जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली - फेसबुक, ट्विटर या साइटकडे तरुणांचा असलेला ओढा आणि त्यावरील आवडीनिवडी, चर्चा कॅश करण्याच्या प्रयत्नात ऑटो कंपन्या आहेत. मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई मोटर इंडिया आणि टाटा मोटार्स या कंपन्या आपली उत्पादने विकण्यासाठी सोशल साइट्सचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्यांदा कार खरेदी करणारे अनेक ग्राहक बाजारातील विविध कारची माहिती सोशल नेटवर्किंग साइटवरून घेत असल्याचे गेल्या वर्षी दिसून आले. त्यामुळे ऑटो बाजारपेठेमध्ये ई-मार्केटिंगचा ट्रेंड वाढत आहे. या ग्राहकांना...
  January 22, 11:43 PM
 • नवी दिल्ली - आपला जुना भागीदार हीरोपासून फारकत घेतल्यानंतर होंडाने भारतातील वाहन बाजारात झेंडा रोवण्याचा निर्धार केला आहे. हीरोच्या विक्रीला शह देण्यासाठी होंडा आता सर्वात स्वस्त बाइक बाजारात आणणार आहे. 2020 पर्यंत देशातील क्रमांक एकची मोटारसायकल कंपनी बनण्याची होंडाची योजना आहे. होंडापासून वेगळे झाल्यानंतरही सध्या हीरो मोटोकॉर्प ही देशातील क्रमांक एकची मोटारसायकल कंपनी आहे. हीरो मोटोकॉर्पला त्या स्थानावरून खाली खेचण्यासाठी होंडाने कंबर कसली आहे. हीरोची 100 सीसी डॉन, स्प्लेंडर,...
  January 22, 07:37 AM
 • नवी दिल्ली - ऑटो एक्स्पोमध्ये धूम माजवणारी मारुती सुझुकीची एर्टिगा ही शानदार कार मार्चमध्ये बाजारात दाखल होणार आहे. कंपनीच्या एका अधिका-याने सांगितले की, ऑटो एक्स्पोमध्ये लोकप्रिय ठरलेली आमची एमपीव्ही एर्टिगा कार आता मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या कारबाबत वाहनप्रेमींमध्ये बरीच उत्सुकता आहे. या कारच्या किमतीविषयी कंपनीकडून अधिकृत काहीही सांगण्यात आले नाही. 1377 सीसीच्या पेट्रोल एर्टिगाची किमत 7 लाख रुपयांपासून सुरू होईल, असे समजते, तर डिझेल एर्टिगा आठ लाख रुपयांपासून...
  January 21, 12:53 AM
 • नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीचे लोकप्रिय कार स्विफ्ट डिझायरचे नवे मॉड़ेल सादर करणार आहे. कंपनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे नवे मॉडेल सादर करेल. या नव्या कारचे वैशिष्टये हे आहे की, जुन्या मॉडेलपेक्षा हिचा आकार छोटा व आकर्षक आहे. तसेच ती नव्या प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध असेल.कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक पारीख यांनी सांगितले की, या नव्या मॉडेलसाठी भरपूर खर्च केला आहे. तसेच मागच्या कारच्या तुलनेत नवे १५० फीचर्स सामील केली आहेत. तसेच आकार छोटा...
  January 16, 03:59 PM
 • टाटा मोटर्सच्या इंजिनियर्सनी आणखी एक कमाल केली आहे. याआधी जगातील सर्वात स्वस्त कार (नॅनो) टाटाने बाजारात आणून खळबळ माजवून दिली होती. आता त्यांनी जगातील सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणून आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे.टाटा मोटर्सने आपली ही ड्रीम कार काल डेट्रॉयटमधील कार शो मध्ये सादर केली. तिथे या गाडीचे खूप कौतूक करण्यात आले.या कारचे नाव इमो असे ठेवण्यात आले आहे. ही गाडी पेट्रोल-डीझेलऐवजी वीजेवर चालेल. ही गाडी बनविण्यासाठी पुणे, डेट्रॉयट, इंग्लड आणि जर्मनीतील येथील ३०० इंजिनिअरनी...
  January 13, 10:59 AM
 • औरंगाबाद: निस्सान कंपनीची सनी ही नवी कार शिरीन निस्सान येथे दाखल झाली आहे. अनेक वेगळ्या वैशिष्ट्यांसह सनी नटलेली असल्याचे शिरीन निस्सानचे जनरल मॅनेजर अखिल खान यांनी सांगितले.ते म्हणाले की, सनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. सनीची किमत 5.5 लाखांपासून सुरू होते. अधिक सुरक्षेसाठी सेन्सर टी, मोठी लेग रूम, टायगर आयकॉन हेडलाइट, फॉग लाइट, अलाय व्हील या र्शेणीतील इतर कारच्या तुलनेत अधिक चांगले टनग रेडियस, ड्युएल एसी, मागील सीटसाठी रिअर एसी कंट्रोल व ब्लोअर, बसण्यासाठी सोफ्यावर...
  January 13, 08:38 AM
 • मुंबई: कच्च्या तेलाच्या किमतीची अनिश्चितता, पेट्रोलचे चढे दर, चढे व्याजदर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रदूषणाचा वाढता प्रश्न यावर उपाय म्हणून मोटार कंपन्यांना आता इलेक्ट्रिक मोटारींचा फंडा पटू लागला आहे. नवी दिल्लीतील ऑटो एक्स्पोचे सूप वाजलेले असले तरी बहुतांश मोटार कंपन्यांनी सादर केलेल्या इलेक्ट्रिक वा हायब्रीड मोटारी हेच या प्रदर्शनाचे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले असे म्हणावे लागेल.मोटार उद्योगात हरित संदेश देताना मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटार, निसान, महिंद्रा अँड महिंद्रा आणि...
  January 13, 08:35 AM
 • नवी दिल्ली - भारतात सर्वाधिक विकली जाणारी ऑल्टो आणि विक्रीचे रेकॉर्ड बनविणारी मारुती ८०० या कार्सची निर्मिती बंद करण्याचा निर्णय मारुती सुझुकीने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होईल. या दोन्ही कार्सची निर्मिती बंद करून कंपनी एक नवीन कार बाजारात आणणार आहे. मारुति सुझुकीचे एमडी शिंजो नाकानिसी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, 'नव्या कारच्या निर्मितीचे काम सुरु आहे. नवी कार २०१३ पर्यंत बाजारात येईल. ही कार अधिक माइलेज देईल आणि दिसायलाही आकर्षक असेल.'नव्या कारचे इंजिन...
  January 12, 11:25 AM
 • नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून विक्रीत येणार्या घटीमुळे चिंतित झालेल्या वाहन क्षेत्राला डिसेंबरमधील विक्रीच्या आकड्यांनी दिलासा मिळाला आहे. विक्री घटल्याने कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी सवलतींचे आमिष दाखवले होते. याचा योग्य परिणाम झाला आणि डिसेंबरमध्ये कारच्या विक्रीत 8.49 टक्के वाढ दिसून आली. जानेवारीत होणार्या संभाव्य भाववाढीमुळेही ग्राहकांनी डिसेंबरमध्ये कार खरेदी करण्यावर भर दिल्यानेही विक्रीत वाढ झाली आहे.सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सने...
  January 11, 03:23 AM
 • नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या ११ व्या ऑटो एक्स्पोत सोमवारी महिंद्रा अँड महिंद्राने हायड्रोजनवर धावणारी जगातील पहिली थ्री व्हीलर ऑटो सादर केली. हॉयअल्फा नावाची ही प्रदूषणविरहित ऑटो लवकरच दिल्लीच्या रस्त्यांवर धावताना दिसेल.कंपनीच्या ऑटोमेटिव्ह आणि फॉर्म इक्युव्हमेंट शाखेचे अध्यक्ष पवन गोयंका हे हॉयअल्फा सादर करताना म्हणाले की, वाहतूक सुलभ बनविण्यासाठी बांधील असणा-या महिंद्रा अँड महिंद्राचा उद्देश पर्यायी इंधनावर चालणारे तंत्र उपलब्ध करणे आहे. हॉयअल्फा या दृष्टीने...
  January 10, 11:16 AM
 • नवी दिल्ली- टाटा मोटर्स २०१२ शेवटच्या काळात नॅनो गा़डीचे सीएनजी मॉडेल लॉंच करणार आहे. कंपनीच्या योजनेनुसार, या वर्षात थायलंड, म्यानमार, इंडोनिशिया आणि बांग्लादेश यासारख्या नव्या बाजारपेठेत उतरण्याचा विचार करीत आहेत. कंपनी येत्या आर्थिक वर्षात विविध उत्पादन व विस्तारासाठी ३००० हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. टाटा मोटर्सचे एमडी पी. एम. तेलंग यांनी सांगितले की, नॅनोचे सीएनजी मॉडेल लवकरच बाजारात आणण्याचा आम्ही विचार करीत आहोत. आम्हाला आशा आहे की, याचे काम प्रगतीपथावर चालू असून, या...
  January 9, 03:17 PM
 • दिल्लीमध्ये भरलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये कार उत्पादक कंपन्यांनी एकापेक्षा एक आकर्षक मॉडेल्स सादर केले आहेत. जर्मन कंपनी मर्सिडीज बेंझच्या एका मॉडेलने कार शौकिनांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती तिच्या जबरदस्त ताकदीमुळे इथे चर्चेचा विषय बनली आहे.एसएलएस एमजी रोडस्टर असे या मॉडेलचे नाव असून भारतीय रस्त्यावर धावण्यासाठी ती सज्ज आहे. या कारला 571 अश्व शक्तीचे शक्तिशाली इंजिन आहे. यामध्ये आठ सिलेंडर आहेत. यामुळे या कारला 3.8 सेकंदात 100 किमी. प्रतितास वेग मिळतो.ही कार 317 किमी प्रतितास वेगाने धावते आणि...
  January 9, 12:01 PM
 • नवी दिल्ली - यावेळी राजधानीतील ऑटो एक्स्पोमध्ये जपानी कंपनी निसान मोटर्सने इलेक्ट्रिक कार लीफ सादर केली. पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ही कार १७५ किमी चालू शकेल. ऑटो एक्स्पोमध्ये अन्य वाहनांसोबतच ग्रीन कार्सचीही चलती आहे. महिंद्रा अँड महिंद्राने रेवाचे कन्सेप्ट मॉडेल सादर केले आहे तर हीरो कॉर्पने या सेगमेंटमध्ये टू-व्हीलर सादर केली. अन्य कंपन्याही मागे नाहीत.निसान : लीफ जपानी कंपनी निसान मोटर्सने इलेक्ट्रिक कार लीफ सादर केली.किंमत : १८ ते २० लाख.बाजारात केंव्हा - लवकरचफीचर्स मॅक्सिमम...
  January 9, 10:30 AM
 • नवी दिल्ली - तीनचाकी वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या पियाजो व्हेइकल्स या कंपनीने येथे सुरू असलेल्या अकराव्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनामध्ये व्हेस्पा सादर करून पुन्हा एकदा स्कूटर बाजारपेठेत प्रवेश केला आहे. येत्या काही वर्षांमध्ये स्कूटर बाजारपेठेत वृद्धीच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी पुन्हा स्कूटर बाजारपेठेत प्रवेश केल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी चोप्रा यांनी सांगितले. पियाजोचा महाराष्ट्रात बारामतीमध्ये याअगोदरच...
  January 6, 11:09 PM
 • रेनोने दिल्ली येथे सुरु असलेल्या ११ व्या ऑटो एक्स्पोमध्ये पल्स ही कार पहिल्यांदाच सादर केली. हॅचबॅक सेगमेंटची ही कार मारुतीच्या स्विफ्ट आणि स्कोडा फेबियाला टक्कर देईल. याच्या बेस व्हेरिएंट आरएक्सएलची किंमत ५.७७ लाख रुपये आहे तर हाय व्हेरिएंट आरएक्सझेडची किंमत ६.२५ लाख रुपये असेल. ही कार व्ही प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. हॅचबॅक असूनही या कारमध्ये अनेक सुविधा आहेत. यामध्ये ड्राइव्हर साईड एअरबॅग, पॉवर स्टियरिंग, पॉवर विंडो, फॉलो मी हेडलॅंप आदी सुविधा आहेत. यानंतरचे व्हर्जन असलेल्या...
  January 6, 01:22 PM
 • नवी दिल्ली - जगातील प्रमुख वाहन प्रदर्शनांपैकी एक असणा-या ऑटो एक्स्पोच्या दुस-या दिवशीचे मुख्य आकर्षण आहे तोयोटाची लेक हॅंगर कार, जनरल मोटर्सची लेक हॅंगर आणि हिरोची बाईक. देशाच्या राजधानीत सुरु असलेल्या या भव्य प्रदर्शनात हीरो मोटो कॉर्पकडून बाईक आणि महिंद्राकडून दोन गाड्या सादर होतील. फोर्स एसयूव्हीदेखील आजच्या ऑटो एक्स्पोमधील आकर्षण ठरणार आहे. अशोक लेलॅंड आणि डॅमलरकडून ट्रक सादर होतील.या वाहन प्रदर्शनामध्ये ५० बहुराष्ट्रीय कंपन्या आपली उत्पादने सादर करतील. देशातील २४ तर ८ कार...
  January 6, 10:41 AM
 • नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुतीने गुरुवारी 11 व्या ऑटो एक्स्पोमध्ये एसयूव्ही श्रेणीत दाखल होत असल्याची घोषणा करत एक्सए अल्फा मॉडेल सादर केले.मारुती सुझुकी इंडियाचे एमडी व सीईओ शिंजो नाकानिशी यांनी ही घोषणा केली. भारत ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी अर्थव्यवस्था बनू पाहत आहे. म्हणूनच ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपनी नव्या श्रेणीतील वाहने सादर करणार आहे. नियोजित एसयुव्ही एक्सए अल्फा मॉडेल सुझुकी मोटर कॉर्प आणि मारुती सुझुकी इंडियाने अवघ्या दहा महिन्यात तयार केले...
  January 6, 01:54 AM
 • नवी दिल्ली - नॅनो कारने गरिबांची कार ही ओळख पुसण्याची संधी सुरुवातीच्या काळात गमावली असल्याचे टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी कबूल केले आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी टाटा मोटार्स सर्व शक्तीने प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले.प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टाटा म्हणाले, नॅनो कारची खिल्ली उडवण्याचे अनेक प्रयत्न हितशत्रूंनी केले. आम्ही नॅनो ही गरिबांची कार असल्याचे कधीच म्हटले नव्हते, उलट परवडणारी फॅमिली कार म्हणून नॅनोची ओळख निर्माण करण्याची आमचे प्रयत्न होते. ही भ्रामक समजूत...
  January 6, 12:41 AM
 • नवी दिल्ली - येथील प्रगती मैदानावर आजपासून सुरु झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये साधारण सर्वच कार उत्पादकांनी आपल्या कार प्रदर्शनात ठेवल्या आहेत. मारुती सुजूकीने त्यांची शानदार युएसव्ही एक्स ए अल्फा या कारचे लॉचिंग करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने निसानची शानदार ईवालिया कार लाँच केली. ही कार भारतातील मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवून बनविण्यात आली आहे.पश्चिम बंगालमध्ये कार प्रकल्प सुरु करण्याची टाटांची इच्छा
  January 5, 06:29 PM
 • नवी दिल्ली - टाटा उद्योग समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा कार प्रकल्प सुरु करण्याचा विचार बोलून दाखविला आहे. गुरुवारी ते पश्चिम बंगालबाबत खुलासा करतांना म्हणाले, जर पश्चिम बंगाल सरकारचे सहकार्य मिळाले तर राज्यात पुन्हा कार प्रकल्प सुरु करता येईल. सिंगूर विवादासाठी त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना जबाबदार धरले आहे. वेळ आल्यानंतर त्यांची नावेही जाहीर करण्यात येतील, असेही ते म्हणाले.एक लाख रुपये किंमत असलेल्या टाटा नॅनोला भारतीय मध्यमवर्गाने चांगला प्रतिसाद दिला...
  January 5, 03:50 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात