आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Budget 2023
  • Budget 2023 | More Than 90% Of Taxpayers Are Now Tax Free, With Annual Salary Up To Rs 7 Lakh Not Subject To Income Tax | Marathi News

जुन्या करव्यवस्थेला धोबीपछाड:90% पेक्षा जास्त करदाते करमुक्त, 7 लाख रु.पर्यंत वार्षिक वेतन असल्यास आयकर लागणार नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी सरकारने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नोकरदारांना मोठा दिलासा देत ७ लाखांपर्यंतचे उत्पन्न ( दरमहा ५८,३३३ रु.) आयकरमुक्त करण्याची घोषणा केली. या करदात्यांना आता बचतीसारख्या कर सवलती देणाऱ्या योजनांचीही गरज राहिली नाही. अर्थात त्यांनी नव्या कर पद्धतीचा अवलंब केला तरच हा लाभ होईल ही अट आहे. १ एप्रिलनंतर नवी कर पद्धती हीच मुख्य कर पद्धत म्हणून गणली जाईल. एखाद्या करदात्याला जुनीच कर पद्धतीच हवी असेल तर स्वतंत्र फॉर्म भरावा लागेल. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार देशातील ९०% नोकरदार वर्गाचे वार्षिक उत्पन्न ७ लाखांपेक्षा कमी आहे. त्यांची संख्या ७ कोटींवर आहे. परंतु त्यांच्याकडून गोळा होणारा कर एकूण कर महसुलाच्या ३%पेक्षाही कमी आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे अमृतकाळाची पायाभरणी असून कर व्यवस्थेतील सुधारणा देशाच्या प्रगतीचा मार्ग खुला करेल, असे सीतारमण म्हणाल्या.

सवलतीच्या जुन्या कर व्यवस्थेला धोबीपछाड, ती संपवण्याचा अध्याय सुरू

उत्पन्न ७ लाखांवर असल्यास कर रचना अशी असेल..

बातम्या आणखी आहेत...