जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Auto

Automobile News

 • न्यूयॉर्क -वर्ष २०१३ मध्ये सर्वश्रेष्ठ डिझाइनचा पुरस्कार मिळवणारी एडएस्ट्रा याटची आता विक्री होणार आहे. या याटची किंमत १.५ कोटी डॉलर (सुमारे १०० कोटी रुपये) निश्चित करण्यात आली आहे. आय पॅडच्या माध्यमातून नियंत्रित करता येणे हे सुपर याटचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर पारंपरिक याटच्या तुलनेमध्ये यात ८६ टक्के कमी इंधन खर्च होते.
  July 16, 09:33 AM
 • १ एप्रिल २०१९ पासून १२५५ सीसीपेक्षा मोठ्या इंजिनच्या बाइक्समध्ये एबीएस (अँटी-लाॅक ब्रेकिंग सिस्टिम) अनिवार्य केली आहे. आपल्या देशात अनेक लोक प्रथमच या सिस्टिमचा वापर करत आहेत कारण आता जवळपास प्रत्येक लहान बाइकमध्ये ती दिली जातेय.गेल्या दोन महिन्यांपासून एबीसीमुळे सर्व्हिस सेंटरवर लोक जास्त येत आहेत, कारण त्यांना एबीएस कसे काम करते हे माहीतच नाही. लोक ब्रेक लावतात आणि त्यांना वेगळाच अनुभव येतो (जो त्यांनी आधी आला नाही.) त्याची तक्रार घेऊन सर्व्हिस स्टेशनला जात आहेत. या गोष्टी माहीत...
  July 13, 09:52 AM
 • लागो विस्ता-एअरक्राफ्ट व्यवस्थापन कंपनी लिफ्टने खासगी मल्टिकॉप्ट हेक्साचे प्रॉडक्शन मॉडेल तयार केले आहे. या सिंगल सीटर ड्रोन एअर क्राफ्टचा ज्यांच्याकडे एअरक्राफ्ट उडवण्याचा परवाना नाही असे नागरिकही वापरू शकता. कंपनी याचा वापर अनेक मेट्रो शहरातील बाहेरील परिसर, पर्यटन स्थळ आणि मनोरंजनाचे केंद्र असलेल्या ठिकाणी करण्याची योजना तयार करत आहे. या माध्यमातून उड्डाण घेण्याआधी कंपनीच्या वतीने युजरला व्हर्च्युअल सिम्युलेटरमध्ये काही मिनिटांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  July 13, 09:49 AM
 • नवी दिल्ली -टीव्हीएस मोटारने भारताची पहिली इथेनॉल आधारित मोटारसायकल बुधवारी बाजारात सादर केली. टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० एफआय ई १०० नावाच्या या मोटारसायकलची किंमत १.२० लाख रुपये आहे. या गाडीच्या लाँचिंग प्रसंगी रस्ते वाहतूक तसेच महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि टीव्हीएस मोटारचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन उपस्थित होते. कंपनीने या मोटारसायकलची कॉन्सेप्ट २०१८ मध्ये दिल्ली वाहन प्रदर्शनात दाखवली होती. टीव्हीएस अपाचे टीव्हीएस मोटारचा प्रमुख ब्रँड आहे.
  July 13, 09:11 AM
 • न्यूयॉर्क -अमेरिकी एअरक्राफ्ट कंपनी गल्फस्ट्रीमने अति श्रीमंतांचा विचार करून सुपरसॉनिक खासगी जेट जी-६०० ची निर्मिती केली आहे. ०.९ माक गती असलेले हे जेट एका वेळी १९ प्रवाशांसह लंडनपासून टोकियोदरम्यान कोणत्याही ठिकाणी इंधन न भरता प्रवास करू शकते. या जेटची किंमत सुमारे ४०० कोटी रुपये आहे. या विमानात ५१ हजार फूट उंचीवर केबिनमधील प्रेशर इतकेच असेल जितके सामान्य विमानात ४८५० फूट उंचीवर असते, असा कंपनीचा दावा आहे. अति श्रीमंतांसाठी : जेट लॅग अत्यंत कमी जाणवणार असल्याचा दावादेखील कंपनीच्या...
  July 7, 09:28 AM
 • मुंबई - ऑटोमोबाइल कंपन्यांच्या पॅसेंजर कारची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी एप्रिल-जूनच्या तिमाहीत ४०% कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या १८ महिन्यांत २५० डीलरशिप बंद झाल्या आहेत. त्यामुळे २५ हजारांवर लोक बेरोजगार झाले आहेत. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे (फाडा) उपाध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, ऑटोमोबाइल कंपन्यांना झालेल्या तोट्याचा अंदाज लावणे कठीण आहे. पण या संकटाचा परिणाम म्हणजे गेल्या दीड वर्षात देशात सुमारे २५० डीलरशिप बंद झाल्या आहेत. त्यांच्या बहुतांश...
  July 7, 07:28 AM
 • नवी दिल्ली - किराणा दुकानदारांसाठी एक चांगली बातमी आहे.हे व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन म्हणून काम करू शकतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधांच्या धाेरणामध्ये अशा प्रकारची घाेषणा हाेण्याची शक्यता आहे. या व्यवसायासाठी किराणा दुकानांना काेणताही परवान्याची गरज भासणार नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बॅटरी स्वॅपिंग स्टेशन अनेक प्रकारचे असू शकतात. एक माेठे स्टेशन पेट्राेल पंपसारख्या ठिकाणी असेल. जेथे माेठ्या प्रमाणावर बॅटरी स्वॅपिंग सुविधा...
  July 5, 10:20 AM
 • नवी दिल्ली - भारतातील मोठा सायकल समुह हीरो (Hero)आता हायटेक सायकल निर्मिती क्षेत्रात उतरणार आहे. यासाठी हिरोने चीनची आघाडीची सायकल कंपनी फुशिदा ग्रुपसोबत भागिदारी केली आहे. सदरील ग्रुप लुधियानामध्ये 380 एकरात 210 कोटी रूपयांची गुंतवणूक करून हायटेक सायकल व्हॅली प्रकल्प उभारणार आहे. फुशिदाचे चेअरमन ज्यान शेंग शिने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंहसोबतच्या बैठकीत ही माहिती दिली. 2022 मध्ये सुरू होणार निर्मिती फुशिदा संमुह हिरो सायकलसोबत मिळून प्रीमियम सायकल आणि इलेक्ट्रिक बाइकची निर्मिती...
  June 30, 07:22 PM
 • ह्युंदाई कोना ह्युंदाईची कोना ९ जुलैला भारतात लाँच होत आहे. ही भारताची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. कंपनी या गाडीच्या हिशेबाने आता सर्व मोठ्या शहरांवर लक्ष देईल. काही डीलरशिप्समध्ये फास्ट चार्जिंग सिस्टिमही लावली जाऊ शकते, जी या कारला एक तासात ८० टक्के चार्ज करण्यास सक्षम असेल. घरासाठी जे चार्जर दिले जात आहे, ते दहा तासांत हिला पूर्ण चार्ज करेल. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत २५ लाख रुपयांपर्यंत असू शकते, असे मानले जात आहे.
  June 29, 11:02 AM
 • गुडगाव-दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी किया मोटर्सने त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची जागतिक लाँचिंग गुरुवारी भारतात केली. ही कार कियाच्या एसपी कॉन्सेप्टवर आधारित असून ही २०१८ मधील वाहन प्रदर्शनात दाखवण्यात आली होती. देशात पुढील दोन वर्षांत चार नवीन मॉडेल सादर करण्याची कंपनीची योजना आहे. सेल्टोसला भारतीय बाजाराच्या दृष्टीने विचार करून तयार करण्यात आले आहे. ही गाडी कंपनीच्या आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथील प्रकल्पात तयार करण्यात येणार आहे. येथूनच कंपनी मध्य-पूर्व, आफ्रिका, लॅटिन...
  June 21, 09:56 AM
 • मुंबई -मारुती सुझुकीने मे महिन्यात उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट केली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या फायलिंगमध्ये ही माहिती समोर आली आहे. कंपनीने ही कपात सर्वच मॉडेलमध्ये केली आहे. यामध्ये कॉम्पॅक्ट आणि छोट्या श्रेणीतील वाहनांचाही समावेश आहे. कंपनीने या वर्षी मेमध्ये एकूण १,५१,१८८ कारचे उत्पादन केले ज्यात सुपर कॅरी एलसीव्हींचा समावेश होता, तर मागील वर्षी मे महिन्यात एकूण १,८४,६१२ कारचे उत्पादन केले होते. म्हणजेच यामध्ये १८.०१ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. सुपर कॅरी श्रेणीला सोडल्यास...
  June 11, 07:50 AM
 • नवी दिल्ली - हुंदाईने हॅचबॅक कार्निवल सुरू केला आहे. या कार्निव्हलमध्ये कंपनीच्या निवडक गाड्यांवर 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येत आहे. सोबतच 3 ग्राम सोन्याचे नाणे, एक्सचेंज बोनस देखील देण्यात येणार आहे. हा कार्निव्हल 3 जूनपासून सुरू झाला असून 30 जूनपर्यंत राहणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हुंदाईच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागले. अॅक्सेंट हुंदाईच्या अॅक्सेंटची दिल्ली एक्स शोरूम किंमत 5.72 लाख ते 8.77 लाख रूपये दरम्यान आहे. हॅचबॅक कार्निव्हलमधये या गाडीवर 95 हजार...
  June 10, 03:14 PM
 • नवी दिल्ली - लष्कराची पहिली पसंती ही जिप्सी कारला आहे. पण मारुती सुझुकीने 33 वर्षांनंतर मार्च 2019 मध्ये जिप्सीचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली होती. नवीन सुरक्षा नियमामुळे या गाडीचे उत्पादन करणे कंपनीसाठी अवघड होते. भारतीय लष्कराने जिप्सीचा विशेष उपयोग पाहत मारुती सुझुकीकडे 3051 जिप्सी गाड्यांची मागणी केली आहे. अशातच संरक्षण मंत्रालयाने मारुती सुझुकीला नियमवलीत सुट देत लष्करासाठी जिप्सीचा मार्ग सोपा केला आहे. यामुळे लष्कराची जिप्सीला पसंती मारुती सुझुकी जिप्सीचे उत्पादन बंद होऊनही...
  June 4, 06:01 PM
 • नवी दिल्ली - सात्याने घटत्या विक्रीच्या समस्येने ग्रासलेल्या देशातील वाहन उद्याेगाने येत्या जुलै महिन्यात सादर हाेणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सर्व वाहनांवरील सध्याचा २८ % असलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसी) कमी करून ताे १८ % करावा, अशी मागणी केली आहे. केंद्रात पुन्हा सत्तेवर आलेले माेदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर करणार आहे. देशातील वाहन उद्याेगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सियाम या संस्थेने प्रदूषण नियंत्रणासाठी जुन्या वाहनांचे रूपांतर नव्या वाहनात करण्यास...
  June 4, 09:47 AM
 • लॉस एंजलिस -टेक कंपनी अलका आय टेक्नॉलॉजीने हायड्रोजन फ्युएल सेलने चालणारे मल्टिरोटर एअरक्राफ्टचे मॉडेल सादर केले आहे. यात एकाच वेळी पाच प्रवासी बसू शकतील. कंपनीने याला अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरातील न्यूबरी पार्कमधील बीएमडब्ल्यू समूहाच्या डिझाइन वर्क स्टुडिओमध्ये प्रदर्शित केले आहे. हे झीरो उत्सर्जन मोडमध्ये बनवलेले हवाई प्रवासासाठी खासगी वाहनाप्रमाणे असल्याचा कंपनीचा दावा आहे. धुक्यामुळे वाहतुकीला खोळंबा होतो, अशा ठिकाणी हे जास्त उपयोगी आहे. हे जगातील पहिले हायड्रोजन सेल फ्युएल...
  June 1, 10:48 AM
 • ऑटो डेस्क - ९ जुलैला कोना इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली जाईल हे ह्युंदाई या कोरियन कार निर्मिती कंपनीने निश्चित केले आहे. भारतात ही ह्युंदाईची फक्त पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार नाही, तर भारतीय बाजारात पहिली ऑल इलेक्ट्रिक लाँग रेंज ईव्ही असेल. इतर देेशात विक्री होत आहे तशीच ही कार असेल. बंपर आणि फ्रंट ग्रिलमध्ये काही बदल केले आहेत. जगात तिचे दोन पर्याय दिले जात आहेत, एकीत 39KW बॅटरी पॅक आहे, जे एका चार्जमध्ये ४८२ किमीपर्यंत साथ देऊ शकते. भारतात एक पर्याय म्हणून दिली जाऊ शकते.भारतात 39KW मॉडेल...
  June 1, 10:32 AM
 • नवी दिल्ली- महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहनांच्या विक्रीत (ई-वाहन) मागील आर्थिक वर्षात २०१८-१९ मध्ये अडीच पट वाढ झाली आहे. कंपनीने एप्रिल २०१८ पासून मार्च २०१९ दरम्यान १०,२७६ ई-वाहनांची विक्री केली. यामध्ये सरकारी कंपनी ईईएसएलकडून ई-वाहनांसाठी दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या आॅर्डरचे महत्त्वाचे योगदान आहे. कंपनीने या आधी मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४,०२६ ई-वाहनांची विक्री केली होती. महिंद्रा इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीमध्ये सेडान ई-वेरिटो, व्हॅन ई-सुप्रो, कॉम्पॅक्ट कार ई-२-ओ आणि...
  May 31, 09:32 AM
 • नवी दिल्ली -देशात ई-रिक्षा बिनापरवाण्याच्या चालवता येतील. लोकांना चांगली परिवहन सुविधा मिळावी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली आहे. ई-रिक्षाला जिल्हा परिवहन कार्यालयात नोंदणी करून चालवता येणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संबंधित प्रस्ताव तयार करून त्याला मंत्रालयाची मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतर नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. सध्या दिल्लीसह देशातील सर्व शहरांमध्ये रिक्षा चालवण्यासाठी परमिट काढण्याची व्यवस्था लागू...
  May 28, 10:45 AM
 • नवी दिल्ली -देशातील पहिली स्मार्ट कनेक्टेड एसयूव्ही ह्युंदाई व्हेन्यू मंगळवारी लाँच झाली. देशात तयार झालेली ही सब-फोर मीटर कनेक्टेड फीचर्सची ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत ६.५० लाख रुपये आहे, तर वेगवेगळ्या श्रेणीतील गाड्यांची किंमत ११.१० लाख रुपयांपर्यंत आहे. या एसयूव्हीची स्पर्धा मारुतीची विटारा ब्रेझा, टाटा मोटर्सची नेक्सॉन, महिंद्रा एक्सयूव्ही-३००, होंडा डब्ल्यूआर-व्ही आणि फोर्ड इकोस्पोर्टशी असेल. या गाडीची जागतिक लाँचिंग २०१९ न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय वाहन...
  May 23, 10:22 AM
 • नवी दिल्ली -आता गाडी खरेदी करून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन गेल्यास त्याची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसेल. रस्ते परिवहन मंत्रालयाने देशभरात एकच नोंदणी करण्याची तयारी केली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. यासाठी सर्व राज्यांतून सूचना मागवण्यात येणार आहेत. मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तीन महिन्यांत हा प्रस्ताव तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर तो केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात...
  May 23, 10:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात