आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगांसाठीच्या मोठ्या घोषणा:नवीन उद्योजकांना 10 वर्षांसाठी कर सवलत, कोरोनाचा फटका बसलेल्या MSME ना दिलासा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना उद्योगांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यानुसार कोरोनाचा फटका बसलेल्या एमएसएमईंना दिलासा दिला जाणार आहे. वाचा उद्योगांसाठीच्या काही महत्वाच्या घोषणा...

 1. नवीन उद्योजकांना 10 वर्षांसाठी कर सवलत
 2. 3 कोटी उलाढाल असलेल्या मायक्रो उद्योगांना करात सवलत
 3. कारागीर आणि शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान पॅकेजची घोषणा
 4. कोरोनाचा फटका बसलेल्या एमएसएमईंना दिलासा दिला जाईल
 5. एमएसएमईसाठी कर्ज गॅरंटीची नवी योजना
 6. GIFT IFSC मध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी नव्या उपाययोजना
 7. MSME उत्पादनांची गुणवत्ता आणि पुरवठा सुधारण्यासाठी पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजनेचा लाभ घेऊ शकतील.
 8. इलेक्ट्रिक किचन चिमनीवरील कस्टम ड्युटी 7.5 टक्क्यांवरून वाढवून 15%
 9. ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाख
 10. सिगारेटवरील कस्टम ड्युटी 16 टक्क्यांनी वाढणार
 11. कपडे आणि कृषीशिवाय इतर वस्तूंवर बेसिक कस्टम ड्युटी 21% वरून घटवून 13%
 12. कौशल सन्मान योजनेने उत्पादनांचा दर्जा आणि मार्केटिंग सुधारली जाईल.

MSME साठी विवाद से विश्वास योजना

एमएसएमईंसाठी खास विवाद से विश्वास योजना राबवली जाईल. यानुसार करार अंमलात आणण्यात अयशस्वी ठरलेल्या एमएसएमईंना 95 टक्के परफॉर्मन्स सिक्युरिटी परत केली जाईल.

विवाद से विश्वास योजनेअंतर्गत कर विवाद, व्याज, दंड आणि शुल्काच्या 100 टक्के विवादित कर आणि 25 टक्के विवादित दंड किंवा व्याज किंवा फी भरल्यास मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन आदेशाच्या संदर्भात सेटलमेंट करण्याची तरतूद असेल.

रिअल इस्टेट

 1. पीएम आवास योजनेचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 कोटींपर्यंत नेला जाईल.
 2. एअर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 50 नवी विमानतळे, हेलिपॅड, ड्रोन आणि लँडिंग ग्राऊंड बनवले जातील.
 3. सर्व शहरे आणि गावांतील मेनहोल आणि सेफ्टिंक टँकची स्वच्छता मशीनने केली जाईल.
 4. आदिवासी जमातींना घर, स्वच्छ पाणी, शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा
 5. देण्यासाठी पीएम प्रिमिटिव्ह व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स डेव्हलपमेन्ट मिशन लॉन्च केले.

बजेटविषयी या बातम्याही वाचा...

तुमचे बजेट:कर सवलतीची मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवली, अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपला 5वा आणि देशाचा 75वा अर्थसंकल्प सादर करत आहेत. कृषी, शिक्षण आणि गरिबांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. त्यांनी सुधारणांच्या गंभीर पावलांचा उल्लेख केला आणि यादरम्यान एक मजेदार क्षणही आला.

त्या स्क्रॅप पॉलिसीचा उल्लेख करत होत्या. आधी म्हणाल्या- ओल्ड पॉलिटिकल व्हेइकल हटवले जातील... मग म्हणाल्या- सॉरी...सॉरी, ओल्ड पॉल्यूटेड व्हेइकल्सना हटवू. (वाचा पूर्ण बातमी)

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा:भरडधान्यांसाठी विशेष हब, 20 लाख कोटींच्या कृषी कर्जाचे उद्दीष्ट, कृषी स्टार्टअप्ससाठी कृषी वर्धक निधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म स्थापन करण्याची घोषणा केली आहे. शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. विशेषतः कृषी स्टार्टअप सुरू करण्यासाठी ग्रामीण भागात कृषी वर्धक निधीची स्थापना केली जाईल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. या घोषणेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. (वाचा पूर्ण बातमी)