Home >> Business >> Auto

Automobile News

 • नवी दिल्ली- मे महिन्यात देशात सर्व वाहनांची चांगली विक्री झाली. कारच्या विक्रीत गतवर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात ७ टक्के वाढ दिसून आली. गतवर्षी मे महिन्यात १४८४२५ कारची विक्री झाली, तर यंदाच्या मेमध्ये १५८८१७ कारची विक्री झाली. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम) ने यासंदर्भातील आकडेवारी गुरुवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार गतवर्षी मे महिन्यात ७२५३११ मोटारसायकलींची विक्री झाली. यंदाच्या मे महिन्यात ती १४.३३ टक्क्यांनी वाढून ८२९२५५ इतकी...
  June 11, 03:47 AM
 • मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या मानेसर येथील कारखान्यातील कामगारांचा संप सलग सहाव्या दिवशीही सुरूच राहिल्याने कंपनीचे 210 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परिस्थिती कालच्या प्रमाणेच असून उत्पादन ठप्प असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. मारुती सुझुकी एम्पलॉईज युनियन या नव्या कामगार संघटनेला मान्यता देण्याची मानेसर येथील कामगारांची मागणी आहे. दरम्यान मानेसर-गुरगाव औद्योगिक पट्टय़ातील सुमारे 1000 कामगारांनी गुरुवारी मानेसर येथे सत्याग्रह करून कामगारांच्या संपाला पाठिंबा...
  June 10, 01:25 PM
 • नवी दिल्ली- औरंगाबादच्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात ऑडी ६ या सेडान श्रेणीतील कारचे उत्पादन सुरू केल्याची घोषणा गुरुवारी लक्झरी कार निर्माती जर्मन कंपनी ऑडीने केली आहे. या वर्षाखेरपर्यंत ऑडी ६ भारतीय बाजारात सादर होणार असून त्या अनुषंगानेच हे उत्पादन सुरू झाल्याची माहिती कंपनीचे भारतातील मुख्याधिकारी मायकल पर्श्क यांनी दिली. शेंद्र्यातील ऑडीच्या प्रकल्पात दरवर्षी २००० ऑडी ६ कारची निर्मिती होणार आहे. सप्टेंबर २००७ मध्ये शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक परिसरात ऑडीचा...
  June 10, 01:21 AM
 • चारचाकी गाडी घेणारे ग्राहक प्रथम लक्ष देतात ते गाडी किती मायलेज देते. त्यामुळे अलीकडच्या काळात सर्वच ऑटो कंपन्या आता गाडीच्या गुणवत्तेबरोबरच मायलेजकडे लक्ष देत असल्याचे दिसून येते. टाटाची एक कार आता एक लिटरमध्ये ४६ किलोमीटर धावली आहे. त्यामुळे टाटाच्या या गाडीला लिम्का बुक ऑफ रिकॉडर्समध्ये स्थान मिळाले आहे. टाटाची मांजा (पेट्रोल) एक लीटरमध्ये सर्वसाधारणपणे १२.२ किलोमीटर मायलेज देते. तर महामार्गावर ती १५.१ लिटर मायलेज देते. मांजा (डिझेल) एका लिटरमध्ये शहरात १३.८किलोमीटर मायलेज देते. तर...
  June 9, 03:07 PM
 • नवी दिल्ली- मागील महिन्यात झालेल्या पेट्रोल दरवाढीतून कच्च्या तेलाचा खर्च भरून निघत नसल्याने सरकारी तेल कंपन्या १६ जूनपासून पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात पन्नास पैशांची वाढ करण्याची शक्यता आहे. राजकीय दबाव न आल्यास आम्ही १५ जूनच्या मध्यरात्रीपासून पेट्रोलचा भाव वाढवू इच्छितो, असे विधान देशातील सर्वात मोठी तेल पुरवठादार कंपनी इंडियन आॅइल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिका-याने केले आहे. मागील महिन्यात झालेल्या पेट्रोल दरवाढीनंतरही तेल कंपन्यांना लिटरमागे ४ रुपये ५८ पैशांचे नुकसान...
  June 9, 02:37 AM
 • मुंबई- मोटार वाहन कायद्यानुसार सर्व वाहन मालकांनी थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर घेणे अनिवार्य आहे. दरवर्षी लाखो लोक रस्त्यांवर होणा-या अपघातांत जीव गमावतात. वाहन विम्यात जीवन विमा आणि आरोग्य विम्यात संरक्षण नसणाया नुकसानीलाही संरक्षण दिलेले असते. नवीन बदल : सध्या वाहन विम्याच्या क्षेत्रात खूप बदल होत आहेत. वाहन विमा क्षेत्राच्या मूलभूत आराखड्यात बदल झालेले नसले तरी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (इर्डा) पुढाकाराने वाहन विम्यात अनेक सुविधांची वाढ झाली आहे. वाहन विम्यात अनेक...
  June 9, 02:28 AM
 • नवी दिल्ली - तिस-या दिवशीही कामगारांचा संप सुरूच राहिल्याने मारुती सुझुकी इंडिया या कंपनीच्या मानेसर येथील कारखान्यातील कामकाज ठप्प झाल्याने मोठे नुकसान होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कामगारांची युनियन स्थापण्यावरून हा संप शनिवारपासून सुरू झाला. सुमारे २००० कामगार यात सहभागी झाले आहेत. मानेसर येथील कामगारांची स्वतंत्र युनियनची मागणी आहे. कामगारांचे म्हणणे आहे की, सध्या कंपनीत मारुती सुझुकी कामगार युनियन अशी एकच युनियन आहे. या युनियनचे काम गुरगावातून चालते. मानेसर येथील...
  June 7, 09:36 AM
 • कोरियाची आघाडीची कंपनी हुदांईने छोटी कार बाजारात लवकरात लवकर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असून, पावसाळ्यानंतर म्हणजेच दिवाळीपर्यंत ती ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हुदांई कंपनीने या छोट्या कारचे नाव एच-८०० असे ठेवले असून त्याची रस्त्यावर सध्या चाचणी घेतली जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने अधिक माहिती न देता फक्त ही कार सर्वांधिक मायलेझ देईल, असे म्हटले आहे. तसेच तिची किमत खूपच कमी असेल. पेट्रोल कमी कसे लागेल यावर आम्ही भर देत असून मारुती कंपनीची...
  June 6, 03:15 PM
 • सर्वसामान्यांची कार म्हणून ओळखली जाणार्या नॅनो कारच्या प्रकल्पानंतर गुजरातेत आता मारुती आणि फ्रान्सच्या पिगॉट सिट्रॉनचे प्रकल्प आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. गुजरातच्या अर्थचक्रास आता गती येईल.पश्चिम बंगालमध्ये टाटाच्या नॅनो प्रकल्पास विरोध झाल्यानंतर मोदीनी रतन टाटांना तेथे येण्याचे निमंत्रण दिले. महाराष्ट्रही पायघड्या घालण्यास तयार होता, पण गुजरातमध्ये असलेला कुशल कर्मचारीवर्ग आणि उद्योगासाठी गुजरात शासनाचे लवचिक धोरण यामुळे हा प्रकल्प टाटांनी...
  June 6, 12:49 PM
 • वृत्तसंस्था । कोल्हापूर : बजाज आॅटो लिमिटेडने सर्वोत्तम विपणन धोरण राबवून मागील २३ महिन्यांत महाराष्ट्रात तीन लाख डिस्कव्हर मोटारसायकल विकण्याचा विक्रम केला आहे. कंपनीच्या पश्चिम क्षेत्राचे विक्री प्रमुख विमल संबली यांनी सांगितले की, कंपनीने फक्त २३ महिन्यांत विक्रीचे हे उद्दिष्ट साध्य केले आहे. मागील एका वर्षात कंपनीने राज्यात एक लाख डिस्कव्हर मोटारसायकल विकल्या तर पुढील एक लाख मोटारसायकल मागील सहा महिन्यांत आणि बाकी एक लाख डिस्कव्हर मागील पाच महिन्यांत विकण्यात आल्या. कमी इंधन...
  June 5, 04:01 AM
 • नवी दिल्ली- देशातील वाहन विक्रीतील प्रमुख कंपनी टाटा मोटर्सने मार्चमध्ये लॉंच केलेली हॅचबॅक इंडिका गाडीची नवी मॉडेल ईवी-२ ही गाडी ग्राहकांच्या पसंतीला आली नाही. सर्वाधिक मायलेज व माफक किंमत असून म्हणावी तशी विक्री झाली नसल्याचे दिसून येत आहे. ही गाडी प्रतिलिटर २५ किलोमीटर इतकी मायलेज देते. असे असूनही मार्चपासून बाजारात आलेल्या गाडीची चांगली विक्री झाली नाही.मार्चमध्ये सुमारे ७००० हजार इंडिका गाडीची विक्री झाली. जी गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत...
  June 4, 05:17 PM
 • मुंबई । देशातील दुसरी सर्वांत मोठी मोटारसायकल निर्माती कंपनी बजाज ऑटो लिमिटेडने सन २११ मध्ये तीन लाख ५८ हजार ८४९ एवढ्या विक्रमी संख्येत वाहने विकली आहेत. मागील वर्षी कंपनीने दोन लाख ९९ हजार ४४२ वाहने विकली होती. मे २११ मध्ये मोटारसायकलींची विक्री १८ टक्क्यांनी वाढून तीन लाख १७ हजार ९८९ वर गेली असल्याची माहिती आज कंपनीने दिली. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने दोन लाख ६९ हजार ४८८ वाहने विकली होती. या कालावधीत वाहनविक्री ३६ टक्क्यांनी वाढली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
  June 3, 03:45 AM
 • टाटा मोटर्सच्या एकूण वाहन विक्रीमध्ये १o टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या ५६,७७५ मोटारींवरून ६२,२९६ मोटारींवर गेली आहे. परंतु, स्थानिक बाजारपेठेतील प्रवासी मोटारींची निर्यात ९ टक्क्यांनी घसरून ती २१,३२४ मोटारींवरून १९,४०१ मोटारींवर आली आहे. प्रवासी मोटारींची विक्री १९ टक्क्यांनी वाढून ती ३७,३६१ मोटारींवर गेली आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री ३.२४ टक्क्यांनी वाढून २१,८२९, तर अवजड व्यावसायिक वाहनांची विक्री १२ टक्क्यांनी वाढून १५,५३२ वाहनांवर गेली आहे. निर्यातीमध्ये...
  June 2, 10:58 AM
 • नवी दिल्ली- सध्या खनिज तेलांचे दर भडकले असून, १५ मेला ५ रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ केली असली तरी तेल कंपन्यांना मोठा तोट सहन करावा लागत असल्याने पुन्हा जून महिन्यात पेट्रोल, डिझेल दरवाढ अटळ असल्याचे देशातील तेल पुरविणारी सर्वात मोठी इंडियन आइल कार्पोरेशन कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे अध्यक्ष आर. एस. भुटाला यांनी सांगितले की मागील पंधरवड्यात पेट्रोलचे पोच रुपयांनी दर वाढ करुनही आम्ही प्रत्येक लिटरमागे ४ रुपये ५८ पैसे तोटा सहन करत आहे. त्यामुळे याबाबत १ जून रोजी निर्णय घेण्यात येईल....
  May 31, 03:51 PM
 • लंडन- टाटांनी इंग्लडमधील जग्वार लॅंड रोव्हर कंपनी आपल्या ग्रुपमध्ये सामील करुन घेतल्यानंतर कंपनीने प्रथमच १.३ अब्ज पौंडाचा नफा जाहीर केला. त्याबाबतची माहिती घेण्यासाठी टाटांनी कंपनीतील मोठ्या अधिकाऱयांना सुट्टीच्यादिवशीही कंपनीत बोलावले. कंपनीचा नफा वाढल्याने कंपनीत आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे अधिकाऱयांनी ना-नू केले नाही. पण टाटाच्या या निर्णयाने जगभर राज्य गाजवलेल्या देशातील 'साहेबांची' सुट्टी मात्र वाया गेली.या बैठकीनंतर मात्र कर्मचाऱयांत वेगळीच चर्चा सुरु झाली असल्याची...
  May 31, 12:59 PM
 • मागील काही महिन्यापासून चारचाकी गाड्यांची जोरदार विक्री होत असली मे महिन्यात कारविक्रीचा आकडा घसरला आहे. भारतीय कार बाजारातही त्याचे पडसाद उमटले असून भारतातही मे महिन्यात तब्बल १० टक्क्यांनी कमी कार विकल्या आहेत. त्यामुळेच डिलर यांच्याकडे गाड्यांची रांगच-रांग लागली असून ही रांग कमी करण्यासाठी कार कंपन्या पुढील महिन्यात ग्राहकांना खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट अॉफर देण्याचा विचार करत आहे.कंपन्याचं असं म्हणणं आहे की, एप्रिल-मे मध्ये कमी कार विकल्या गेल्याचा परिणाम आता...
  May 30, 11:49 AM
 • पुणे- भारतातील ऑटो क्षेत्राची गरज लक्षात घेता जग्वार लॅड रोव्हर कंपनी पुढील पाच वर्षात सुमारे ४ प्रकारातील वेेगवेगया मॉडेल्स बाजारात आणेल, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राल्फ स्पेथ यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये जग्वार लॅड रोव्हर कंपनीच्या भारतातील पहिल्या असेंब्ली प्लांटच्या उदेघाटननंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.डॉ. स्पेथ म्हणाले,भारतीय बाजारपेठेत लक्झरी उत्पादनांची मागणी वाढत असून, येथील अर्थव्यवस्था बळकट होत आहे. त्यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळत...
  May 29, 08:07 PM
 • अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती संजय कपूर याची गुडगाव येथील सोना कोयो स्टियरिंग कंपनी चारचाकी गाड्यांना लागणारे सुट्टे पार्र्ट पुरवते. मारुती सुझूकी, टाटा मोटर्स या कंपनीच्या गाड्यांना ओरिजनल पार्ट पुरवते. मात्र कंपनीने आता स्वताच चारचाकी गाडी बनविण्याची तयारी चालवली आहे. कंपनीने सुट्टे पार्ट पुरविण्यामध्ये चांगले नाव कमावले असून कंपनीची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या ते ऑटो क्षेत्रातील कंपन्याशी चर्चा करत असून संबंधति कंपन्यांना ते स्वत संपूर्ण चारचाकी...
  May 29, 05:31 PM
 • नवी दिल्ली- भारतातील ऑटो क्षेत्रातील अग्रगण्य समजली जाणारी कंपनी टाटा मोटर्सने जगातील सर्वांत स्वस्त कार नॅनो मोटार बनविल्यानंतर आता या वर्षात तिची नवी श्रेणी बाजारात आणण्याची योजना आखली आहे.टाटा मोटर्सने नव्या श्रेणीतील गाडीबाबतीत कोणतीही तांत्रिक माहिती दिली नसून, कंपनीकडून डिझेल श्रेणीतील नॅनो कार बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.नॅनोबरोबरच व्हिस्टा रिफ्रेश, मान्झा लिंिमटेड, न्यू सफारी, आरिया-२ डब्लूडी या गाड्याच्या नव्या श्रेणी यI आर्थिक वर्षात आणणार...
  May 29, 04:15 PM
 • नवी दिल्ली- भारतातील ऑटो क्षेत्रातील अग्रगण्य समजली जाणारी कंपनी टाटा मोटर्सने जगातील सर्वांत स्वस्त कार नॅनो मोटार बनविल्यानंतर आता या वर्षात तिची नवी श्रेणी बाजारात आणण्याची योजना आखली आहे.टाटा मोटर्सने नव्या श्रेणीतील गाडीबाबतीत कोणतीही तांत्रिक माहिती दिली नसून, कंपनीकडून डिझेल श्रेणीतील नॅनो कार बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.नॅनोबरोबरच व्हिस्टा रिफ्रेश, मान्झा लिंिमटेड, न्यू सफारी, आरिया-२ डब्लूडी या गाड्याच्या नव्या श्रेणी य आर्थिक वर्षात आणणार...
  May 29, 04:14 PM
 
जाहिरात

RECOMMENDED