Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली- आॅटोमोबाईल इतिहासातील सर्वात मोठे डिस्काऊंट या कंपनीतर्फे देण्यात येत आहे. आतापर्यंत कोणत्याच कार उत्पादक कंपनीने एवढे डिस्काऊंट दिले नव्हते. र्जमनीची लक्झरी कार निर्मिती करणारी फॉक्सवॅगन कंपनी आपल्या ग्राहकांना डिस्काऊंट देणार आहे. फॉक्सवॅगन ही युरोपमधील कार उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.त्यांच्या फेंटॉन या मॉडेलला रेकॉर्डबे्रक डिस्काऊंट मिळणार आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २५ लाख रूपयांची सूट कंपनीने या कारला दिली आहे. भारतात या कारची किंमत ७७ लाख...
  July 25, 07:41 PM
 • कोलकाता । देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुतीची उत्पादनक्षमता पुढील दोन वर्षांत १७.५ लाख कारपर्यंत जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली. दोन वर्षांत तिसरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर एकूण उत्पादनक्षमता १७.५ लाख कारपर्यंत जाईल, अशी माहिती व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी एम. एम. सिंग यांनी दिली. ते सीआयआयच्या वाहतूक परिषदेत बोलत होते. गुरगाव येथील तीन प्रकल्प व मानेसर येथील प्रकल्पात वार्षिक १३ लाख गाड्या निर्माण होतात.
  July 23, 02:27 AM
 • पुणे. जागतिक स्तरावरील ऑटोमोबाइल उद्योगातील ख्यातनाम ब्रँड असणा-या रेनॉल्टची पहिली लक्झरी सेडान कार फ्लुएन्स बुधवारी पुण्यात सादर करण्यात आली. शिवाजीनगर येथील आलिशान शोरूममध्ये रेनॉल्ट इंडियाचे वितरण आणि विपणन अधिकारी लेन करन आणि शोरूमचे व्यवस्थापकीय संचालक विजय शहा तसेच महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला. याप्रसंगी लेन करन म्हणाले, फ्लुएन्सच्या रूपाने रेनॉल्ट हा ब्रँड भारतात सादर करताना अतिशय आनंद वाटत आहे. रेनॉल्टची फ्लुएन्स खास आशियाई...
  July 21, 01:16 AM
 • नवी दिल्ली. सरकारने वाहन नोंदणीसाठी आज दोन नव्या योजनांची सुरुवात केली असून त्यामुळे देशभरात वाहन नोंदणी सुलभ होणार आहे. वाहन परवान्यांसाठी सारथी ही योजना तर वाहन नोंदणीसाठी आयसीटी आधारित वाहन ही योजना सुरू करण्यात आली असून त्याचा लोकांना प्रचंड फायदा होणार आहे, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री सी. पी. जोशी यांनी दिली.
  July 21, 12:50 AM
 • ट्राफिकमध्ये अडकून बसून वेळ वाया घालविण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हवेत उडणारी कार लवकरच सर्वांसमोर येणार आहे. टेराफुजिया या कंपनीने हवेत उडणाऱ्या कार बनविण्याचा विडा उचलला असून, येत्या पाच वर्षांत ती सर्वांसमोर येणार आहे.अमेरिका स्थित या कंपनीने ही कार बनविण्याची योजना आखली असून, अमेरिका सरकारने याला परवानगी दिली आहे. सध्या या कारची किंमत २५ हजार अमेरिकी डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. वास्तविक पाहता ही कार म्हणजे एक कमी वजनाचे विमान आहे. हे विमान रस्त्यांवरही चालू शकते. हे विमान आपले पंख...
  July 19, 05:12 PM
 • नवी दिल्ली. जपानी कार कंपनी होंडाने आपली छोटी कार जॅझसाठी पावणेदोन लाख रुपयांची सवलत जाहीर केली आणि कार कंपन्यांत ग्राहक राजासाठी सवलती जाहीर करण्याची जणू स्पर्धाच लागली. होंडापाठोपाट मारुती, फियाट, शेव्हरले, मर्सिडीज व ऑडी या कंपन्यांनीही ऑफर जाहीर केल्या. घटत्या विक्रीमुळे हैराण झालेल्या कंपन्या आता सवलतीच्या आधाराने विक्री वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. मारुती सुझुकीने विक्री वाढवण्यासाठी तसेच इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर...
  July 19, 01:47 AM
 • नवी दिल्ली । हीरो ग्रुपने हीरो होंडा या संयुक्त उद्योगातील वाटा विकल्याने झालेल्या भांडवली लाभापोटी ८११ कोटी रुपयांचा कर अदा केला असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे. हीरोने ही रक्कम दोन टप्प्यांत दिली असून त्यापैकी १०० कोटी मार्चमध्ये, तर ७११ कोटी एप्रिलमध्ये अदा केले. यामध्ये त्यांनी कसलीही सूट मागितली नाही, अशी माहिती सीबीडीटीच्या प्रवक्त्याने दिली.
  July 15, 06:07 AM
 • मुंबई । भारतात २०१५ पर्यंत सादर करण्यात येणा-या नवीन आठ जागतिक वाहनांपैकी एक सेडानची नवी आवृत्ती अमेरिकन कार कंपनी फोर्डने सादर केली असून तिची किंमत १०.५१ लाख रुपये असणार आहे. फोर्ड फिएस्टाच्या या सेडान श्रेणीतील कारचे उत्पादन चेन्नईत होणार आहे. सेडानचे उत्पादन करणारे हे जगातील सहावे स्थान ठरणार आहे. सन २०१५ पर्यंत इथे सादर होणा-या आठ वाहनांपैकी पहिली फिएस्टा सादर करून फोर्डने बाजाराशी असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे, असे फोर्ड इंडियाचे अध्यक्ष मायकल बोनहॅम यांनी म्हटले आहे .
  July 15, 06:00 AM
 • मुंबई- वाहन निर्मिती क्षेत्रातील नामवंत कंपनी टाटा मोटर्सने थायलंडमधील आपल्या विस्तार योजनेला तूर्तास ब्रेक लावला आहे. टाटा मोटर्सची नजर आता गतीने वाढणा-या इंडोनेशियाच्या बाजारपेठेवर आहे. इंडोनेशियातील एका प्रमुख वाहन कंपनीबरोबर नॅनोचे उत्पादन करण्याबाबत टाटा मोटर्सची बोलणी सुरू आहे. थायलंडमधील एका प्रमुख वृत्तपत्रात या संदर्भातील वृत्त आले आहे. त्यानुसार नॅनोचे थायलंडमध्ये उत्पादन करण्याची योजना मागे पडली असून टाटांची नजर आता इंडोनेशियावर आहे. इंडोनेशिया २००९ पासून नॅनो...
  July 15, 05:47 AM
 • नवी दिल्ली- पुढील वर्षी दिल्लीत भरणा-या आटो एक्स्पोमध्ये बजाजच्या सहयोगाने तयार होणारी २०० सीसीची मोटारसायकल सादर करण्यात येईल, असे केटीएम कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. आस्टेलियातील स्पोर्ट्स मोटारसायकल बनवणा-या केटीएम या कंपनीत बजाज आटोची ४० टक्के भागीदारी आहे. यांच्या सहयोगातून बनलेली पहिली मोटारसायकल नुकतीच युरोपच्या बाजारपेठेत दाखल करण्यात आली आहे.केटीएमचे सीईओ स्टीफन पिरर यांनी सांगितले की, भारतात सादर करण्यात येणा-या २०० सीसी मोटारसायकलचे उत्पादन बजाजच्या पुणे येथील...
  July 14, 06:01 AM
 • औरंगाबाद - टोयोटा किलरेस्कर मोटरने नुकतीच सादर केलेली हॅचबॅक सेगमेंटमधील इटिओस लिव्हा शहरातील शरयू टोयोटामध्ये दाखल झाली आहे. 4 लाख 12 हजारांपासून सुरू होणारी इटिओस लिव्हा व्हर्मिलॉन रेड, अल्ट्रामरीन ब्ल्यू, सिंफनी सिल्व्हर, व्हाइट, सेलेस्टीअल ब्लॅक, सिरीन ब्ल्युईश सिल्व्हर आणि हार्मनी बेज हे सात रंग व पाच विविध प्रकारांत उपलब्ध आहे.टोयोटाच्या इटिओसला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर हॅचबॅक प्रकारातील हे मॉडेल सादर करण्यात आले आहे. क्यू क्लास o्रेणीतील या कारचे डिझाइन अत्यंत स्टायलीश...
  July 12, 10:57 AM
 • नवी दिल्ली - आरबीआयने जाहीर केलेली व्याज दरवाढ आणि मारुती-सुझुकीच्या मानेसर येथील प्रकल्पात 13 दिवस चाललेल्या संपामुळे घरगुती प्रवासी कारच्या विक्रीत 1.62 टक्क्यांची घट झाली. गेल्या 27 महिन्यांतील ही सर्वांत मोठी घट आहे.सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सकडून (सियाम) जारी माहितीनुसार मागील वर्षी जून महिन्यातील 1,41,086 कारच्या तुलनेत जूनमध्ये देशात 1,43,370 कारची विक्री झाली आहे. मार्च 2009 पासून झालेली ही सर्वात क्षुल्लक वाढ असून त्या वेळी हा आकडा 1.16 टक्के होता, अशी माहिती सियामचे अध्यक्ष...
  July 12, 10:47 AM
 • जगाचे लक्ष वेधून घेणारी टाटा मोटर्सची नॅनो मोटर मागील महिन्यात नेपाळमध्ये लॉंच करण्यात आली होती. नेपाळमध्ये नॅनो मोटारीला मागणी चांगली असून १० दिवसात ३५० नॅनो गाडीचे बुकिंग झाले आहे. नॅनोची किंमत नेपाळमध्ये ७.९८ लाख रुपये ठेवली आहे. भारतीय चलनानुसार त्याची किंमत पाच लाख रुपये होते. तरीही नेपाळमधली ही सर्वाधिक स्वस्त कार आहे. नेपाळमध्ये नॅनो कार सिपरादी ट्रेडिंग या अधिकृत डीलरमार्फत विकली जात आहे. त्यांनी सांगितले की, सध्या विक्रीच्या ४० टक्के ग्राहक नॅनोचे बुकिंग करत आहेत. त्यामुळे...
  July 10, 04:33 PM
 • नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कारनिर्माती कंपनी मारुतीने तिच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मारुती स्विफ्ट कारचे उत्पादन थांबवले असून पुढील महिन्यात नवीन प्लॅटफॉर्मवरून स्विफ्टची नवी आवृत्ती सादर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मारुतीने स्विफ्टचे उत्पादन थांबवले असून आॅगस्टमध्ये कंपनी स्विफ्टची नवी आवृत्ती सादर करणार आहे. स्विफ्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यानंतर कंपनी पहिल्यांदाच उत्पादन थांबवून मॉडेलमध्ये सुधारणा करणार आहे. नवी स्विफ्ट वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून...
  July 8, 02:48 AM
 • नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कारनिर्माती कंपनी मारुतीने तिच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मारुती स्विफ्ट कारचे उत्पादन थांबवले असून पुढील महिन्यात नवीन प्लॅटफॉर्मवरून स्विफ्टची नवी आवृत्ती सादर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मारुतीने स्विफ्टचे उत्पादन थांबवले असून आॅगस्टमध्ये कंपनी स्विफ्टची नवी आवृत्ती सादर करणार आहे. स्विफ्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यानंतर कंपनी पहिल्यांदाच उत्पादन थांबवून मॉडेलमध्ये सुधारणा करणार आहे. नवी स्विफ्ट वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून...
  July 8, 02:48 AM
 • नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कारनिर्माती कंपनी मारुतीने तिच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मारुती स्विफ्ट कारचे उत्पादन थांबवले असून पुढील महिन्यात नवीन प्लॅटफॉर्मवरून स्विफ्टची नवी आवृत्ती सादर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मारुतीने स्विफ्टचे उत्पादन थांबवले असून आॅगस्टमध्ये कंपनी स्विफ्टची नवी आवृत्ती सादर करणार आहे. स्विफ्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यानंतर कंपनी पहिल्यांदाच उत्पादन थांबवून मॉडेलमध्ये सुधारणा करणार आहे. नवी स्विफ्ट वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून...
  July 8, 02:47 AM
 • नवी दिल्ली - इनोव्हा या कारला टक्कर देण्यासाठी देशातील कार उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी लवकरच नवी कार बाजारात आणणार आहे. मारुतीची ही नवी कार मल्टी परपज व्हीकल (एमपीवी) असणार आहे.टायोटाच्या इनोव्हाला टक्कर देण्यासाठी बाजारात आणण्यात येणाऱ्या या कारमध्ये सात सीट असणार आहेत. गेल्या काही महिन्यात मारुती प्रथमच नवीन कार बाजारात आणत आहे. आर ३ असे या कारचे नाव असून, तिची किंमत सात लाख रुपये असणार आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्हीवर चालणारी आहे. जास्तीत जास्त ही कार १७ किलोमीटर...
  July 7, 12:56 PM
 • नवी दिल्ली- लक्झरी कार बनविणाया ऑडी इंडिया कंपनीच्या जून २०११ मधील विक्रीत ७५.११ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात कंपनीने ४०८ कारची विक्री केली. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात कंपनीने २३३ कारची विक्री केली होती असे कंपनीने म्हटले आहे. यंदाच्या जानेवारी ते जून या सहा महिन्यांत कंपनीने गतवर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत दुप्पट विक्री केली आहे. गतवर्षी जानेवारी-जून या कालावधीत कंपनीने १४०० वाहनांची विक्री केली होती. यंदा ही विक्री २८०२ पर्यंत पोहोचली आहे. याबाबत आॅडी इंडियाचे प्रमुख मायकेल...
  July 6, 01:22 AM
 • नवी दिल्ली- टाटा मोटर्सची छोटी आणि लोकप्रिय कार नॅनोला मोठा धक्का बसला आहे. या कारच्या विक्रीच्या वेगास अचानक ब्रेक लागला असून विक्रीचा वेग कमालीचा मंदावला आहे.जून महिन्यात नॅनोची विक्री २९ टक्के इतकी कमी झाली. गेल्या महिन्यात त्यांच्या फक्त ५,४५१ कारच विकल्या गेल्या. उलट यामहिन्यात ते दहा हजाराचा टप्पा पूर्ण करतील असा विश्वास कंपनीला होता. पण अचानक कारची मागणी कमी झाली आणि विक्रीला ब्रेक लागला.टाटाच्या फक्त नॅनोलाच हा धक्का बसला नसून त्यांच्या इतर गाडयांचीही विक्री कमी झाली आहे....
  July 3, 03:36 PM
 • नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठय़ा कार निर्मिती करणार्या मारुती सुझुकी कंपनीच्या जून महिन्यातील विक्रीत 8.8 टक्क्यांची घट झाली आहे. या महिन्यात कंपनीच्या मनेसर येथील कारखान्यात झालेल्या 13 दिवसांच्या संपाचा विक्रीवर विपरीत परिणाम झाल्याचे मानण्यात येत आहे.गतवर्षीच्या जून महिन्यात कंपनीने एकूण 88091 कारची विक्री केली होती. यावर्षी जूनमध्ये यात घट होऊन हा आकडा 80298 पर्यंत खाली आला. यासंदर्भात कंपनीने सांगितले की, मनेसर कारखान्यातील संपामुळे उत्पादनावर परिणाम झाला. 4 जूनपासून सुरू झालेला हा संप...
  July 3, 10:45 AM
 
जाहिरात

RECOMMENDED