. कंपनीने या कंपनीचे दोन मॉडेल्स अॅक्टिव्ह आणि एम्बिशन सादर केले आहेत. अॅक्टिव्ह मॉडेलची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 13,46,159 रुपये तर एम्बिशनची किंमत 14,32,195 रुपये आहे. ही कार प्रतिलिटर 17.72 किलोमीटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. भारतातील सध्या उपल्ब्ध असणा-या एसयूव्ही मॉडेलपेक्षा हे मायलेज सर्वाधिक आहे. येतीची वैशिष्ट्येस्कोडा...
  November 27, 02:10 AM
 • चीनमधील मकाऊ कार शोमध्ये बुगाटीने सुपरकार सादर केली. या कारची किंमत सुमारे 85 लाख रुपये आहे. चीनमधील अतिश्रीमंत वर्गात अशा सुपरकारला चांगली मागणी आहे. त्यामुळेच बुगाटीने ही कार तेथे सादर केली आहे.
  November 26, 02:36 AM
 • नवी दिल्ली- कोरियन कंपनी हुंदाईची छोटी कार आय-10 हिने बाजारात धूम माचवली आहे. गेल्या महिन्यात कमाल केली असून, लोकांची मने जिंकण्यात ती यशस्वी ठरली आहे.ऑक्टोबर महिन्यात या कारने सर्वात जास्त विकल्या जाणाऱयात दुसरा क्रमांक मिळविला आहे. फक्त एवढेच नाही तर, मारुतीच्या वॅगन आरला तिने तिच्या स्थानामधून फेकून दिले आहे. कारण आय-10ची विक्री ऑक्टोबर महिन्यात ११ हजार ५५७ इतकी झाली आहे. तर वॅगन आर ची विक्री घटून ती ७, ९३४ वर आली आहे. तिसऱया नंबरवर टाटा मोटर्सची इंडिका विस्टा आहे.पहिल्या क्रमांकावर मारुती...
  November 22, 01:18 PM
 • नवी दिल्ली - टाटा मोटर्सने नॅनोमध्ये अनेक चांगले बदल केले आहेत. किमतीत कोणतेही बदल न करता कंपनीकडून नव्या नॅनोमध्ये अधिक शक्तिशाली इंजिन, अधिक मायलेजसह वेगवेगळे फिचर्स जोडण्यात आले आहेत. टाटाचे 624 सीसीचे इंजिन नॅनोला लावण्यात आले आहे. या इंजिनची शक्ती 35 पीएसवरून 38 पीएस अशी वाढवण्यात आली आहे. तर टार्क 48 एनएमवरून वाढवून 51 एनएम करण्यात आला आहे. इंजिनची शक्ती वाढवल्यानंतर मायलेजही वाढले आहे. या नव्या इंजिनची नॅनो 25.4 किलोमीटर प्रतिलिटर असे मायलेज देणार आहे. सध्याची नॅनो 23.6 किलोमीटर प्रतिलिटर...
  November 22, 04:34 AM
 • ऑटोमोबाइल कंपन्यांत सध्या स्वस्त आणि जास्त अँव्हरेज देणार्या कार निर्माण करण्याची जबरदस्त स्पर्धा चालली आहे. या दृष्टिकोनातून सर्व कंपन्या वेगवेगळ्या प्रकारची वाहने तयार करत आहेत. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा आता सर्वात स्वस्त आणि अगदी लहान कार आणण्याच्या तयारीला लागली आहे. एका मिनी एसयूव्ही कारवर याची तयारी चालू आहे. ती दिसेल एसयूव्हीसारखी, पण असेल सर्वात लहान. शिवाय अँव्हरेजही सर्वाधिक असणार आहे. हिचा सर्वात जास्त आकर्षणाचा मुद्दा म्हणजे तिची किंमत....
  November 18, 07:05 PM
 • नवी दिल्ली- जपानमधील प्रमुख कंपनी टोयोटा मोटार आपली खास अशी कार प्रदर्शित करण्याच्या मार्गावर आहे. या कारची खासियत ही आहे की, ही कार जबरदस्त मायलेज देणारी आहे.टोयोटाची ही कार अक्वा आणि टोकीयो येथील मोटार शोमध्ये दाखविली जात आहे. परदेशात या कारचे नाव प्रयास सी आणि हायब्रीड कार असे असेल. ही कार एका लिटरमध्ये ३५ किलोमीटरइतकी धावेल. त्यामुळे ही कार जगातील सर्वाधिक फायद्याची ठरणार आहे.ही कार पाच सीटची असेल. तसेच तिचे प्रथम जपानमध्ये लॉंचिंग केले जाईल. त्यानंतर इतर देशात लॉंच केली जाईल. यात १.५...
  November 16, 07:40 PM
 • नवी दिल्ली: मारुती सुझुकीने डिझेल कारच्या किमती 10 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. सोमवारपासूनच ही वाढ लागू करण्यात आली. डीलरना कंपनीने इ-मेलवरून किमतीबाबत सूचना दिल्या आहेत. अधिका-यांनी या किंमतवाढीला दुजोरा दिला आहे.मॉडेल वाढ जुनी किंमत नवी किंमतरिट्झ 2,000 4.93 ते 5.29 4.95 ते 5.31स्विफ्ट 10,000 5.17 ते 6.38 5.27 ते 6.48डिझायर 10,000 5.86 ते 7.20 5.96 ते 7.30र फोर 10,000 7.79 ते 9.01 7.89 ते 9.11(किमती लाखांत, एक्स शोरूम, दिल्ली)डिझेल कार उत्पादन खर्चात झालेली वाढ व जपानी येन वधारल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. येन वाढल्याने जपानहून सुट्या भागांची...
  November 15, 05:25 AM
 • मुंबई: कर्जात बुडालेल्या किंगफिशर एअरलाइन्सने सरकारकडे मदतीची याचना केल्याबद्दल प्रसिद्ध उद्योगपती व बजाज ऑटोचे प्रमुख राहुल बजाज यांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांना सरकारी मदत मिळायला नको आणि जे मरत आहेत त्यांनी मरायलाच हवे, असे बजाज यांनी म्हटले आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल बजाज म्हणाले, मी खासगी क्षेत्रातील माणूस आहे हे मी गर्वाने सांगतो. खासगी कंपन्यांना सरकारकडून बेलआऊट पॅकेज दिले जाण्याचे गणित माझ्या लक्षातच येत नाही. उद्या चालून...
  November 14, 05:24 AM
 • भविष्यातील कार या आताच्या कारपेक्षा अनेक बाबतीत खूपच वेगळ्या आणि स्मार्ट असतील. त्या चालवताना तुम्हाला पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींची चिंता करण्याची मुळीच गरज पडणार नाही. कारण या पेट्रोल- डिझेलवर चालणारच नाही. छोट्या आकारामुळे ट्रॅफिकमधूनही ही सहज निघून जाईल. निसानने अशी पिव्हो-3 ही कार तयार केली असून तिच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. याकोहामा येथे 12 नोव्हेंबरपासून ही कार लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे.चाचणी यशस्वीतेनंतर काही वर्षांनी ही कार भारतात उपलब्ध होईल. पिव्हो-3 ची...
  November 13, 03:43 AM
 • पुणे- टाटा मोटर्सने आपली प्रसिध्द एसयूव्ही सुमोचा आणखी एक नवा अंदाज ग्राहकांसाठी सादर केला आहे. या नवीन सुमोचे डिझाइनच सुंदर नाही तर, तिचे मायलेजही खूप चांगले आहे.कंपनीच्या या नव्या सुमोचे नाव ठेवण्यात आले आहे टाटा सुमो गोल्ड. ही सुमो विक्टाची जागा घेईल. सुमो विक्टाची किंमत ५.४३ लाख रुपये होती तर सुमो गोल्डची किमत ५.२३ लाख रुपये (एक्स शो रुम) असेल.सुमो गोल्डचे अनेक मॉडेल आहेत. याची किंमत ५.२३ पासून सुरु होत आहे. ही गाडी एका लिटरमध्ये १४.०७ किलोमीटर चालते. जी सुमो विक्टा १२.२ चालत होती. गोल्डचे...
  November 12, 04:11 PM
 • नवी दिल्ली - देशातील एकूण कारविक्री सातत्याने घटत असली तरी डिझेल कारसाठीचा प्रतीक्षा कालावधी मात्र 10 महिन्यांवर पोहोचला आहे. पेट्रोलच्या किमतीत वारंवार होणा-या वाढीमुळे पेट्रोलवर चालणा-या कारच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. ज्या कारचे पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही मॉडेल उपल्ब्ध आहेत, त्यात 80 टक्के विक्री डिझेल मॉडेलची होत आहे. यामुळे कार निर्मात्या कंपन्यांना डिझेल मॉडेलची मागणी पूर्ण करण्यासाठी 10 महिन्यांचा कालावधी लागत आहे. देशातील दुस-या क्रमांकाची कार निर्माती ह्युंदाई मोटर इंडिया...
  November 9, 10:45 PM
 • नवी दिल्ली - सातत्याने वाढणारे व्याजदर, भडकलेल्या इंधनाच्या किमती आणि कामगारांच्या संपाचा मारुतीला बसलेला फटका यामुळे ऑक्टोबरमधील कार विक्रीत 23.77 टक्क्यांनी घट आली आहे. गेल्या 10 वर्षांतील एका महिन्यातील ही सर्वाधिक घट आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल्स मॅन्युफॅक्चरर्सने (सिअॅम) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ऑक्टोबरमध्ये 1,38,521 कारची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 1,81,704 कारची विक्री झाली होती. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या मनेसर येथील...
  November 9, 10:43 PM
 • नवी दिल्ली - देशातील एकूण कार बाजारात दोनतृतीयांश हिस्सा असणा-या छोट्या कारच्या मैदानातील स्पर्धा आणखी तीव्र व चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी ह्युंदाई मोटर्सने इऑन ही छोटी कार सादर केली आहे. त्यानंतर फोक्सवॅगन 2012 च्या सुरुवातीला आपली सर्वात स्वस्त कार अप सादर करण्याच्या तयारीत आहे, तर फ्रान्सची कार निर्माती कंपनी रेनो जानेवारीमध्ये पल्स ही छोटी कार भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2012 मध्ये होणा-या ऑटो...
  November 7, 11:07 PM
 • हुंडईने छोट्या विभागातील आपली इऑन कार नुकतीच बाजारात आणली. याआधी होंडाने ब्रिओ सादर केली आहे. सध्या अनेक कंपन्यांमध्ये छोट्या कारचा बाजार काबीज करण्यासाठी रेस सुरू आहे. टाटाच्या लखटकिया अर्थात एक लाख रुपये किमतीच्या कारनंतर बजाजनेही स्वस्त कार बाजारात आणण्यासाठी 2008 मध्ये तिचा नमुना सादर केला होता. ती लवकरच बाजारात येणार आहे. जाणून घेऊया लवकरच विक्रीस येणार्या आणि तुमच्या खिशाला परवडतील अशा छोट्या कारबाबत.फोक्सवॅगन अप- जगभरातील छोट्या कारच्या बाजारात फोक्सवॅगन कंपनी प्रवेश करत आहे....
  November 6, 03:17 PM
 • मुंबई - टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या इव्होक या नव्या स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकलची जुळवणी नजीकच्या काळामध्ये आपल्या पुण्यातील प्रकल्पात करण्याचा विचार करीत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी. एम. तेलंग यांनी दिली. टाटा मोटर्सच्या मुंबईतील शोरूममध्ये इव्होकच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. लँडरोव्हरच्या इव्होकची किमत 45 लाख रुपये, तर टॉप एंड प्रकारातील एसयूव्हीची किंमत 56.7 लाख रुपये आहे. टाटा मोटर्सने इव्होक एकूण चार प्रकारांत सादर केली असून त्यातील तीन डिझेल, तर एक पेट्रोल...
  November 5, 01:32 AM
 • नवी दिल्ली - सध्या कार निर्मात्या कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्सचा धडाका लावला आहे. कारची घटती विक्री आणि वाढता साठा यामुळे अनेक कंपन्या आपल्या विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती देत आहेत. काही कंपन्या किमतीत सवलत देत आहेत, तर काही कंपन्यांनी कमी व्याजदरात कार देण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. सणांच्या हंगामातून विशेष काही हाती न लागल्यामुळे कार निर्मात्या कंपन्यांनी विक्री वाढवण्याच्या दृष्टीने ऑफर्सचा आधार घेतल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांत अशा...
  November 5, 01:25 AM
 • होय, सांगायला ही जगातील सर्वात वेगवान कार आहे; पण याचे मायलेज पाहता आश्चर्य वाटेल अशी परिस्थिती आहे. आम्ही सांगतोय एफ वनमध्ये पळणार्या वेगवान कारच्या बाबतीत. ही कारमध्ये 100 लिटर पेट्रोलमध्ये फक्त 75 किलोमीटर धावते. पण वेगाच्या बाबतीत इतर कारच्या तुलनेत कोणत्याही दुसर्या कारच्या कितीतरी पटीने वेगवान आहे. ही कार ताशी 320 कि.मी. वेगाने धावते. फॉर्म्युला वन ट्रॅकवर धावणार्या या कारचे इंजिन कोट्यवधी रुपयांच्या किमतीचे असते. एका सीझनमध्ये एक टीम कारच्या रेसिंग आणि टेस्टिंगमध्ये 2 लाख लिटर...
  November 4, 03:41 PM
 • लम्बॉघिनी कंपनीने नवी दिल्लीत एक्सक्लुसिव्ह मोटर्सच्या वितरण व्यवस्थेच्या मदतीने लाम्बोरघिनी अॅडव्हेंटेडर एलपी 700-4 ही नवी कार सादर केली. त्यावेळी एक्सक्लुसिव्ह मोटर्सचे सत्या बागला. 700 हॉर्स पॉवर शक्तीचे इंजिन असणारी ही कार 0 ते 100 किलोमीटरचा वेग 2.9 सेकंदात प्राप्त करते. दिल्लीतील या कारची एक्स शो-रूम किंमत 3.69 कोटी रुपये आहे.
  November 4, 01:32 AM
 • नवी दिल्ली - देशातील दुस-या क्रमांकाची मोटारसायकल निर्माती कंपनी बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत ऑक्टोबरमध्ये 7 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या 3,29,776 वाहनांची विक्री झाली होती. ऑक्टोबर 2012 मध्ये कंपनीने 3,51,083 वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या निर्यातीतही 19.53 टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2010 मध्ये कंपनीच्या 1,10,387 वाहनांची निर्यात झाली होती. ऑक्टोबर 2012 मध्ये कंपनीने 1,31,948 वाहनांची निर्यात केली आहे. कंपनीच्या तीनचाकी वाहनांच्या विक्रीतही 7.68 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी...
  November 3, 05:03 AM
 • ऐन सणाच्या हंगामातही ऑक्टोबरमध्ये वाहन विक्री बेताची राहिल्याने कंपन्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या कार निर्माती कंपनीला गेल्या 10 वर्षांत प्रथमच विक्रीतील मोठ्या घसरणीला सामोरे जावे लागले. गेले काही महिने विक्रीत सातत्यपूर्ण वाढ दाखवणाया ह्युंदाई मोटर्सच्या विक्री-वाढीला ब्रेक लागला आहे. गेले दोन महिने विक्रीत मोठी घसरण दाखवणाया टाटा मोटर्सच्या नॅनोच्या विक्रीत मात्र 26 टक्के वाढ झाली आहे. इतर वाहन कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी सणाचा हंगाम...
  November 2, 05:11 AM
 
जाहिरात

RECOMMENDED